शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
3
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
4
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
5
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
6
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
7
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
8
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
9
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
10
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
11
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
12
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
13
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
14
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
15
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
16
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
17
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
19
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
20
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

उद्यापासून पाच दिवस एमएनपी प्रक्रिया राहणार बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2019 06:03 IST

१६ डिसेंबरपासून मोबाइल पोर्टेबिलिटी तीन दिवसांंत

- खलील गिरकर मुंबई : मोबाइल ग्राहकांसाठी महत्त्वाची असलेली मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी (एमएनपी) प्रक्रिया बदलण्याचे निर्देश केंद्रीय दूरसंचार नियामक आयोगाने दिले असल्याने १० डिसेंबर ते १५ डिसेंबर दरम्यान एमएनपी प्रक्रिया बंद राहणार आहे. ट्रायच्या निर्देशानुसार, ९ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत एमएनपीसाठी अर्ज केलेल्या ग्राहकांचे मोबाइल क्रमांक पोर्ट करण्यात येतील. त्यानंतर नवीन एमएनपी प्रक्रिया राबवण्यासाठी १० डिसेंबर ते १५ डिसेंबर दरम्यान एमएनपी प्रक्रिया बंद राहणार आहे.

नवीन प्रक्रिया लागू झाल्यानंतर १६ डिसेंबरपासून एमएनपी सुविधा ग्राहकांना मिळेल. नवीन प्रक्रियेनुसार ग्राहकांना केवळ दोन दिवसांत एमएनपी सेवा मिळेल. मोबाइल क्रमांक समान ठेवून सेवा पुरवणारी कंपनी बदलण्याबाबतचा नवीन नियम १६ डिसेंबरपासून लागू होणार आहे. भारतीय दूरसंचार नियामक आयोगाने (ट्राय) त्याबाबत माहिती दिली आहे. युनिक पोर्टिंग कोडची मुदत आता केवळ ४ दिवस राहील. जम्मू-काश्मीर, आसाम, ईशान्य भारतात मात्र ही मुदत सध्याप्रमाणे ३० दिवस राहील, असे ट्रायने स्पष्ट केले आहे.

सध्या एमएनपी प्रक्रियेसाठी साधारणत: आठवडाभराचा कालावधी लागतो, मात्र ट्रायच्या नवीन नियमांची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर हा वेळ अवघ्या ३ दिवसांवर येईल. मात्र जर ग्राहकाला दुसऱ्या सर्कलमध्ये नंबर बदलायचा असेल तर त्यासाठी ५ दिवसांचा कालावधी लागेल. एमएनपी प्रक्रिया एक दिवसात करावी, असा निर्णय सुरुवातीला घेण्यात आला होता. मात्र दूरसंचार मंत्रालयाशी केलेल्या चर्चेनंतर व त्यांच्याकडून आलेल्या सूचनेनंतर ही मुदत ३ दिवस करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कर्नाटकात एमएनपीचे सर्वाधिक ग्राहक

विविध मोबाइल कंपन्यांच्या सेवेला कंटाळून ग्राहक दुसºया कंपनीची सेवा स्वीकारतात. सप्टेंबर महिन्यात ५३ लाख ९० हजार ग्राहकांनी एमएनपी सेवेचा लाभ घेतला होता. ही सेवा सुरु झाल्यापासून सप्टेंबर महिन्यापर्यंत तब्बल ४५ कोटी ७६ लाख ग्राहकांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. २५ नोव्हेंबर २०१० मध्ये या सेवेला प्रारंभ झाला होता. तर देशभरात ही सेवा २० जानेवारी २०११ पासून सुरु करण्यात आली होती. कर्नाटकात सर्वात जास्त म्हणजे ४ कोटी २० लाख ग्राहकांनी या सेवेचा लाभ घेतला आहे.

टॅग्स :MobileमोबाइलTRAI-Telecom Regulatory Authority of Indiaट्राय