शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
2
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
3
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
4
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
5
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
6
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
7
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
8
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
9
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
10
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
11
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
12
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
13
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
14
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
15
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
16
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
17
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
19
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
20
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
Daily Top 2Weekly Top 5

हत्तींचे धुमशान सुरुच

By admin | Updated: January 5, 2015 00:37 IST

वैभववाडी तालुक्यात नुकसान : शेतकरी भयभीत

वैभववाडी : आचिर्णे घाणेगड येथील मुक्काम हलवून दोन रानटी हत्ती खांबाळे, एडगांवमार्गे कुंभवडेच्या जंगलाकडे सरकले आहेत. या प्रवासात त्यांनी ३ गावातील ८ शेतकऱ्यांचे माड, केळी व ऊसशेतीचे नुकसान करीत अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. आचिर्णे मधलीवाडीतील श्रीधर मारुती रावराणे यांच्या घराचा दरवाजा हत्तीने तोडला. पहिल्यांदाच आचिर्णेची हद्द ओलांडून हत्ती पुढे कुंभवडेकडे सरकल्यामुळे खांबाळे, वाभवे, एडगांव परिसरातील नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत.वैभववाडी तालुक्यात दुसऱ्यांदा रानटी हत्तींनी एन्ट्री केली. शुक्रवारी रात्री आचिर्णे घाणेगडवाडीत मुक्काम केल्यानंतर शनिवारी त्यांनी खांबाळे खालच्यावाडीत रात्री ११.३० वाजता हजेरी लावली. तेथून वाभवेमार्गे एडगाव पवारवाडी, फौजदारवाडीतून माड व केळींची नासधूस करत पहाटे ५ च्या सुमारास हत्तींनी कुंभवडेच्या जंगलाचा मार्ग धरला. हत्ती आल्याची माहिती मिळताच खांबाळे व एडगावमध्ये धांदल उडाली.१२ किलोमीटर प्रवासआचिर्णे घाणेगडचे जंगल ते कुंभवडे या १२ किलोमीटरच्या प्रवासात दोन रानटी हत्तींनी आचिर्णेतील महेश आत्माराम रावराणे यांची ऊसशेती, खांबाळेतील परशुराम मोहिते, अनंत वळंजू, जयसिंग मोहिते यांचे माड व केळी, एडगाव येथील रवींद्र रावराणे यांचे माड व केळी तर विश्वनाथ रावराणे यांची केळीची बाग जमीनदोस्त केली. तसेच खांबाळे मोहितेवाडीतील शिवाजी पवार यांच्या घरातील भाताच्या गोणीची नासधूस केली. एका रात्रीत ८ शेतकऱ्यांच्या ऊसशेतीसह माड, केळींचे नुकसान केल्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत. कुंभवडेत घनदाट जंगल आहे. त्यामुळे याठिकाणी हत्ती स्थिरावण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हत्तींनी कुंभवडेतून मुक्काम हलविला तर पुढे कुंभारी तिरवडेमार्गे भुईबावडा-ऐनारीकडे सरकण्याची शक्यता आहे किंवा सोनाळीतून कुसूर नापणे असा प्रवास त्यांनी सुरु केल्यास ऊस शेतीचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे. (प्रतिनिधी)दरवाजावरील धडकेने उडवला थरकापखांबाळेत दाखल होण्यापूर्वी शनिवारी रात्री ११ वाजता एका हत्तीने आचिर्णे मधलीवाडीतील श्रीधर मारुती रावराणे यांच्या घराचा पुढचा दरवाजा धडक मारुन तोडला. त्यावेळी ओट्यावर झोपलेली मुले, माणसे खडबडून जागी झाली. त्यांनी घरातील लाईट लावताच दरवाजातून आत आलेली सोंड पाहून १४ वर्षांचा त्यांचा मुलगा बेशुद्ध पडला. त्यामुळे सारेच गोंधळले. मात्र, लाईट लागताच हत्तीने पुढचा मार्ग धरल्यामुळे अनर्थ टळला.दुसऱ्यांदा तालुक्यात दाखल झालेल्या हत्तींनी दुसऱ्या रात्री तीन गावात नुकसान करून कुंभवडेकडे मार्गक्रमण केल्यामुळे वनक्षेत्रपाल आर. एस. पाटील, वनपाल सावंत व २५ वनरक्षकांचे पथक हत्तींच्या मागावर आहेत.