शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
3
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
5
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
6
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
7
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
8
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
9
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
10
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
11
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
12
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
13
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

श्री पांडुरंग पालखीचे आळंदीला प्रस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 5:03 AM

टाळ, मृदुंगाच्या साथीने विठ्ठल नामाचा गजर करीत सुमारे १५ हजार वैष्णवांसह श्री पांडुरंग व श्री संत नामदेव महाराज पालखी सोहळ्याने बुधवारी श्री क्षेत्र आळंदीकडे प्रस्थान ठेवले.

पंढरपूर (जि़सोलापूर): टाळ, मृदुंगाच्या साथीने विठ्ठल नामाचा गजर करीत सुमारे १५ हजार वैष्णवांसह श्री पांडुरंग व श्री संत नामदेव महाराज पालखी सोहळ्याने बुधवारी श्री क्षेत्र आळंदीकडे प्रस्थान ठेवले.कैवल्यसम्राट चक्रवर्ती श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र आळंदी या २५ दिवसांच्या श्री पांडुरंग पालखी सोहळ्याचे आयोजन केले आहे़ संत नामदेवांचे वंशजांच्या वतीने श्री संत नामदेव महाराज पालखी सोहळा आळंदीला जातो़ श्री पांडुरंग पालखी सोहळ्याचे हे यंदा सहावे वर्ष आहे.श्री पांडुरंग पादुकांची विधिवत पूजा व आरती करण्यात आली. यावेळी सहअध्यक्ष ह. भ. प. गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, प्रारंभी मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, सोहळ्याचे अधिपती ह. भ. प. विठ्ठल महाराज वासकर आदी उपस्थित होते. मंदिरातील मुख्य मंडपातून पालखी खांद्यावर घेऊन ती नामदेव पायरी प्रवेशद्वारातून बाहेर काढण्यात आली. त्यानंतर तुकाराम भवन, चौफाळा, नाथ चौकमार्गे पुढे मार्गस्थ झाली़ सायंकाळी हा सोहळा भंडीशेगाव मुक्कामी पोहोचला.>गोपाळ काल्याने कार्तिकी यात्रेची सांगताकार्तिकी यात्रेची सांगता मंगळवारी गोपाळ काल्याने झाली. गोपाळपूर येथील गोपाळकृष्ण मंदिरात संत नामदेव महाराज, अंमळनेरकर महाराज, बापूसाहेब देहूकर महाराज, वासकर महाराज यांच्यासह विविध दिंड्या सकाळी लवकर मंदिराच्या ठिकाणी दाखल झाल्या. याठिकाणी काल्याचा कार्यक्रम झाल्यानंतर त्यांनी परतीचा प्रवास सुरू केला.