सावंतवाडीतील बनावट नोटांचे सांगली कनेक्शन उघड; सांगली कारागृहातून सहा जण ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 18:15 IST2026-04-28T18:15:37+5:302026-04-28T18:15:53+5:30

बनावट नोटा सिरियल वरून उघड!

Sangli connection of fake notes in Sawantwadi exposed; Six arrested from Sangli jail | सावंतवाडीतील बनावट नोटांचे सांगली कनेक्शन उघड; सांगली कारागृहातून सहा जण ताब्यात

सावंतवाडीतील बनावट नोटांचे सांगली कनेक्शन उघड; सांगली कारागृहातून सहा जण ताब्यात

सावंतवाडी: सावंतवाडीतील एका बँकेत दोनशे रूपयांच्या बनावट नोटा आढळून आल्याने एकच खळबळ उडाली असून या बँकेतील चलनात तब्बल आठ नोटा आल्या होत्या नोटांची तपासणी केली असता या नोटांचे सांगली कनेक्शन उघड झाले आहे.सांगली येथे बनावट नोटा प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित आरोपी शी यांचा संबध असल्याचे पुढे आल्याने सावंतवाडी पोलिसांनी सांगली येथील सहा संशयित आरोपींना जिल्हा कारागृहातून ताब्यात घेण्यात आले असून सोमवारी रात्री उशिरा त्यांना सावंतवाडीत आणण्यात आले.

सावंतवाडीतील एक बँकेतील चलनात आठ बनावट नोटा आल्या होत्या बँकेत या संशयास्पद नोटांची तपासणी केली असता त्या बनावट असल्याचे पुढे आल्याने त्यांनी याबाबत सावंतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.

या तक्रारीच्या अनुषंगाने तपासणी केली असता सांगली येथे बनावट नोटा पकडण्यात आल्या होत्या या नोटा मधील काहि नोटाचा यात समावेश होता.त्या नोटाचे सिरियल नंबर हे या नोटाशी मिळते जुळते असल्याने पोलिसांनी आपले एक पथक सांगली येथे पाठवले सोमवारी या पथकाने तेथे जाऊन खातर जमा केली असता या नोटाशी सांगली कनेक्शन उघडकीस आले आहे.

त्यानंतर सावंतवाडी पोलिसांच्या पथकाने सांगली शहरातील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडे दाखल असलेल्या गुन्ह्यातील सुप्रीत कडप्पा देसाई (२२)राहुल राजाराम जाधव ( ३३) इब्रार आदम इनामदार (४४)नरेंद्र जगन्नाथ शिंदे (४०) संदीप बाळू कांबळे (३८ सर्व रा.कोल्हापूर) तर सिध्देश जगदीश म्हात्रे (38 रि.मालाडमुंबई)या सहा जणांना सांगली येथील जिल्हा कारागृहातून न्यायालयाच्या आदेशानुसार ताब्यात घेण्यात आले आहे.

या सर्व आरोपींना सोमवारी रात्री उशिरा त्यांना सावंतवाडीत आणण्यात आले. मंगळवारी येथील न्यायालयात हजर केले असता दोन दिवस पोलीस कोठडी सुनावलेली आहे.हे सर्व आरोपींनी बनावट प्रकरणात अटक करण्यात आली असून यांच्यासोबत मुंबई येथील एक आरोपी त्याला ही आणण्यात आले असून या सर्व आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.या संशयित आरोपी च्या माध्यमातून या बनावट नोटा सावंतवाडीत आल्या असाव्यात किंवा यांच्याशी संबधित जिल्ह्यात कोण आहे का? याचा पोलिस तपास करणार आहेत.

या तपासाची व्याप्ती मोठी असून आणखी काहि व्यवहार झाले काय? हे ही पोलीस तपासणार आहेत.हा तपास पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे सह पोलीस पथक करत आहे.

Web Title: Sangli connection of fake notes in Sawantwadi exposed; Six arrested from Sangli jail