शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
3
Top Marathi News LIVE Updates: रिक्षा-टॅक्सी चालकांच्या 'मराठी सक्ती'ला मुदतवाढ?, १ मेचा मुहूर्त टळण्याची शक्यता
4
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
5
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
6
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
7
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
9
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
10
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
11
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
12
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
13
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
14
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
15
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
16
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
17
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
18
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
19
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
20
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कणकवलीच्या सिद्धेश सावंतचे साहस

By admin | Updated: November 14, 2014 00:14 IST

हिमालय पर्वतावर चालण्याचे ‘अ‍ॅडव्हेंचर’ प्रशिक्षण

कणकवली : कणकवली कॉलेजमधील तृतीय वर्ष कला या वर्गातील राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक सिद्धेश संतोष सावंत याने हिमालय पर्वतावर चालण्याचा अ‍ॅडव्हेंचर प्रशिक्षण कॅम्प नुकताच यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. हा कॅम्प हिमाचल प्रदेश शासनाच्यावतीने अटलबिहारी वाजपेयी इन्स्टिट्युट आॅफ माऊंटनीअरिंग अ‍ॅन्ड अलाईड स्पोटर््स या संस्थेने कुलू मनाली (हिमाचल प्रदेश) येथे आयोजित केला होता. या कॅम्पचा मुख्य उद्देश म्हणजे देशातील युवकांमध्ये गिर्यारोहणाची आवड निर्माण व्हावी, त्यांच्यामध्ये सामाजिक जाणीवा व नेतृत्व गुण विकसित व्हावेत, साहस निर्माण व्हावे असा आहे. भारतातील एकूण ६६ स्वयंसेवक या कॅम्पमध्ये सहभागी झाले होते. त्यामध्ये मुंबई विद्यापीठाच्या १० स्वयंसेवकांनी सहभाग नोंदविला. सिद्धेश सावंत हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव स्वयंसेवक आहे.सिद्धेश सावंत याने हिमालय पर्वतावर हनुमान डिंबा या भागामध्ये दोराच्या सहाय्याने पर्वतावर चढणे, खाली उतरणे, नदी पार करणे आदी साहसी प्रकारांमध्ये सहभाग घेतला होता. एकूण सहा दिवसांच्या कालावधीमध्ये त्याने पर्वतावर ७० किलोमीटर म्हणजेच १० हजार ५०० फूट उंचीपर्यंत पर्वतावर चढण्याची कामगिरी यशस्वीपणे पार पाडली. यावेळी त्याने थंडगार हवा व बर्फावरून चालण्याचा आणि घसरण्याचा आनंद लुटला. कॉलेजमधील राष्ट्रीय सेवा योजना विभागांतर्गत विविध उपक्रमात सिद्धेश सावंत याचा सक्रीय सहभाग असतो. त्याच्या अंगी नेतृत्व गुणकौशल्ये आहेत. जून २०१४ मध्ये नागपूर येथे झालेला आव्हान कॅम्प त्याने यशस्वीरित्या पूर्ण केला आहे.सिद्धेश सावंत याचे या साहसी कामगिरीबद्दल कणकवली कॉलेज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भाईसाहेब खोत, चेअरमन पी. डी. कामत, सचिव विजयकुमार वळंजू तसेच प्राचार्य डॉ. संभाजीराव शिंदे आदी मान्यवरांनी अभिनंदन केले आहे. प्राचार्य डॉ. शिंदे यांच्या हस्ते सिद्धेश सावंत याला प्रमाणपत्र आणि गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. सिद्धेश सावंत याला राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा. डॉ. खंडेराव कोतवाल यांचे मार्गदर्शन तसेच कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. बाळकृष्ण गावडे व प्रा. बाळासाहेब राठोड यांचे प्रोत्साहनलाभले. (प्रतिनिधी)