शहरं
Join us  
Trending Stories
1
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
2
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
3
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
4
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा 'झालमुरी स्टॉल', पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
5
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
6
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
7
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
8
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
9
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
10
भारताच्या माजी क्रिकेटपटूची राजकीय मैदानात दमदार एंट्री, बड्या नेत्याविरोधात घेतली मोठी आघाडी
11
'या' स्टॉकनं केलं मालामाल! ५ वर्षांत १४००% चं छप्परफाड रिटर्न, आज पुन्हा अपर सर्किट
12
वैशाख अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: राहु काळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, चंद्रोदयाची वेळ!
13
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
14
UPSC टॉपर घडवणाऱ्या शिक्षिकेचे विद्यार्थ्याकडून अपहण; १.९० कोटी लुटून हॉस्पिटलमध्ये लपला, कारण समोर
15
'सैराट'फेम अरबाज शेखने केला निकाह, कोण आहे 'सल्या'ची पत्नी? रिंकू राजगुरुनेही केली कमेंट
16
"'ट्विंकल-ट्विंकल' शिकण्यासाठी २.५ लाख द्यायचे?"; सिनियर केजीची फी पाहून पालक शॉक
17
दोन सिलिंडर, एकदाच रांगेत राहून भरा, दुप्पट फिरा...! या कंपनीने सीएनजीमध्ये सात सीटर कार लाँच केली
18
बंगालमध्ये सायनी घोष यांचं गाणंच ठरलं गेमचेंजर; भाजपला थेट सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचवलं
19
'खुल्लम खुल्ला प्यार' आता बंद! 'गर्लफ्रेंड कल्चर' BCCIला अमान्य, 'हे' ४ भारतीय काय करणार?
20
नक्कल करायलाही अक्कल लागते! रोहितच्या स्टाईलमध्ये बाबरचं सेलिब्रेशन; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : गोवा शिक्षण मंडळाची दहावीची परीक्षा सिंधुदुर्गात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 18:38 IST

सीमा भागातून गोव्यात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गोवा शिक्षण मंडळाची दहावीची परीक्षा सिंधुदुर्गात ५ परीक्षा केंद्रांवर शनिवारपासून सुरु झाली. सावंतवाडी तालुक्यात सातार्डा, आरोंदा केंद्रावर तर दोडामार्ग तालुक्यात भेडशी, आयी व चोर्ला केंद्रावर ही परीक्षा घेण्यात येत आहे.

ठळक मुद्देगोवा शिक्षण मंडळाची दहावीची परीक्षा सिंधुदुर्गात 

बांदा : सीमा भागातून गोव्यात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गोवा शिक्षण मंडळाची दहावीची परीक्षासिंधुदुर्गातपरीक्षा केंद्रांवर शनिवारपासून सुरु झाली. सावंतवाडी तालुक्यात सातार्डा, आरोंदा केंद्रावर तर दोडामार्ग तालुक्यात भेडशी, आयी व चोर्ला केंद्रावर ही परीक्षा घेण्यात येत आहे.या केंद्रांवर एकूण १९७ विद्यार्थी परीक्षा देत असल्याची माहिती पहाणी अधिकारी भिकाजी धुरी यांनी दिली. सॅनिटाईज प्रश्नपत्रिका, सोशल डिस्टन्सिंग व मास्कचा वापर करून विद्यार्थी प्रथमच परीक्षा देत आहेत.सातार्डा प्री-प्रायमरी इंग्लिश मीडियम प्रशाला केंद्रावर एकूण ७१ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. केंद्रप्रमुख म्हणून आरोस कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापिका सुषमा मांजरेकर काम पाहत आहेत. आरोग्य कर्मचारी, स्वयंसेवक, पोलीस, पर्यवेक्षक अशी २० जणांची टीम तेथे कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी सातार्डा स्कूल कमिटी अध्यक्ष उदय परिपत्ये, सरपंच भरत मयेकर, ग्रामपंचायत सदस्य सागर राऊळ, विलास राऊळ, कवठणी सरपंच सुमन कवठणकर, सुधा कवठणकर, आरोग्य सेवक शेडकर, सागर प्रभू, योगेश गोवेकर, काशिनाथ केरकर, पत्रकार प्रवीण मांजरेकर, परशुराम मांजरेकर, गणेश सातार्डेकर, सुशिल गोवेकर, सुधाकर वेंगुर्लेकर, आना आरोलकर, हर्षद पेडणेकर, श्रीकांत जाधव, सुनील नाईक, पोलीस पाटील विनीता मयेकर, होमगार्ड मिथिलेश नागवेकर यांची टीम कार्यरत आहे.यावेळी डॉ. स्मिता शेलटे-नाईक यांनी विद्यार्थ्यांना अर्सेनिक गोळ्या व मास्कचे मोफत वाटप केले. परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी घेतलेल्या उपाययोजनांबाबत पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.१९७ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्टसातार्डा केंद्रावर ७१, आरोंदा १७, भेडशी ६१, आयी २४ तर चोर्ला केंद्रावर २४ असे एकूण सिंधुदुर्गचे १९७ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन परीक्षा घेतली जात आहे. प्रत्येक विद्यार्थ्याची शारीरिक तपासणी करुनच प्रवेश देण्यात आला. शिवाय सॅनिटायझर, मास्क, सोशल डिस्टन्सिंग यांचे पालन करण्यात येत आहे. केंद्राच्या ठिकाणी आरोग्य कर्मचारी, पोलीस व स्वयंसेवक यांची टीम कार्यरत आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याexamपरीक्षाsindhudurgसिंधुदुर्गgoaगोवा