शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

डॉली चायवाला एका शोसाठी तब्बल किती पैसे घेतो? काय काय मागण्या करतो? झाला धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 19:39 IST

Dolly Chaiwala: एखाद्या शोमध्ये जाण्यासाठी डॉली चायवाला किती पैसे घेतो, काय काय डिमांड करतो, याबाबत धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे.

Dolly Chaiwala: गेल्या काही दिवसांपासून डॉली चायवाला हा चर्चेचा विषय ठरत आहे. बिल गेट्स यांनी भारत भेटीदरम्यान डॉली चायवालाच्या टपरीलाही भेट दिली होती. डॉली चायवालाच्या टपरीवर बिल गेट्स चहा पितानाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. नागपूरच्या रस्त्यावर चहा विकणाऱ्या डॉली चायवालाच्या अनोख्या स्टाइलमुळे तो नेहमी चर्चेत असतो. सोशल मीडियावर डॉली चायवालाचे फॉलोवर मोठ्या प्रमाणात असल्याचे म्हटले जात आहे. परंतु, डॉली चायवाला एका शोसाठी किती पैसे घेतो, डॉली चायवाला काय काय मागण्या करतो, याबाबत एका पॉडकास्टमध्ये धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. 

डॉली चायवाला आता एक सेलिब्रिटी बनला आहे. मालदीवच्या समुद्रकिनाऱ्यावर चहा बनवता दिसला होता. समुद्र किनाऱ्यावर फिरणाऱ्या लोकांना चहा बनवून देतानाचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता. डॉली चायवाला कोणत्याही शोमध्ये जाण्यासाठी मोठी डिमांड करतो. डॉली चायवाला याच्याबद्दल एक धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. डॉली चायवाला याच्याबद्दल हा खुलासा कुवेती फूड व्लॉगरने केला आहे. AK Food Vlog च्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या फूड व्लॉगरने डॉली चायवाला याच्याबद्दल एक मोठा किस्सा सांगितला आहे.

 त्या व्यक्तीच्या मागण्या ऐकून धक्काच बसला

डॉली चायवाला याला कुवेतला बोलवायचे होते. डॉली चायवाला याला फोन केला. त्या व्यक्तीच्या मागण्या ऐकून मलाच मोठा धक्का बसला. फूड व्लॉगर फखरूद्धीन याने म्हटले की, तो डॉली चायवाला एका शोसाठी तब्बल ५ लाख रूपये घेतो. हेच नाही तर त्याला फाइव्ह स्टार किंवा फोर स्टार हॉटेलचे बुकिंग पाहिजे. यासोबतच त्याच्यासोबत एक व्यक्तीही असणार त्याचीही सर्व व्यवस्था करायची. त्याने खरोखरच मला फोनवर हे सांगितले. मी माझी ओळख सांगूनही तो माझ्याशी स्वतः येऊन बोलला नाही. तर त्याचा मॅनेजर बोलला. पाच लाख रूपये फीस ही फक्त एका दिवसाची असणार हे मला सांगण्यात आले, असा दावा करण्यात आला आहे.

दरम्यान, डॉली चायवाला याच्याबद्दलच्या हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला असून, हा व्हिडिओ आतापर्यंत २ कोटींपेक्षा अधिक लोकांनी बघितला आहे. खरोखरच डॉली चायवाला हा इतकी जास्त फी घेतो? असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे. या व्हिडिओबाबत डॉली चायवाला याच्याकडून काहीच खुलासा हा करण्यात आलेले नाही, अशी माहिती मिळाली आहे.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेSocial Mediaसोशल मीडिया