अ‌ॅपल कंपनी लवकरच आणणार स्वत:चे ‘Search Engine’, गुगलला देणार टक्कर 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2020 02:18 PM2020-08-29T14:18:27+5:302020-08-29T15:04:48+5:30

अ‌ॅपल आपल्या स्पॉटलाइट सर्च इंजिनसाठी इंजीनिअर्सची नियुक्ती करत आहे.

Apple will soon launch its own search engine, a rival to Google | अ‌ॅपल कंपनी लवकरच आणणार स्वत:चे ‘Search Engine’, गुगलला देणार टक्कर 

अ‌ॅपल कंपनी लवकरच आणणार स्वत:चे ‘Search Engine’, गुगलला देणार टक्कर 

Next

अमेरिकेतील दिग्गज टेक कंपनी अ‌ॅपल लवकरच स्वत:चे सर्च इंजिन लाँच करणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे अ‌ॅपल कंपनी आता सर्च इंजिन असलेल्या गुगलला टक्कर देऊ शकते. रिपोर्टनुसार, अ‌ॅपल कंपनी सध्या आपल्या सर्च इंजिनवर (apple search engine) काम करत आहे.

अ‌ॅपल आपल्या स्पॉटलाइट सर्च इंजिनसाठी इंजीनिअर्सची नियुक्ती करत आहे. मॅक ओएसमध्ये दिलेले स्पॉटालाइट एक महत्वपूर्ण सर्च फीचर आहे. यामुळे युजर्स आपल्या मॅकबुकपासून वेबचा कॉन्टेंट सर्च करू शकतात. टेक वेबसाइट Coywolfच्या रिपोर्टमध्ये काही मुद्द्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. यामध्ये अशी हिंट मिळत आहे की, कंपनी आपले सर्च इंजिन आणू शकते आणि त्यावर काम करण्यास सुरवात केली आहे.

अ‌ॅपलच्या सर्च इंजिनसाठी नोकर भरती सुरु केली आहे. यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), मशीन लर्निंग (ML) आणि नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंगचा (NLP) उल्लेख करण्यात आला आहे. ज्यानुसार अ‌ॅपलने या पदांचा उल्लेख केला आहे, त्यामुळे असे दिसते की कंपनी आपल्या सर्च इंजिनमध्ये या सर्व नियुक्त्या करण्याच्या मनःस्थितीत आहे, असे समजते.

गुगल अ‌ॅपलला दरवर्षी आयफोन, आयपॅड आणि मॅक ओएसमध्ये डिफॉल्ट सर्च इंजिन ठेवण्यासाठी लाखो रुपये देते. रिपोर्टनुसार हा करार लवकरच संपुष्टात येऊ शकतो. CoyWolfच्या रिपोर्टनुसार, युके कंपटीशन अँड मार्केट अथॉरिटी अ‌ॅपल आणि गुगलच्या सर्च इंजिनच्या या करारावरून कडक भूमिका घेऊ शकते.

युके कंपटीशन अँड मार्केट अथॉरिटीच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, जगभरात अ‌ॅपलचा मार्केट शेअर खूपच जास्त आहे. गुगल सर्च डिफॉल्ट असल्याने इतर सर्च इंजिनाला मोबाइल फोन आणण्यासाठी संधी मिळत नाही, असे अथॉरिटीचे म्हणणे आहे. दरम्यान, अ‌ॅपल पहिल्यांदाच गुगलचा पर्याय म्हणून आपल्या डिव्हाइसमध्ये सर्च इंजिनचा वापर करू शकते. त्यानंतर कंपनी लोकांसाठी लाँच करले, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

आणखी बातम्या...

-  अमेरिकेत आता कोरोनाग्रस्तांना दिले जाणार रेमेडिसविर, मिळाली मंजुरी

- कोरोना स्पेशल विमा सुरक्षा कवच लोकप्रिय, १५ लाखांहून अधिक लोकांनी घेतला फायदा    

- Railway Recruitment 2020 : रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, परीक्षेशिवाय ४३२ जागा भरणार    

CoronaVirus News : रशिया सर्वात आधी 'या' देशाला देणार कोरोनावरील लस...    

आरबीआयने डेबिट, क्रेडिट कार्डशी संबंधित नियम बदलले; 30 सप्टेंबरपासून लागू होणार    

Web Title: Apple will soon launch its own search engine, a rival to Google

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.