शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस-सेना कार्यकर्ते भिडले

By admin | Updated: June 6, 2015 00:24 IST

दोडामार्ग आमसभा वादळी : पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे वाद मिटला

दोडामार्ग : तळकट येथील सीताबाई सावंत या वयोवृद्ध महिलेस मारहाण करणारा तिचा मुलगा अनंत सावंत याला शिवसेनेचे तालुकाध्यक्ष बाबूराव धुरी पाठीशी घालत असून, त्यांच्या निषेधाचा ठराव घेण्यात यावा, अशी मागणी काँगे्रसचे जिल्हा परिषद सदस्य एकनाथ नाडकर्णी यांनी सभागृहात करताच काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. सभागृहातील वातावरण तणावग्रस्त झाले. आमसभेत दोन्ही कार्यकर्त्यांत राडा होतो की काय, अशी स्थिती निर्माण झाली. मात्र, पोलिसांनी समयसूचकता दाखवून हस्तक्षेप करीत दोन्हीकडील कार्यकर्त्यांना पांगविल्यावर पुन्हा आमसभा सुरळीत सुरू झाली. वित्त व ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली ते मंत्री झाल्यानंतर प्रथमच दोडामार्ग तालुक्याची आमसभा येथील महालक्ष्मी सभागृहात शुक्रवारी पार पडली. यावेळी पंचायत समिती सभापती महेश गवस, उपसभापती आनंद रेडकर, पंचायत समिती सदस्य विशाखा देसाई, सुचिता दळवी, जनार्दन गोरे, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र म्हापसेकर, आदी उपस्थित होते. आमसभेचा पूर्वार्ध समाप्त होताच विभागवार आढावा सुरू होण्यापूर्वीच काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य एकनाथ नाडकर्णी यांनी तळकट येथील सीताबाई सावंत या वयोवृद्ध महिलेस झालेल्या मारहाणीचा विषय हाती घेतला. स्वत:च्या ७० वर्षीय आईस तिचाच मुलगा अनंत सावंत याने कोयत्याने हल्ला करून मारहाण केली. या घटनेचा दोडामार्ग तालुक्यात सर्वच स्तरातून निषेध झाला. मात्र, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष बाबूराव धुरी हे आरोपी अनंत सावंत याला स्वत:च्या गाडीत घालून फिरवित होते. एका संशयित आरोपीस पाठीशी घालण्याचा प्रकार धुरी यांनी केला आहे. त्यामुळे त्यांचा निषेधाचा ठराव घ्यावा, अशी मागणी एकनाथ नाडकर्णी यांनी केली. (प्रतिनिधी)कार्यकर्त्यांचा अंगावर धावून जाण्याचा प्रकारसंतापलेले सेना कार्यकर्ते सभागृहात गोंधळ घालत काँग्रेस कार्यकर्त्यांवर धावून गेले. यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व सेना कार्यकर्ते एकमेकांना भिडले. समाज कल्याणसभापती अंकुश जाधव, काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र निंबाळकर, रमेश दळवी, प्रेमानंद देसाई, शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाबूराव धुरी, सज्जन धाऊसकर, जीवन सावंत, संजय देसाई, गणेशप्रसाद गवस, रामदास मेस्त्री, पांडुरंग नाईक यांच्यात झटापट झाली. प्रकरण हातघाईवर आल्याचे पाहून पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांना पांगविले. पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना शांतता बाळगण्याचे आवाहन केले. त्यानंतर आमसभा पुन्हा सुरू झाली.