विदेशाबरोबरच भारतातही कोरोनाची साथ पसरल्याने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. गोवा राज्यात पर्यटनासाठी येत असलेल्या विदेशी पर्यटकांकडून गोव्यात साथ पसरल्याचे समोर आले आहे. हे पर्यटक गोव्यातून दोडामार्गच्या दिशेने येत असल्याने त्यांची दोडामार्ग ग्रामीण र ...
कोरना साथरोगाबाबत खोटी माहिती कोणतीही खातरजमा न करता प्रसारित केल्यामुळे ब्रेकिंग मालवणी, सिंधु रिपोर्टर लाईव्ह आणि ग्लोबल महाराष्ट्र ब्रेकिंग या न्यूज चॅनेलवर गुन्हे दाखल करण्यात येत असल्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. ...
शिमगोत्सवाच्या निमित्ताने शहरातील गवंडीवाडा राममंदिर येथील स्थानिक कलाकारांचे १२१ वर्षांची परंपरा लाभलेले खेळे शहरवासीयांसाठी सध्या लक्षवेधी ठरत आहेत. कोकणात सध्या शिमगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. काही ठिकाणी दीड तर काही ठिकाणी पाच दिवसा ...
साथरोग प्रतिंबधात्मक कायदा 1897 च्या कलम 2 (ख) नुसार जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या अधिपत्याखाली येणाऱ्या सर्व प्राथमिक, माध्यमिक, सरकारी तसेच खाजगी शाळा 31 मार्च 2020 रोजीपर्यंत बंद ठेवल्या आहेत. त्यामुळे सरकारी तसेच खाजगी शाळा ओस पडल्या आहेत. ...
राज्यात कोरोनाचे १७ रुग्ण आढळले असताना, विधान भवन व मंत्रालय आस्थापनाला बायोमेट्रिक हजेरीचा वापर न करण्याबाबत विनाविलंब आदेश काढावेत, असा आग्रह आमदार डावखरे यांनी धरला. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, कुणकेरी येथील हुडोत्सवाला तीन गावांबाहेरील लोकांना बंदी घालण्यात आली आहे. तसेच मंगळवारचा आठवडा बाजार पुढील आदेश होईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ...
तब्बल दीड महिन्यानंतर सोशल मीडियावरून आलेल्या माहितीच्या आधारे अंकित चव्हाण यांच्या कपड्यांवरून नातेवाईकांनी ओळख पटवली असल्याची माहिती सावंतवाडी पोलिसांनी दिली. ...
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी शहरात रंगपंचमी हवी तशी साजरी केली गेली नाही. ठिकठिकाणी युवकांनी रंगपंचमी साजरी केली खरी; पण रंगांची उधळण करताना मोठ्या प्रमाणात सावधगिरी बाळगताना युवक दिसत होते. ...