अफवा की सत्य? OnePlus ब्रँड कायमचा बंद होणार? Oppo कडून हालचाली सुरू; स्मार्टफोन विश्वात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 10:15 IST2026-01-21T10:15:12+5:302026-01-21T10:15:45+5:30

Flagship killer OnePlus end of an era: एकेकाळी आयफोनला टक्कर देणारा OnePlus स्मार्टफोन ब्रँड आता बंद होण्याच्या मार्गावर आहे. Oppo कडून कंपनी विसर्जित करण्याच्या हालचाली. पहा सविस्तर माहिती.

OnePlus Shutdown News Rumor or truth? Will OnePlus brand be closed permanently? Oppo starts moving; Excitement in the smartphone world | अफवा की सत्य? OnePlus ब्रँड कायमचा बंद होणार? Oppo कडून हालचाली सुरू; स्मार्टफोन विश्वात खळबळ

अफवा की सत्य? OnePlus ब्रँड कायमचा बंद होणार? Oppo कडून हालचाली सुरू; स्मार्टफोन विश्वात खळबळ

टेक जगतातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. एकेकाळी आयफोनला कडवे आव्हान देणारा आणि 'फ्लॅगशिप किलर' म्हणून ओळखला जाणारा OnePlus हा ब्रँड आता इतिहास जमा होण्याची शक्यता आहे. काही आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या रिपोर्टनुसार, मूळ कंपनी Oppo आता OnePlus चे अस्तित्व पूर्णपणे संपवून त्याचे आपल्या ब्रँडमध्ये विलीनीकरण करण्याच्या तयारीत आहे.

गेल्या काही वर्षांपासून OnePlus आणि Oppo यांच्यातील एकत्रीकरणाची प्रक्रिया सुरू होती. मात्र, आता समोर आलेल्या नवीन रिपोर्ट्सनुसार, Oppo ने OnePlus च्या स्वतंत्र अस्तित्वाला पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ असा की, भविष्यात आपल्याला 'OnePlus' या नावाने नवीन स्मार्टफोन पाहायला मिळणार नाहीत. हे सर्व बदल Oppo च्या अंतर्गत पुनर्रचना मोहिमेचा भाग असल्याचे सांगितले जात आहे.

फ्लॅगशिप किलरची पडझड?

  • सॉफ्टवेअरमध्ये बदल: ओपीडब्ल्यू (Oppo) आणि वनप्लसच्या ओएस (Operating System) चे एकत्रीकरण आधीच झाले होते, ज्याचा फॅन बेसकडून मोठा विरोध झाला होता. 
  • ब्रँडची ओळख पुसली जाणार: वनप्लसची ओळख असलेल्या 'अॅलर्ट स्लाइडर' आणि 'क्लीन सॉफ्टवेअर' सारख्या वैशिष्ट्यांमध्ये बदल झाल्याने ग्राहकांचा ओढा कमी झाला होता. 
  • सप्लाय चेन: खर्च कमी करण्यासाठी आणि सप्लाय चेन मजबूत करण्यासाठी Oppo ने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.
  • डिस्प्ले समस्या : वनप्लसला डिस्ल्पेवर अपडेटनंतर अचानक लाल, हिरव्या लाईन येत होत्या. वनप्लसने मोबाईल वॉरंटीमध्ये नसला तरी सर्वांचे डिस्प्ले मोफत बदलून दिले होते. परंतू, तरीही लोकांच्या मनातील भीती काही केल्या जात नव्हती. यावर वनप्लसने सर्व मोबाईलच्या डिस्प्लेवर लाईफटाईम वॉरंटीही जाहीर केली आहे. 
     

विद्यमान युजर्सचे काय?
ज्यांच्याकडे सध्या OnePlus चे फोन्स आहेत, त्यांना सॉफ्टवेअर अपडेट्स आणि सर्व्हिस मिळणे सुरू राहील, परंतु नवीन लॉन्च होणारे फोन हे 'Oppo' च्या ब्रँडिंगखाली येऊ शकतात. अधिकृतपणे कंपनीने अद्याप यावर अंतिम शिक्कामोर्तब केलेले नाही. अँड्रॉईड सेंट्रल, एक्सडीए, अँड्रॉईड अथॉरिटी सारख्या प्रसिद्ध टेक पोर्टलनी याबाबतची बातमी दिली आहे. 

Web Title : OnePlus ब्रांड बंद हो सकता है; Oppo विलय की अफवाहें तेज।

Web Summary : रिपोर्ट्स के अनुसार Oppo, OnePlus को भंग कर सकता है, इसे पूरी तरह से एकीकृत कर सकता है। सॉफ्टवेयर एकीकरण और ब्रांडिंग परिवर्तन से उपयोगकर्ता चिंतित हैं। मौजूदा उपयोगकर्ताओं को अपडेट मिलेंगे, लेकिन भविष्य के फोन Oppo ब्रांडेड हो सकते हैं। आधिकारिक पुष्टि का इंतजार है।

Web Title : OnePlus brand may shut down; Oppo merger rumors intensify.

Web Summary : Reports suggest Oppo may dissolve OnePlus, integrating it fully. Software integration and branding changes fueled user concerns. Existing users will receive updates, but future phones may be Oppo-branded. Official confirmation awaited.