शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरात परदेशी पक्ष्यांची मांदियाळी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 02:19 IST

पावसाने जलाशये तुडुंब भरली; रशिया, कोरिया, फिलिपाईन्स, चीनमधील पाहुणे आले

सोलापूर : हिवाळ्याची चाहुल लागताच सोलापुरात रशिया, कोरिया, पाकिस्तान, फिलिपाईन्स, चीन या देशांचा प्रवास करून जगातील ७५ ते १०० शिकारी पक्षी सोलापुरात दाखल झाल्याची माहिती वाईल्डलाईफ फोटोग्राफर आणि पक्षीमित्र डॉ़ व्यंकटेश मेतन यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

सोलापूर हे पक्ष्यांचं नंदनवन आहे, हे आता सर्वांना परिचितच आहे़ दरवर्षी हिवाळ्यात परदेशातून अनेक पक्षी स्थलांतर करून सोलापूर आणि आजूबाजूच्या परिसरात येतात़ यावर्षीसुध्दा अनेक परदेशी पक्ष्यांचं सोलापुरात आगमन झालेलं आहे़ यात मोन्टोगो हॅरियर (मोंटुग्याचा भोवत्या), पॅलिड हॅरियर (पांढऱ्या भोवत्या), युरेशियन मार्श हॅरियर (दलदली भोवत्या), पाईड हॅरियर (कवड्या भोवत्या/हारीण), कॉमन केस्ट्रल (सामान्य खरूची), रेड नेक फाल्कन (लाल डोक्याचा ससाणा), युरेशियन स्पॅरो हॉक (युरेशियन चिमणीमार ससाणा) हे शिकारी पक्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करून सोलापूर परिसरात आले आहेत.

उजनी, हिप्परगा, कुरनूर, होटगी धरण परिक्षेत्राचे आवार मोठे असल्याने येथे मुबलक प्रमाणात जैवविविधता आढळते. त्यामुळे परदेशी दुर्मिळ पक्ष्यांचा सोलापूरकडील ओढा वाढला आहे़ मागील आठवड्यात कुरनूर धरणावर आॅस्प्रे हा शिकारी पक्षीदेखील दिसला गेला़ त्याचे आवडते खाद्य मासे आहे. हा एक विश्वव्यापी पक्षी असून, याचे प्रजनन केवळ अमेरिकेतील भौगोलिक परिस्थितीत होते. वास्तविक हा पक्षी आपल्याकडे जास्त प्रमाणात आढळत नसल्याचेही पक्षीमित्रांनी सांगितले.

शिकारी पक्षी शेतकऱ्यांचे मित्र
परदेशातून आलेले शिकारी पक्षी हे शेतकºयांचे मित्र बनले आहेत़ शेतीला उपद्रव करणारे मोठे किडे, कीटक, नाकतोडे, टोळ, उंदीर, घुशी, ससे, मासे, साप, पक्षी, फडफड, लहान सस्तन प्राणी, सरडे यांची शिकार करून नैसर्गिक नियंत्रक म्हणून ते कार्य करतात़