शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
3
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
4
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
5
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
6
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
7
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
8
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
9
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
10
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
11
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
12
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
13
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
14
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
15
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
16
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
17
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
18
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
19
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
20
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
Daily Top 2Weekly Top 5

राम मंदिराबाबतची पुनर्विचार याचिका राष्ट्रीय बंधुभावास मारक ठरेल : देवकीनंदन महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 12:03 IST

शालेय पाठ्यपुस्तकात रामायण, भगवद्गीतेचा समावेश करण्याची मागणी

ठळक मुद्देश्री ठाकूर महाराज यांचे सोलापुरात भागवत कथा प्रवचन सुरू आपली पिढी इंग्लंड आणि अमेरिकेला फॉलो करत आहे - श्री ठाकूर भारतीय संस्कृती ही ऋषी-मुनींच्या विचारांवर आधारित - श्री ठाकूर

सोलापूर : भारताची परंपरा राम आणि श्री कृष्णापासून सुरू होते़ अयोध्येत राम मंदिर व्हावे ही तर सर्व भारतीयांची इच्छा आहे़  यावर सुप्रीम कोर्टानेही निकाल दिला आहे़  राम मंदिर हे राष्ट्रीय एकात्मता आणि बंधुभाव यास प्रेरक ठरणार आहे़ असे असताना काहींनी मंदिर बांधकामाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे़ हे चुकीचे आहे़ त्यांची याचिका राष्ट्रीय बंधुभावास मारक ठरू शकते़ त्यामुळे त्यांनी याचिका मागे घेऊन राम मंदिर बांधकामास सहकार्य करावे, अशी अपेक्षा श्री देवकीनंदन ठाकूर महाराज यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केली.

श्री ठाकूर महाराज यांचे सोलापुरात भागवत कथा प्रवचन सुरू आहे़ त्यानिमित्त त्यांनी ‘लोकमत’शी विशेष बातचीत केली. ते म्हणाले, आपली पिढी इंग्लंड आणि अमेरिकेला फॉलो करत आहे़ त्यांची संस्कृती वेगळी आहे आणि आपली संस्कृती वेगळी आहे़ त्यांच्या संस्कृतीचा बेस वेगळ्या धर्मावर आधारित आहे आणि आपली संस्कृती राम आणि कृष्णाच्या परंपरेवर आधारित आहे़ अशा दोन्ही धर्मांचे संमिश्रण होणे हे काही चांगले नाही़ अशा चुकीच्या परंपरेला फॉलो होत असल्याने आजची पिढी दिशाहीन बनली आहे.

 भारतीय संस्कृती ही ऋषी-मुनींच्या विचारांवर आधारित आहे़ त्यांचे विचार आणि संस्कृती ही माणुसकी जपणारी आहे़ आजच्या संस्कृतीत माणुसकी कुठे आहे़ हैदराबाद येथे झालेला अत्याचार किती अमानवी आहे़ याचे विचार देखील करवत नाही़ आपण कुठे चाललो आहोत, याचा विचार होणे गरजेचे आहे़ धर्म मूल्याचे शिक्षण देण्याची गरज निर्माण झाली आहे़ त्याशिवाय पर्याय नाही़ राजकीय नेत्यांनी याबाबत गांभीर्याने विचार करावा़

...तर स्त्रियांचा योग्य सन्मान करतील- ठाकूर महाराज म्हणाले, स्वातंत्र्यानंतरच्या नेत्यांनी भारतीय शिक्षण व्यवस्था धर्म आणि न्यायप्रिय न ठेवता व्यावहारिक बनवली़ अशा शिक्षणामुळेच अनेक पिढ्या व्यावहारिक बनल्या़ त्यांना सामाजिक भान राहिलेले नाही़ अशा व्यावहारिक शिक्षण व्यवस्थेत महिलांचा सन्मान कुठे आहे़ भारताची परंपरा राम आणि कृष्णापासून सुरु होते़ त्यांचे आदर्श विचार आणि आचरण आपल्या शिक्षण व्यवस्थेत का नको़ शालेय जीवनापासून प्रभू राम आणि श्रीकृष्णाच्या विचारांचा समावेश केल्यास भविष्यातील पिढ्या स्त्रियांचा योग्य सन्मान करतील. त्यामुळे शालेय पाठ्यपुस्तकात रामायण आणि भगवद्गीतेचा समावेश करा़ धर्माचे विचार आणि मूल्य हे शिक्षणाद्वारे आत्मसात करायला लावा, म्हणजे ते स्त्रियांचा योग्य सन्मान करतील़़ त्यांना सामाजिक भान देखील येईल़ जबाबदारीची जाणीव राहील़

टॅग्स :SolapurसोलापूरAdhyatmikआध्यात्मिक