शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
3
Top Marathi News LIVE Updates: रिक्षा-टॅक्सी चालकांच्या 'मराठी सक्ती'ला मुदतवाढ?, १ मेचा मुहूर्त टळण्याची शक्यता
4
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
5
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
6
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
7
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
9
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
10
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
11
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
12
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
13
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
14
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
15
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
16
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
17
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
18
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
19
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
20
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील ठेकेदाराचा जिल्ह्यात ‘उदय’

By admin | Updated: August 26, 2015 00:20 IST

सिंधुदुर्गनगरीत जोरदार चर्चा : कोट्यवधीची कामे एकाच ठेकेदाराला

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषद व महसूल विभागातील सभागृहे, सभापतींची दालने व कार्यालयीन दालनांचे नूतनीकरण व सुशोभिकरणाच्या कोट्यवधी रुपयांच्या कामाचा ठेका सांगली जिल्ह्यातील ठेकेदाराला देण्यात आला आहे. यामागे एका ‘बड्या’ व्यक्तीचा कृपाशिर्वाद असल्याचे बोलले जात असून एकाच ठेकेदाराला कोट्यवधी रुपयांचा ठेका देण्यामागचे गौडबंगाल काय? अशी जोरदार चर्चा सध्या जिल्हा परिषद भवनात दबक्या आवाजात सुरु आहे.कोट्यवधी रुपये खर्च करून नवीन बांधलेल्या जिल्हा नियोजन समितीचे काम असो अथवा जिल्हा परिषद भवनातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहाचे नूतनीकरण, सभापती दालनांचे नूतनीकरण, ई-आॅफिस, पत्रकार कक्षाचे नूतनीकरण ही सर्व कामे या संबंधित ठेकेदाराला देण्यात आली आहेत. एक-सव्वा वर्षापूर्वीची गोष्ट विचारात घेतली तर या संबंधित ठेकेदाराला जिल्हा परिषद कर्मचारी वसाहतीच्या डागडुजीसाठी ५० लाखांचे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले होेते. मात्र काही महिन्यातच या बोगस कामांचा पर्दाफाश झाला अन करण्यात आलेले निकृष्ट काम सर्वांच्या समोर आले. या संबंधित ठेकेदाराविरोधात सर्व कर्मचारी एकवटत या कामाची चौकशी करण्याची मागणी केली. शासकीय पातळीवर त्याची चौकशीही लावण्यात आली. मात्र त्या संबंधित ठेकेदारास क्लीन चीट देण्यात आली. ही सर्व पार्श्वभूमी ताजी असतानाच कोट्यवधी रुपयांची नुतनीकरण व सुशोभिकरणाची कामे या संबंधित ठेकेदाराला देण्यामागचे नेमके गौडबंगाल काय? ही कोट्यवधी रुपयांची कामे एकाच ठेकेदाराला मिळणे म्हणजे त्या मागे नक्कीच कुणीतरी राजकीय अथवा राज्यस्तरावरील अभियंत्यांचा ‘आशिर्वाद’ असल्याशिवाय शक्य नसल्याचे बोलले जात असून त्याचा उलगडा होणे गरजेचे बनले आहे. (प्रतिनिधी) पत्रकार कक्षाचे कामही निकृष्टसुमारे ५ लाख रुपये खर्चून जिल्हाधिकारी भवनातील पत्रकार कक्षाचे नूतनीकरण करण्यात आले. या कामाचाही ठेका त्याच संबंधित ठेकेदाराला देण्यात आला होता. फर्निचरचे काम अत्यंत निकृष्ट करण्यात आले आहे. खुर्च्याही बनावट वापरण्यात आल्या आहेत. ही बाब संबंधित ठेकेदाराच्या व बांधकामच्या अधिकाऱ्यांनाही सांगितली.मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात आला. सध्या जिल्हा परिषदेत पदाधिकाऱ्यांच्या व छत्रपती शिवाजी महाराज सभागृहाच्या नूतनीकरणाचे काम सुरु आहे.संबंधित कामासाठी ठेकेदाराचे ५ ते ६ कामगार वावरत आहेत व त्यांची निवासस्थानाची सोय जिल्हा परिषद भवनाच्या दुसऱ्या मजल्यावर करण्यात आली आहे. जिल्हा परिषद ‘मेहरबान’ कशासाठी?सध्या जिल्हा परिषदेमध्ये या ठेकेदाराचे काम सुरू असून त्या ठेकेदारांच्या कामगारांना राहण्यासाठी शासकीय जागा देण्यात आली आहे. हे काम त्याच ठेकेदाराला देण्यात आले आहे. जिल्हा परिषद संबंधित ठेकेदारावर मोठ्या प्रमाणावर ‘मेहरबान’ कशासाठी असाही सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.