गावी परतण्यासाठी ती फॅमिली आली तब्बल सोळाशे किलोमीटर दुचाकीवर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2020 11:40 AM2020-04-02T11:40:17+5:302020-04-02T11:43:31+5:30

बिस्कीट खात अन् पायी चालतही निघाली अनेक कुटुंबं गावाकडे परतू लागली

The family came to the city for about sixteen kilometers on a bike | गावी परतण्यासाठी ती फॅमिली आली तब्बल सोळाशे किलोमीटर दुचाकीवर 

गावी परतण्यासाठी ती फॅमिली आली तब्बल सोळाशे किलोमीटर दुचाकीवर 

googlenewsNext
ठळक मुद्देसोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात बागकामांसाठी अनेक परप्रांतीय मजूर येऊन स्थायिकबेरोजगार बनलेली ही मंडळी वाहनांअभावी चालत आपल्या राज्याकडे निघाली ‘कितने भी दिन लगेंगे... लेकीन हम अपने घर वापस जायेंगे’ असा निर्धार व्यक्त करत ही मंडळी चालत पुढे गेली

शीतलकुमार कांबळे 

सोलापूर : बेंगलोर से राजस्थान के भिलवाडा जा रहे है. वहॉँ पे तो कोई रहने नही दे रहा इसलिए राजस्थान जा रहे है, आपको मारना हे तो मारो साहब मगर हम वापस नही जाएंगे. हमे अपने घर जाने दो, अशा शब्दात आईस्क्रिम विक्रेत्या कुटुंबांतील व्यक्ती जागोजागी चौकशी करणाºयांना उत्तरे देत होती.

बंगळुरु येथे आईस्क्रिम विक्रीचा व्यवसाय करणारे सहा जण दोन बाईकवरुन जात होते. सोमवारी बंगळुरुमधून निघाल्यानंतर बुधवारी ते सोलापुरात पोहोचले. येथून तुळजापूर- उस्मानाबाद-बीड-औरंगाबाद मार्गे मध्यप्रदेश नंतर राजस्थान येथे जात आहेत. देशभर लॉकडाऊन केल्यानंतर घर मालकाने त्या कुटुंबीयांना घर सोडण्यास सांगितले. तसेच तीन महिन्याचे भाडे मागितले. आता समोर काही पर्याय दिसत नसल्याने त्यांनी बाईकवरच आपला प्रवास सुरु केला. सोलापुरात येईपर्यंत ६०० किलोमीटरचा प्रवास झाला होता.

पुढे आणखी सुमारे एक हजार किलोमीटरचा प्रवास बाकी आहे. कर्नाटक सीमेवर त्यांची गाडी बिघडली. दुरुस्त करणाºयाने ३ हजार ५०० रुपये घेतले. पण गाडी व्यवस्थित दुरुस्त केली नसल्याचे त्यांनी सांगितले. बुधवारी सकाळपासून फक्त बिस्कीट खाऊनच ते प्रवास करत आहेत. याची माहिती मिळताच प्रार्थना फाउंडेशनचे प्रसाद मोहिते यांनी त्यांना जेवण दिले.

लॉकडाऊन करण्यापूर्वी थोडा वेळ द्यायचा होता
- जगभर कोरोना व्हायरस धुमाकूळ घालत आहे. या आजारामुळे अनेकांचे जीव गेले आहेत. या काळजीपोटी सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतला. आजार पसरु नये अशी त्यांची भूमिका होती. पण, ज्यांना घर आहे त्यांचे ठिक आम्हाला घरच नाही. लॉकडाऊन पूर्वी थोडा वेळ दिला असता तर आम्ही आमच्या घरी पोहोचलो असतो. सध्या सगळीकडूनच संकटे येत आहेत.

सहाशे किलोमीटरचा प्रवास आत्तापर्यंत केला आहे. आणखी एक हजार किलोमीटर जायचे आहे. रस्त्यात कितीही अडथळे आले तरी घरी पोहोचायचे आहे. मरण आले तर आमच्या गावातच यावं.
- कैलास कुमावत

तळपायाला आले फोड... 
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात बागकामांसाठी अनेक परप्रांतीय मजूर येऊन स्थायिक झाले आहेत. मात्र कर्फ्यूमुळे सर्व व्यवहारच ठप्प झाल्याने बेरोजगार बनलेली ही मंडळी वाहनांअभावी चालत आपल्या राज्याकडे निघाली आहेत. पंढरपूरहून मध्यप्रदेशातील आपल्या गावी निघालेली ही मंडळी मोडनिंब येथे आली असता त्यांची सोय करण्याचा शब्द स्थानिक नागरिकांनी दिला होता; मात्र ‘कितने भी दिन लगेंगे... लेकीन हम अपने घर वापस जायेंगे’ असा निर्धार व्यक्त करत ही मंडळी चालत पुढे गेली. विशेष म्हणजे अनेकांच्या तळपायाला फोडही आले आहेत.

Web Title: The family came to the city for about sixteen kilometers on a bike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.