शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
2
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
3
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
4
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
5
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
6
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
7
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
8
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
9
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
10
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
11
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
12
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
13
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
14
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
15
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
16
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
17
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
19
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
20
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
Daily Top 2Weekly Top 5

भरती बंदचा फटका...

By admin | Updated: July 24, 2015 00:39 IST

गंभीर प्रश्न : शिक्षक भरती रखडल्याने जामीनदारांची वानवा

आनंद त्रिपाठी - वाटूळ -महाराष्ट्र शासनाने मे २०१२ पासून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीवर बंदी आणल्याने शैक्षणिक व प्रशासकीय अडचणी निर्माण झाल्या आहेत. शिक्षक व सेवकांसाठी रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शिक्षक सेवक पतपेढी कार्यरत असून, अनेक कर्मचाऱ्यांची नाळ या पतपेढीशी जोडली गेली आहे. शिक्षक भरती रखडल्याचा मोठा फटका आता पतपेढीच्या शिक्षक सेवक सभासदांनाही बसू लागला आहे.जिल्ह्यातील ३००पेक्षा अधिक माध्यमिक शाळांमधील एक हजाराच्या आसपास शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असून, जवळपास एवढेच कर्मचारी ३ वर्षांत सेवानिवृत्त झाले आहेत. माध्यमिक पतपेढीमध्ये दोन शिक्षक वा सेवक जामीनदार म्हणून एका कर्जदाराला लागतात. परिणामी जे कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत ते शाळेमध्ये सहकाऱ्याला जामीनदार असतात. सेवानिवृत्तीपूर्वी त्यांच्या कर्जदाराला अन्य जामीनदार बदलून द्यावा लागतो. परंतु गेल्या ३ वर्षांपासून भरती प्रक्रियाच बंद असल्याने पतपेढीमध्ये नवीन सभासदांची संख्या वाढली नाही. सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यात नवीन जामीनदार देण्यासाठी अनेक शाळांमध्ये सभासदच शिल्लक नसल्याने निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसमोर मोठा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे. पतपेढीची नाहरकत दाखला मिळाल्याशिवाय त्यांची पेन्शन केस पूर्णच होत नाही. पुढील महिन्यात होणाऱ्या पतपेढीच्या सर्वसाधारण सभेत या प्रश्नावर तोडगा काढावा, अशी मागणी सभासदवर्गातून होत आहे. जिल्ह्यातील ३००पेक्षा अधिक माध्यमिक शाळांमधील मोठ्या प्रमाणावर रिक्त असलेली पदे भरणार कधी? हा प्रश्न भेडसावत असतानाच निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्यांची संख्या मोठी आहे. शिक्षक भरती रखडल्याचा परिणाम मोठा असून, तीन वर्षात सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे पतपेढीतून कर्ज घेणाऱ्यांना निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांऐवजी अन्य कर्मचाऱ्यांची शोधाशोध करावी लागत आहे. मात्र, हा सारा विषय चिंता वाढविणारा ठरला आहे.