राजाचे कपडे घालून अन् तलवार घेऊन पाकिस्तानच्या पत्रकाराचं रिपोर्टिंग, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2020 12:42 IST2020-01-16T12:35:53+5:302020-01-16T12:42:39+5:30

पाकिस्तानातील पत्रकाराचा हा व्हिडीओ व्हायरल झाला असून लोक पोट धरून हसत आहेत.

Video : Pakistan journalist Amin Hafeez emperor avatar while reporting goes viral | राजाचे कपडे घालून अन् तलवार घेऊन पाकिस्तानच्या पत्रकाराचं रिपोर्टिंग, व्हिडीओ व्हायरल

राजाचे कपडे घालून अन् तलवार घेऊन पाकिस्तानच्या पत्रकाराचं रिपोर्टिंग, व्हिडीओ व्हायरल

पाकिस्तानचा लोकप्रिय पत्रकार चॉंद नबावचं रिपोर्टिंग कुणीही विसरू शकत नाही. त्याच्या वेगवेगळ्या व्हिडीओंनी सोशल मीडियात धुमाकूळ घातला होता. त्यानंतर आलेल्या 'बजरंगी भाईजान' या सलमानच्या सिनेमातही त्याची भूमिका नवाजुद्दीन सिद्दीकीने साकारली होती. अशातच आता पाकिस्तानातील आणखी एका पत्रकाराचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

या व्हिडीओत हा पाकिस्तानातील पत्रकार एका राजासारखे कपडे घालून रिपोर्टिंग करतो आहे. केवळ कपडेच नाही तर त्याच्या हातात तलवार देखील आहे. त्याचं हे रूप पाहून सोशल मीडियातील लोकांमध्ये एकच हशा पिकला आहे.

अमीन हापिज असं या पत्रकाराचं नाव असून याआधीही त्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. याआधी त्याने एका गाढवावर बसून रिपोर्टिंग केलं होतं. त्यामुळे त्याचा व्हिडीओ व्हायरल होऊन तो चर्चेत आला होता.


Web Title: Video : Pakistan journalist Amin Hafeez emperor avatar while reporting goes viral