शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाची धास्ती; आधीच मुहूर्त कमी, त्यातही बुकिंग थंडावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 13:04 IST

१५ एप्रिलपर्यंत दोनच मुहूर्त; आता मंगल कार्यालय प्रमुखांना प्रतीक्षा ग्राहकांची

ठळक मुद्देसामुदायिक ठिकाणी गर्दी झाल्यास आजारांचा फैलाव होऊ शकतो, यासाठी शासनाने असे कार्यक्रम रद्द करण्याचा आदेश दिला मार्च महिन्यात मुहूर्त कमी असल्याने खूप कमी प्रमाणात असे कार्यक्रम होत आहेतसध्या मंगल कार्यालयासह मंगल भांडार, केटरर्स यांच्याकडे बुकिंग होत नसल्याचे चित्र

शीतलकुमार कांबळे

सोलापूर : कोरोना आजाराचा फटका फक्त काही शासकीय, खासगी कामालाच नाही तर मंगल कार्यालादेखील बसला आहे. येत्या महिनाभरात १९ मार्च आणि १५ एप्रिल असे दोनच मुहूर्त आहेत. मुहूर्त कमी असल्याने त्या दिवशी लग्न, वाढदिवस, साखरपुडा, बारसे आदी कार्यक्रमांसाठीचे नियोजन केले जाते. मात्र सध्या मंगल कार्यालयासह मंगल भांडार, केटरर्स यांच्याकडे बुकिंग होत नसल्याचे चित्र आहे.

शहरात सोलापूर मंगल भांडार असोसिएशन अंतर्गत ७५ सदस्य आहेत. तर या संघटनेकडे नोंदणी नसलेले छोटे-मोठे असे सुमारे १०० मंगल भांडार व्यावसायिक आहेत. या व्यावसायिकांकडेही बुकिंगची हीच स्थिती असल्याचे सोलापूर मंगल भांडार असोसिएशनचे अध्यक्ष वीरेंद्र हिंगमिरे यांनी सांगितले. लग्न समारंभ असल्यास महिन्याआधी बुकिंग करण्यात येत असते तर छोटे कार्यक्रम असल्याने चार ते आठ दिवस आधी बुकिंग करतात. सध्या कोणत्याही प्रकारच्या कार्यक्रमाचे बुकिंग होत नाही.

सामुदायिक ठिकाणी गर्दी झाल्यास आजारांचा फैलाव होऊ शकतो. यासाठी शासनाने असे कार्यक्रम रद्द करण्याचा आदेश दिला आहे. यामुळे कार्यक्रमांचे नियोजन केले जात नाही. तसेच मार्च महिन्यात मुहूर्त कमी असल्याने खूप कमी प्रमाणात असे कार्यक्रम होत आहेत.

रविवारचा नियोजित कार्यक्रम रद्द- जुळे सोलापूर येथे १५ मार्च रोजी प्रथमेश स्पोर्ट क्लबतर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यासाठी इव्हेंट कंपनी व मंगल भांडार यांना काम देण़्यात आले होते. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये या कारणासाठी हा नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. जिल्हाधिकाºयांनी गर्दी न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचे पालन करुन हा कार्यक्रम रद्द केला आहे. या आजाराचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर कार्यक्रम पुन्हा घेणार असल्याचे संयोजक ज्योतिर्लिंग शिंदे यांनी सांगितले.

एखाद्या महिन्यात कमी मुहूर्त असल्यास मुहूर्त असलेल्या दिवशी मंगल कार्यालय, मंगल भांडार यांची मोठ्या प्रमाणात बुकिंग होत असते. सध्या आमची बुकिंगची वही रिकामी आहे. पुढील महिन्यात येणाºया मुहूर्तावरही कोरोनाचे संकट दिसत आहे. याचा फटका मंगल कार्यालय, केटरर्स, मंगल भांडार, इव्हेंट कंपन्या यांनादेखील बसण्याची शक्यता आहे.- वीरेंद्र हिंगमिरे, अध्यक्ष, सोलापूर मंगल भांडार असोसिएशन

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोनाmarriageलग्न