"राहुल गांधींचा व्हिडीओ म्हणजे नाटक, मजुरांच्या दुर्दशेला काँग्रेसच जबाबदार"

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 03:08 PM2020-05-23T15:08:27+5:302020-05-23T15:17:00+5:30

लॉकडाऊनच्या काळात हातावर पोट असणाऱ्या मजुरांचे प्रचंड हाल झाले आहेत. याच पार्श्वभूमी बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.

mayawati lashes out rahul gandhi sharing video of workers SSS | "राहुल गांधींचा व्हिडीओ म्हणजे नाटक, मजुरांच्या दुर्दशेला काँग्रेसच जबाबदार"

"राहुल गांधींचा व्हिडीओ म्हणजे नाटक, मजुरांच्या दुर्दशेला काँग्रेसच जबाबदार"

Next

नवी दिल्ली - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या काळात हातावर पोट असणाऱ्या मजुरांचे प्रचंड हाल झाले आहेत. याच पार्श्वभूमी बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. शहरी भागांत राहणारे स्थलांतरित मजूर अेनेक संकटांचा आणि समस्यांचा सामना करत आपापल्या गावी परतत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी सुखदेव विहार उड्डानपुलावरून आपापल्या राज्यांत जाण्यासाठी निघालेल्या अशाच काही मजुरांची भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला. यावरून मायावती यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. 

राहुल गांधींचा व्हिडीओ म्हणजे नाटक आहे, सध्या देशात मजुरांची जी काही अवस्था झाली आहे त्याला काँग्रेसच जबाबदार आहे अशी टीका मायावती यांनी केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबतचे ट्विट केले आहे. 'लोकांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेणं हे नाटक असल्याचं अधिक जाणवतं. तसेच हा व्हिडीओ शेअर करण्यापेक्षा काँग्रेसने प्रत्यक्षात किती लोकांची मदत केली हे सांगितलं असतं तर बरं झालं असतं' असं मायावती यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

'आज कोरोना लॉकडाऊनमुळे देशातील स्थलांतरित मजुरांची जी अवस्था आहे, जी दुर्दशा झाली त्याला काँग्रेसच जबाबदार आहे. कारण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एका मोठ्या कालावधीसाठी देशात काँग्रेसची सत्ता होती. एवढ्या मोठ्या शासनकाळात जर काँग्रेसने या मजुरांच्या अन्न, वस्त्र निवारा या गरजा सोडवल्या असत्या तर आज ही वेळ त्यांच्यावर आली नसती' असं देखील मायावती यांनी म्हटलं आहे. 

काही दिवसांपूर्वी मायावती यांनी भाजपा सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. लॉकडाऊनदरम्यान देशभरात दलित आणि मागास वर्गातील लोकांची अवस्था दयनीय झाली आहे. त्यामुळेच देशातील अनेक भागातील लोक पलायन करत आहेत. पलायन करणाऱ्यांमध्ये 90 टक्के लोक हे दलित आणि अतिमागास प्रवर्गातील आहेत, याचा उल्लेखही मायावतींनी केला होता. राज्य सरकारांकडून दलित आणि गरिबांची उपेक्षा करण्यात आली आहे. सरकारांनी त्यांच्यासाठी कोणतीही वेगळी व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे ते लोक आपापल्या घराकडे पलायन करत आहेत. कोरोनामुळे दलित आणि गरिबांची परिस्थिती हलाखीची झालेली असून, त्याकडे केंद्र सरकारनं लक्ष दिलं पाहिजे असं म्हटलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

Pakistan Plane Crash : 'आगीचे लोट, असंख्य किंकाळ्या अन्...', दुर्घटनेतून बचावलेल्या 'त्याने' सांगितलं नेमकं काय घडलं?

Pakistan Plane Crash : विमान अपघातात 97 ठार, दोघे वाचले; 'ते' भीषण दृश्य CCTV ने टिपले!

CoronaVirus News : तब्बल 18 वर्षांनी 'ते' गावी परतले पण ना आई जिवंत होती ना पत्नी...

काय सांगता? Google maps मुळे पती-पत्नीत झालं कडाक्याचं भांडण; घेतली थेट पोलिसात धाव

CoronaVirus News : अरे व्वा! 100 वर्षांच्या आजींनी जिंकलं 'कोरोना युद्ध'; टाळ्यांचा गजरात झालं स्वागत

CoronaVirus News : तंत्रज्ञानाची किमया! 'हे' खास हेल्मेट घेणार कोरोना व्हायरसचा शोध; जाणून घ्या खासियत

Web Title: mayawati lashes out rahul gandhi sharing video of workers SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.