कांद्याला मिळाला इनमिन ५० पैसे भाव; ७३ गोणी खर्च वजा जाऊन हाती आले फक्त ४०० रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 10:19 IST2026-05-09T10:18:22+5:302026-05-09T10:19:29+5:30

करमाळा तालुक्यातील पांगरे येथील शेतकरी अंकुश अण्णा गुंजाळ यांनी ७३ गोणी कांदा विकल्यानंतर सर्व खर्च वजा जाता त्यांच्या हातात केवळ ४०० रुपये राहिले आहेत. बळीराजाच्या नशिबी आलेली दैना पुन्हा एकदा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाहायला मिळाली.

Onions got a minimum price of 50 paise; 73 sacks were sold and after deducting the cost, only Rs 400 was received. | कांद्याला मिळाला इनमिन ५० पैसे भाव; ७३ गोणी खर्च वजा जाऊन हाती आले फक्त ४०० रुपये

कांद्याला मिळाला इनमिन ५० पैसे भाव; ७३ गोणी खर्च वजा जाऊन हाती आले फक्त ४०० रुपये

नासिर कबीर

करमाळा (जि. सोलापूर) : बाजार समितीमध्ये कांद्याला ठोक भाव किलोला फक्त ५० पैसे इतका मिळाल्याने शेतकरी अक्षरशः रडकुंडीला आला आहे.

करमाळा तालुक्यातील पांगरे येथील शेतकरी अंकुश अण्णा गुंजाळ यांनी ७३ गोणी कांदा विकल्यानंतर सर्व खर्च वजा जाता त्यांच्या हातात केवळ ४०० रुपये राहिले आहेत. बळीराजाच्या नशिबी आलेली दैना पुन्हा एकदा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाहायला मिळाली.

शेतकरी रडकुंडीला : गुंजाळ यांनी २१ एप्रिल रोजी सोलापूरच्या शरीफ ट्रेडर्स या आडत दुकानावर ७३ पिशव्या कांदा विक्रीसाठी आणला होता. मात्र, बाजारपेठेत कांद्याची आवक वाढल्याने व मागणी घटल्याने त्यांच्या कांद्याला प्रति किलो केवळ ५० पैसे इतकाच भाव मिळाला. कांद्याच्या विक्रीतून मिळालेली एकूण रक्कम व त्यावर झालेला खर्च यांचा ताळमेळ बसवणे कठीण झाले आहे. ७३ पिशव्या कांदा विकल्यानंतर गुंजाळ यांना एकूण ५,०६८ रुपये मिळाले होते. गाडी भाडे, हमाली, तोलाई, इतर आडत खर्च वजा जाता, प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या हाती ४०० रुपयेच पडले.

Web Title : प्याज की कीमतों में गिरावट: 73 बैग बेचने के बाद किसान को केवल ₹400 मिले

Web Summary : सोलापुर के किसान अंकुश गुंजाल को प्याज के लिए केवल ₹0.50/किलो मिला। 73 बैग पर खर्च के बाद, उन्होंने केवल ₹400 कमाए, जो कम कीमतों और उच्च लागत के कारण बाजार में किसानों की दुर्दशा को उजागर करता है।

Web Title : Onion Price Crash: Farmer Earns Mere ₹400 After Selling 73 Bags

Web Summary : Solapur farmer Ankush Gunjal received a meager ₹0.50/kg for his onions. After expenses on 73 bags, he only earned ₹400, highlighting farmers' plight in the market due to low prices and high costs.