शहरं
Join us  
Trending Stories
1
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
2
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
3
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
4
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
5
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
7
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
8
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
9
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
10
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
11
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
12
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
13
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
14
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
15
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
16
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
17
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
18
मॅरिड बॉयफ्रेंडसाठी सेल्स गर्लने १.६६ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, पण आंघोळीला गेली अन् घात झाला
19
Sanjay Raut: "लोक भाजपला मतदान करून आपल्या कर्माची फळं भोगतायत!" संजय राऊत असं का म्हणाले?
20
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
Daily Top 2Weekly Top 5

आता WhatsApp वर ChatGPT वापरा, इमेज तयार करा; 'हा' घ्या नंबर, ठरेल गेमचेंजर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 12:10 IST

ChatGPT WhatsApp Number: AI बरोबर चांगली मैत्री व्हावी म्हणून ChatGPT चे फिचर आता WhatsApp च्या पुढील क्रमांकावर उपलब्ध होणार आहे, त्याचा वापर जाणून घेऊ. 

ChatGPT on WhatsApp: प्रगत तंत्रज्ञान ही काळाची गरज आहे. त्याच्याशी जितक्या लवकर मैत्री करू तेवढी आपली प्रगती होते. उदाहरणार्थ बारा ते पंधरा वर्षांपूर्वी मोबाईल आपल्या हातात नव्हता, आता मोबाइलशिवाय कुणाचे पान हलत नाही. त्याचे फायदे तोटे यात न जाता संपर्क सुलभ होऊन जग जवळ आले आहे. इंटरनेटमुळे परस्परांशी जोडले गेले आहे. तीच बाब आता AI ची आहे! या नवीन तंत्रज्ञानामुळे लोकांच्या नोकऱ्या जाणार, लोक बेरोजगार होणार अशी राळ यापूर्वी टीव्ही, कॉम्प्युटर, मोबाईल आले तेव्हाही उठवली गेली होती. कालानुरूप ते आपल्या आयुष्याचा भाग बनले. AI चेही तसेच आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता  वापरून आपले काम सोपे होणारे. म्हणतात ना, हार्ड वर्क पेक्षा स्मार्ट वर्क महत्त्वाचे असते. AI आपल्याला नेमकी तीच मदत करणार आहे. आता त्याचे ChatGPT हे फिचर WhatsApp वर येत असल्याने त्याचा वापर कसा करून घेता येईल ते पाहू. 

जगातील सर्वात लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अँपपैकी एक असलेल्या ChatGPT मध्ये हा मोठा बदल केला आहे. आता तुम्ही WhatsApp वर इमेज जनरेट करण्यासाठी ChatGPT वापरू शकता. OpenAI ने अधिकृतपणे WhatsApp वर ChatGPT द्वारे 1-800-ChatGPT क्रमांकाद्वारे इमेज निर्मितीची सुविधा दिली आहे. त्यासाठी आता विशेष अँप डाउनलोड करण्याची गरज नाही. 

ChatGPT ला WhatsApp शी कसे जोडायचे

  • तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये 1-800-ChatGPT (+1-800-242-8478) हा नंबर सेव्ह करा.
  • WhatsApp वर या क्रमांकाला मेसेज पाठवा.
  • संवाद सुरु करण्यासाठी फक्त “हाय” टाइप करा.
  • तुमचे OpenAI खाते लिंक करा: ChatGPT तुम्हाला पडताळणी करण्यास सांगेल. 
  • तुमचे OpenAI खाते लिंक करण्यासाठी प्रॉम्प्ट फॉलो करा. तुम्हाला सुरक्षित लॉगिन पेजवर नेले जाईल.
  • संवाद सुरु केल्यावर तुम्हाला हवी असलेली इमेजची माहिती द्या. ही माहिती मराठीतही देता येते. 
  • ChatGPT तुम्हाला काही इमेज बनवून पाठवेल, त्यात तुम्हाला हवी ती इमेज तुम्ही डाउनलोड करू शकता. 

२०२१ मध्ये OpenAI ने त्याचे DALL·E मॉडेल आणल्यापासून, इमेज जनरेशन हे ChatGPT मधील सर्वात लोकप्रिय वैशिष्ट्यांपैकी एक बनले आहे. २०२३ आणि २०२४ मध्ये या टूलला मोठे अपग्रेड मिळाले- जसे की इनपेंटिंग (प्रतिमेचे विशिष्ट भाग संपादित करणे) आणि टेक्स्ट-टू-इमेज अर्थात माहितीच्या आधारे प्रतिमेची निर्मिती करण्याची अचूकता! 

चला तर तुम्हीही अपग्रेड व्हा आणि WhatsApp वर हे फिचर वापरून टेक्नोप्रगत व्हा!

टॅग्स :technologyतंत्रज्ञानArtificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्सWhatsAppव्हॉट्सअ‍ॅपSocial Mediaसोशल मीडिया