corona virus-कोरोना संबंधी चुकीचे वृत्त गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 04:12 PM2020-03-17T16:12:31+5:302020-03-17T16:18:04+5:30

कोरना साथरोगाबाबत खोटी माहिती कोणतीही खातरजमा न करता प्रसारित केल्यामुळे ब्रेकिंग मालवणी, सिंधु रिपोर्टर लाईव्ह आणि ग्लोबल महाराष्ट्र ब्रेकिंग या न्यूज चॅनेलवर गुन्हे दाखल करण्यात येत असल्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.

 Criminal proceedings begin on Corona's misleading news channels | corona virus-कोरोना संबंधी चुकीचे वृत्त गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

corona virus-कोरोना संबंधी चुकीचे वृत्त गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

Next
ठळक मुद्दे कोरोना संबंधी चुकीचे वृत्त वृत्त वाहिन्यांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

सिंधुदुर्ग : कोरना साथरोगाबाबत खोटी माहिती कोणतीही खातरजमा न करता प्रसारित केल्यामुळे ब्रेकिंग मालवणी, सिंधु रिपोर्टर लाईव्ह आणि ग्लोबल महाराष्ट्र ब्रेकिंग या न्यूज चॅनेलवर गुन्हे दाखल करण्यात येत असल्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.

कोरना साथरोगाबाबत कोणत्याही प्रकारची अफवा किंवा खोटी माहिती तोंडी, लेखी, समाजमाध्यमांचा वापर करून पसरवीत असल्यास तो कायद्याने गुन्हा आहे. याबाबत शासन स्तरावरून देण्यात आलेल्या सूचनांनुसार तातडीने गुन्हा नोंद करण्यात येतो.

जिल्ह्यातील ब्रेकिंग मालवणी, सिंधु रिपोर्टर लाईव्ह आणि ग्लोबल महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज या तीन न्यूज चॅनलनी कोरना बाधित रुग्ण जिल्ह्यात असलेबाबत खोटी माहिती कोणतीही खातरजमा न करता प्रसारित केली आहे. या वृत्तामुळे जनमानसात भीती व गैरसमज निर्माण होऊ शकतो याची जाणीव असतानाही वृत्त प्रसिद्ध केले आहे.

ही बाब अत्यंत गंभीर असल्याने तसेच कोरना साथ रोगाबाबत पसरवण्यात येणाऱ्या अफवा व चुकीच्या वृत्तांना आळा घालण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी संबंधीत तीन वृत्त वाहिन्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा सन 2005चे कलम 54, साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 च्या अनुषंगाने शासनाने जाहिर केलेली अधिसूचना व भारतीय दंड विधान संहिता कायदा 1860 च्या कलम 188 व माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याचा सूचना दिल्या आहेत. 

ब्रेकिंग मालवणी, सिंधु रिपोर्टर लाईव्ह आणि ग्लोबल महाराष्ट्र ब्रेकिंग या न्यूज चॅनेलवर गुन्हे दाखल करण्यात येत असल्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. तसेच अशा प्रकारची खोटी माहिती प्रसारीत  करणाऱ्या व अफवा पसरवणाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल होणार आहेत.

नागरिकांनी अशा अफवा पसरवणाऱ्या अथवा खोटी माहिती देणाऱ्यांची माहिती पोलिसांना तात्काळ द्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Web Title:  Criminal proceedings begin on Corona's misleading news channels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.