Railway Recruitment 2020 : रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, परीक्षेशिवाय ४३२ जागा भरणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 08:17 PM2020-08-27T20:17:14+5:302020-08-27T20:19:01+5:30

या पदांसाठी इच्छुक उमेदवार ३० ऑगस्ट २०२० पर्यंत अर्ज दाखल करु शकतात.

Railway Recruitment 2020: Job opportunities in Railways, 432 posts will be filled without examination | Railway Recruitment 2020 : रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, परीक्षेशिवाय ४३२ जागा भरणार

Railway Recruitment 2020 : रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, परीक्षेशिवाय ४३२ जागा भरणार

Next
ठळक मुद्दे secr.indianrailways.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज दाखल करू शकतात. उमेदवारांची निवड ही मेरिट लिस्टनुसार केली जाईल.

नवी दिल्ली : भारतीयरेल्वे प्रशासनाने कोरोना संकंटादरम्यान ४३२ पदांची भरती जारी केली आहे. विशेष म्हणजे फक्त दहावी पास उमेदवार देखील नोकरीसाठी अर्ज दाखल करु शकतात. याशिवाय, ४३२ पदांसाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा होणार नाही. त्यामुळे दहावी पास उमेदवारांना चांगला फायदा होऊ शकतो. साऊथ ईस्ट सेंट्रल रेल्वेने ही भरती जारी केली आहे.

साऊथ ईस्ट सेंट्रल रेल्वेने जारी केलेल्या भरतीमध्ये कोपा, स्टेनोग्राफर (इंग्रजी), स्टेनोग्राफर (हिंदी), फिटर, इलेक्ट्रिशियन, वायरमन, इलेक्ट्रॉनिक-मॅकेनिक, आर.ए.सी मॅकेनिक, वेल्डर, प्लंबर, मेसन, पेंटर, कारपेंटर, मशीनिस्ट, टर्नर आणि मेटल वर्कर अशा एकूण ४३२ पदांसाठी ही भरती जारी करण्यात आली आहे.

या पदांसाठी इच्छुक उमेदवार ३० ऑगस्ट २०२० पर्यंत अर्ज दाखल करु शकतात. या भरतीत विविध पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रतेची अट ठेवण्यात आली आहे. यात विशेष म्हणजे १० पास उमेदवारही अर्ज दाखल करु शकतो. तसेच, १ जानेवारी २०२० रोजी उमेदवारांचे किमान वय १५ वर्षे असले पाहिजे परंतु २४ पेक्षा जास्त नसावे. उमेदवार secr.indianrailways.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज दाखल करू शकतात. उमेदवारांची निवड ही मेरिट लिस्टनुसार केली जाईल.

दरम्यान, कोरोना संकटाच्या काळात बेरोजगारी वाढल्यामुळे अनेकांना आपल्या नोकऱ्या गमावाव्या लागल्या. भारतासह जगभरात मंदीचे वातावरण आहे. या बिकट परिस्थितीमध्ये अनेकांच्या नोकऱ्याही गेल्या आहेत. अशा कठीण परिस्थितीमध्ये काही सरकारी कंपन्या, बँका आणि रेल्वेने बेरोजगारांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. 

आणखी बातम्या...

उद्धव ठाकरेंनी बिगर भाजपाशासित राज्यांचे नेतृत्व करावे- संजय राऊत

घर घेणाऱ्यांसाठी ठाकरे सरकारचा मोठा दिलासा, 31 डिसेंबरपर्यंत स्टॅम्प ड्युटीत मोठी कपात  

Accenture पाच टक्के कर्मचारी कपात करणार, भारतीय स्टाफवरही होणार परिणाम  

"मोदीजी, तुमच्याप्रमाणे विद्यार्थी 8000 कोटींच्या विमानातून परीक्षा द्यायला जात नाहीत"

'सुशांत सिंह राजपूतवर विषप्रयोग?', भाजपा नेत्याचा खळबळजनक दावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वात शक्तिशाली नेते, अभिनेत्री कंगना राणौतकडून ट्विट

आरबीआयने डेबिट, क्रेडिट कार्डशी संबंधित नियम बदलले; 30 सप्टेंबरपासून लागू होणार    

CoronaVirus News : रशिया सर्वात आधी 'या' देशाला देणार कोरोनावरील लस...    

स्वातंत्र्यानंतर १९ नेत्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली; यामध्ये १४ नेहरू-गांधी घराण्याबाहेरचे...    

Web Title: Railway Recruitment 2020: Job opportunities in Railways, 432 posts will be filled without examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.