CoronaVirus News : 1 जूनपासून धावणार 200 स्पेशल ट्रेन्स; प्रवासाआधी जाणून घ्या नवे नियम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 04:14 PM2020-05-23T16:14:42+5:302020-05-23T16:34:35+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: रेल्वेकडून या गाड्यांमध्ये जेवण, बेडशीट यासारख्या सुविधा देण्यात येणार आहेत की नाही? याबाबत माहिती देण्यात आली आहे.

देशभरात अडकलेल्या गरीब मजुरांना सोडण्यासाठी सध्या श्रमिक विशेष रेल्वे सुरू आहेत. यानंतर रेल्वेनं देशभरात मेल एक्स्प्रेस ट्रेन्स सुरू करणार असल्याची माहिती रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी दिली होती.

1 जूनपासून दररोज 200 स्पेशल रेल्वे गाड्या वेळापत्रकानुसार सोडल्या जाणार असल्याचं पीयूष गोयल यांनी सांगितलं होतं.

आयआरसीटीसी (IRCTC)ने 1 जूनपासून सुरू होणाऱ्या 200 गाड्यांच्या ऑनलाईन बुकिंगला सुरुवात केलेली आहे.

200 स्पेशल ट्रेनच्या तिकिटांची बुकिंग आयआरसीटीसी या वेबसाइटवरुन किंवा मोबाईल अ‍ॅपवरुन करता येणार आहे.

प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी सर्व प्रवाशांच स्क्रीनिंग केलं जाणार असून कोरोनाची लक्षणं नसलेल्या व्यक्तींनाच प्रवासाची परवानगी देण्यात येणार असल्याचे रेल्वे मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

रेल्वेनं दिलेल्या माहितीनुसार, या 200 ट्रेन्सपैकी काही ट्रेन्स मुंबईहून सुटणाऱ्या किंवा मुंबईत येणाऱ्या आहेत. याशिवाय एक गाडी पुण्यातून सुटणार आहे.

गाड्यांमध्ये एसी आणि नॉन एसी असे दोन क्लास तसेच जनरल कोचही असतील. सर्वच कोचसाठी आरक्षण करावं लागणार आहे.

1 जूनपासून सुटणाऱ्या 200 स्पेशल गाड्यांसाठी रेल्वेने काही नवे नियम तयार केले आहेत. त्याविषयी जाणून घेऊया.

रेल्वेकडून या गाड्यांमध्ये जेवण, बेडशीट यासारख्या सुविधा देण्यात येणार आहेत की नाही? याबाबत माहिती देण्यात आली आहे.

तिकीट भाड्यामध्ये कॅटरिंगचे पैसे नाहीत. तसेच प्रीपेड मील बुकिंग आणि ई-बुकिंगवर निर्बंध घालण्यात आले आहेत.

IRCTC कडून खाद्यपदार्थ आणि सीलबंद पाणी काही गाड्यांमध्येच देण्यात येईल ज्यामध्ये पँट्री कार जोडण्यात आली असेल. तिकीट बुक करताना प्रवाशांना यासंदर्भात सूचना देण्यात येईल.

सर्व प्रवाशांना त्यांच्याबरोबर जेवण आणि पाणी आणण्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.

फूड प्लाझा आणि रेफ्रिशमेंट रूम दिल्या जाऊ शकतात. ज्याठिकाणी खाण्याचे पदार्थ घेऊन जाण्यासाठी परवानगी मिळेल, बसून खाण्यासाठी परवानगी दिली जाणार नाही

रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार कोचमधील तापमान रेग्यूलेट करण्यात येईल.

स्पेशल ट्रेन्समध्ये पडदे किंवा चादर उपलब्ध करून दिली जाणार नाही. भारतीय रेल्वेने प्रवाशांना स्वत:चे सामान आणण्यास सांगितले आहे.

रेल्वेने सर्व प्रवाशांना कमीत कमी सामान घेऊन प्रवास करण्यास सांगितले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.