भारतात अँड्रॉइड फोन, स्मार्टवॉचवर हॅकिंगचे सावट; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट, तातडीने करा ‘हे’ काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 06:12 IST2026-03-12T06:11:51+5:302026-03-12T06:12:16+5:30

भारतातील लाखो स्मार्टफोन, टॅब्लेट आणि स्मार्टवॉच वापरणाऱ्या युजर्ससाठी केंद्र सरकारने धोक्याचा इशारा दिला आहे.

Threat of hacking on Android phones, smartwatches in India; Central government on high alert, do 'this' immediately | भारतात अँड्रॉइड फोन, स्मार्टवॉचवर हॅकिंगचे सावट; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट, तातडीने करा ‘हे’ काम

भारतात अँड्रॉइड फोन, स्मार्टवॉचवर हॅकिंगचे सावट; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट, तातडीने करा ‘हे’ काम

नवी दिल्ली : भारतातील लाखो स्मार्टफोन, टॅब्लेट आणि स्मार्टवॉच वापरणाऱ्या युजर्ससाठी केंद्र सरकारने धोक्याचा इशारा दिला आहे. अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीममधील काही त्रुटींमुळे तुमची वैयक्तिक माहिती हॅकर्सच्या ताब्यात जाऊ शकते, अशी भीती व्यक्त केली आहे. यामुळे आघाडीच्या ब्रँड्सचे कोट्यवधी युजर्स धोक्यात आले आहेत. 

सरकारी यंत्रणेचा ‘हाय-रिस्क’ इशारा

१. भारताची राष्ट्रीय सायबर सुरक्षा संस्था ‘इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम’ने ही तातडीची सूचना प्रसिद्ध केली आहे. ‘सर्ट-इन’च्या मते, अँड्रॉइडमधील तांत्रिक कमतरता उच्च जोखीम श्रेणीतील आहेत. 

२. याचा फायदा घेऊन हॅकर्स  डिव्हाइसमध्ये शिरतात. मीडियाटेक, क्वालकॉम कंपन्यांच्या चिपसेटमध्ये या त्रुटी आढळल्या. त्यांचा वापर मोबाइलमध्ये केला जातो.

कोणत्या डिव्हाइसेसना आहे सर्वाधिक धोका?

हा इशारा प्रामुख्याने नवीन अँड्रॉइड व्हर्जनवर चालणाऱ्या उपकरणांसाठी आहे. यामध्ये अँड्रॉइड १३, १४ व १५ अँड्रॉइड १६ च्या सुरुवातीच्या आवृत्त्यांचा समावेश हाेताे.

बचावासाठी काय करावे?

सॉफ्टवेअर अपडेट : डिव्हाइसच्या सेटिंगमध्ये जाऊन निर्मात्या कंपनीने पाठवलेले लेटेस्ट ‘सिक्युरिटी पॅच’ किंवा सॉफ्टवेअर अपडेट त्वरित इन्स्टॉल करा.

विश्वासार्ह स्रोत : नवीन ॲप्स डाऊनलोड करण्यासाठी केवळ ‘गुगल प्ले स्टोअर’सारख्या अधिकृत प्लॅटफॉर्मचाच वापर करा.

शंकास्पद लिंक्स : अनोळखी नंबरवरून आलेल्या किंवा सोशल मीडियावरील संशयास्पद लिंक्सवर क्लिक करणे टाळा.

Web Title : भारत में एंड्रॉयड फोन, स्मार्टवॉच पर हैकिंग का खतरा; सरकार ने जारी किया अलर्ट।

Web Summary : भारत सरकार ने एंड्रॉयड डिवाइसों के लिए हैकिंग के खतरे की चेतावनी दी है। सुरक्षित रहने के लिए सॉफ़्टवेयर अपडेट करें, आधिकारिक ऐप स्टोर का उपयोग करें और संदिग्ध लिंक से बचें।

Web Title : Android phones, smartwatches face hacking threat in India; Govt issues alert.

Web Summary : The Indian government warns of hacking risks for Android devices. Update software, use official app stores, and avoid suspicious links to stay safe.