पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वात शक्तिशाली नेते, अभिनेत्री कंगना राणौतकडून ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2020 09:06 PM2020-08-25T21:06:30+5:302020-08-25T21:09:01+5:30

कंगना राणौतने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतचा एक शानदार फोटो शेअर केला आहे.

kangana ranaut shares photo with pm modi calls him the most powerful man on earth | पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वात शक्तिशाली नेते, अभिनेत्री कंगना राणौतकडून ट्विट

पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वात शक्तिशाली नेते, अभिनेत्री कंगना राणौतकडून ट्विट

googlenewsNext
ठळक मुद्देगेल्या काही दिवसांपूर्वी कंगना राणौतच्या राजकारणाशी संबंधित असलेल्या पोस्टमुळे ती राजकारणात उतरणार असल्याची चर्चा रंगली होती.

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत सुरुवातीपासूनच पंतप्रधान नरेंद्र मोदींचे समर्थन करत आहे. ती अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करताना दिसली आहे. आता कंगना राणौतने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पंतप्रधान मोदींना सर्वात शक्तिशाली नेते म्हटले आहे. तसेच, फोटो शेअर करत कंगना राणौतने पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींचे कौतुक केले आहे.

कंगना राणौतने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतचा एक शानदार फोटो शेअर केला आहे. तसेच, पोस्टमध्ये लिहिले आहे की, "निश्चितच, पृथ्वीवरील सर्वात शक्तीशाली व्यक्ती आणि तरीही इतके नम्र". दरम्यान, कंगना राणौतने पंतप्रधान मोदींचे कौतुक करण्याची ही पहिली वेळ नाही. अनेक मुलाखतीमध्ये कंगना राणौतने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आदर आणि समर्थन व्यक्त केले आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी कंगना राणौतच्या राजकारणाशी संबंधित असलेल्या पोस्टमुळे ती राजकारणात उतरणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, या अफवांचे खंडन करीत आपल्याला सर्वाधिक अभिनयाची आवड असल्याचे कंगना राणौतने स्पष्ट केले होते.

कंगना राणौतने ट्विट केले होते, "मला राजकारणात भाग घ्यायचा आहे म्हणून मी मोदींना समर्थन देते, असे काही लोक समजतात. मात्र, त्यांना मी स्पष्टपणे सांगते की, माझे आजोबा १५ वर्षे काँग्रेसचे आमदार होते. माझे कुटुंब नेहमीच राजकारणाशी संबंधित आहे आणि मला गँगस्टर चित्रपटापासून दरवर्षी काँग्रेसकडून ऑफर येत आहे."

दरम्यान, राजकीय प्रवेशाबद्दल आणखी एकदा कंगना राणौतने भाष्य केले होते. "मणिकर्णिका चित्रपटानंतर भाजपानेही मला तिकीट देण्याची ऑफर दिली. मला माझे काम आवडते आणि मी कधीही राजकारणात जाण्याचा विचार केला नाही. तर जे लोक माझ्या आवडीच्या व्यक्तीला पाठिंबा दिल्यानंतर मला ट्रोल करीत आहेत, त्यांनी आता थांबले पाहिजे," असे कंगना राणौतने म्हटले होते.
 

Web Title: kangana ranaut shares photo with pm modi calls him the most powerful man on earth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.