Video : याची फुगे फोडण्याची स्टाईल बघून तुम्हीही म्हणाल, बाबो...लढाईला निघाला की काय ह्यो?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2019 16:06 IST2019-08-14T16:05:45+5:302019-08-14T16:06:12+5:30

कुणाला कशात आनंद वाटेल किंवा मजा येईल काही सांगता येत नाही. कुणाला तोडण्यात तर कुणाला काही फोडण्यात मजा येऊ शकते.

Jan hakon Erichsen balloon knife art videos goes viral | Video : याची फुगे फोडण्याची स्टाईल बघून तुम्हीही म्हणाल, बाबो...लढाईला निघाला की काय ह्यो?

Video : याची फुगे फोडण्याची स्टाईल बघून तुम्हीही म्हणाल, बाबो...लढाईला निघाला की काय ह्यो?

कुणाला कशात आनंद वाटेल किंवा मजा येईल काही सांगता येत नाही. कुणाला तोडण्यात तर कुणाला काही फोडण्यात मजा येऊ शकते. Jan Hakon Erichsen या व्यक्तीने त्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याचा हा व्हिडीओ पाहून हसावं की रडावं हेच सुचत नाहीये.

जेन हा एक व्हिज्युअल आर्टिस्ट आहे. त्यासोबतच तो स्वत:ला एक फुगे फोडणाराही सांगतो. त्याने त्याचे वेगवेगळ्या स्टाईलने फुगे फोडण्याचे अनेक व्हिडीओ शेअर केले आहेत.

जेन हा वेगवेगळ्या स्टाईलने फुगे फोडतो. इतक्या की, असे फुगे फोडण्याचा कधी कुणी विचारही केला नसेल. तो कधी चेहऱ्यावर चाकू बांधून तर गुडघ्यांवर चाकू बांधून फुगे फोडतो.

त्याचे इन्स्टाग्रामवरही अनेक व्हिडीओ असून त्याचे तब्बल ३ लाखांपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. जेन सांगतो की, काहीतरी गंमत करायची म्हणून तो अशाप्रकारचे व्हिडीओ तयार करतो. त्याचं मत आहे की, हे एकप्रकारचं Absurd Art आहे.

Web Title: Jan hakon Erichsen balloon knife art videos goes viral