शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या धास्तीने लोकनाट्य कला केंद्रातील कलाकारही आपापल्या गावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 12:45 IST

मोडनिंब येथील लोकनाट्य केंद्राकडे रसिकांनीच फिरविली पाठ

ठळक मुद्देमोडनिंबच्या या कलावंतांची कला पाहण्यासाठी महाराष्ट्रातून अनेक रसिक हौसेने मोडनिंबला येतातकोरोनाच्या धास्तीने रसिकांनीच पाठ फिरविल्याने गर्दी कमी होऊ लागलीराज्य शासनाने सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्यातील शाळा, महाविद्यालयांना ३१ मार्चपर्यंत सुटी जाहीर

मोडनिंब : कोरोनाची धास्ती घेत मोडनिंब कला केंद्रातील कलावंतही आता गावाकडे जाऊ लागले आहेत़ कारण सध्या कला केंद्राकडे कोरोनाच्या भीतीने रसिकांनीही पाठ फिरविली आहे़ त्यामुळे कलावंतांनी हा निर्णय घेतला आहे.

राज्य शासनाने सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्यातील शाळा, महाविद्यालयांना ३१ मार्चपर्यंत सुटी जाहीर केली आहे़ याची दखल कला केंद्रातील कलावंतांनीही घेतली आहे़ सावधानतेचा इशारा म्हणून मोडनिंब येथील कला केंद्रातील अनेक कलावंत आपल्या गावी जात आहेत.मोडनिंब येथे पाच लोकनाट्य कला केंद्रे आहेत़ या सर्व कला केंद्रांमध्ये ४०० च्या आसपास कलावंत आहेत़ मोडनिंबच्या या कलावंतांची कला पाहण्यासाठी महाराष्ट्रातून अनेक रसिक हौसेने मोडनिंबला येतात मात्र कोरोनाच्या धास्तीने रसिकांनीच पाठ फिरविल्याने गर्दी कमी होऊ लागली़ थिएटरमधील कलावंतांनी घरी जाणे पसंत केले.

वैशाली काळे म्हणाल्या, आमचे सर्व कलाकार कोरोनाच्या भीतीमुळे घराकडे जाणे पसंत करू लागले तर अनेक कलावंत, ढोलकीवादक, पेटी आणि तबलावादक यांची  शाळेमध्ये असणारी मुले शाळांना सुटी असल्यामुळे घरी आलेली आहेत़ आपल्या मुलाबाळांसह राहावे असे कलावंतांनाही वाटू लागले आहे़ त्यामुळे हे कलाकार गावी निघाले.

नटरंग व राधिका कला केंद्राचे मालक किसनआप्पा जाधव यांना विचारले असता कलावंतांनी आपापल्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. आम्ही त्यास तत्काळ दुजोरा दिला आहे. कोरोनाचे सावट कमी होताच पुन्हा पूर्ववत कलाकेंद्रे सुरू राहतील, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोनाHealthआरोग्य