Jayant Patil got wet, Pandharpurkar remembered the meeting of Ansatar | Jayant Patil : जयंत पाटील भिजले, अन् सातारच्या सभेची झाली पंढरपूरकरांना आठवण

Jayant Patil : जयंत पाटील भिजले, अन् सातारच्या सभेची झाली पंढरपूरकरांना आठवण

मंगळवेढा (जि. सोलापूर) : पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे भगीरथ भालके यांच्या प्रचाराची सभा सुरू असताना पाऊस सुरू झाला. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे भाषण न थांबवता भिजतच विरोधकांवर बरसले. यावेळी सर्वांना साताऱ्यामधील शरद पवारांच्या पावसातील त्या सभेची आठवण झाली. 
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात पोटनिवडणुकीच्या निमित्ताने भगीरथ भालके यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मंगळवेढा तालुक्यातील सलगर बु. येथे सभा घेतली. सभास्थळी वरुणराजाने हजेरी लावली; मात्र सभा न थांबविता जयंत पाटील भर पावसात विरोधकांवर तुटून पडले. सत्ता गेल्यामुळे भाजपच्या लोकांना वेड लागले आहे. पाण्याविना मासा तडफडतो, असेही ते म्हणाले.

Web Title: Jayant Patil got wet, Pandharpurkar remembered the meeting of Ansatar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.