शहरं
Join us  
Trending Stories
1
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
2
Election Results 2026 LIVE: "बंगालच्या विकासासाठी भाजप आता कोणतीही कसर सोडणार नाही"; ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींची प्रतिक्रिया
3
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
4
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
5
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
6
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
7
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
8
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
9
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
10
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
11
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
12
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
13
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
14
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
15
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
16
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
17
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
18
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
19
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
20
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: नवीन नंबर प्लेट बसवा, अन्यथा 'आरटीओ'त कामे होणार नाहीत; वाहनमालकांना इशारा

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: June 10, 2025 19:22 IST

आरटीओचा वाहनमालकांना इशारा 

सिंधुदुर्ग : राज्य शासनाने १ एप्रिल २०१९ पूर्वी उत्पादित सर्व जुन्या वाहनांना हायसिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट (एसएसआरपी) बसविण्याचा निर्णय घेतला असून ३० जूनपर्यंत एचएसआरपी नंबर फ्लेट बसविण्यास मुदत देण्यात आली आहे. मात्र, १६ जूनपासून आरटीओ कार्यालयात आलेल्या वाहनांचे कोणतेही काम एचएसआरपी नंबर प्लेट असेल तरच होणार आहे.नंबर प्लेट नसेल तर काम केले जाणार नसल्याचा इशारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे दिला आहे. जिल्ह्यात उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून वारंवार आवाहन करूनदेखील वाहनधारक याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे आरटीओने ही भूमिका घेतली आहे.

ही कामे करायची तर हायसिक्युरिटी नंबर प्लेट हवी१ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या परिवहन संवर्गातील वाहनांची योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण कामकाज वगळून वाहन हस्तांतरण, नोंदणी प्रमाणपत्र (आरसी) पत्ता बदल करणे, वित्त बोजा चढविणे, उतरविणे, दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र देणे, नाहरकत प्रमाणपत्र जारी करणे आदी कामकाज एचएसआरपी नंबर प्लेट बसविल्याशिवाय १६ जूनपासून होणार नाही.नोंदणी केल्यास मिळणार सवलतवाहन मालकांनी एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यासाठी पूर्व नियोजित दिनांक व वेळ घेतली असल्यास कामकाज करून दिले जाणार आहे.

३० जूनपर्यंत अंतिम मुदतवाहनांना हायसिक्युरिटी नंबर प्लेट बंधनकारक केली आहे. ही नंबर प्लेट बसविण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदत असून अद्याप ज्या वाहन धारकांकडे जुन्याच नंबर प्लेट असतील त्यांनी त्या त्वरित बसवून घ्याव्यात, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून करण्यात आले आहे.

हायसिक्युरिटी नंबर प्लेटसाठी जिल्ह्यात २० हजार वाहनांची ऑनलाइन नोंदणी झालेली आहे. यापैकी सुमारे १० हजार वाहनांनी प्लेट बसविण्यात आलेल्या आहेत. उर्वरित वाहनधारकांनी तातडीने ही नंबर प्लेट बसवून दंडात्मक कारवाई टाळावी. - विजय काळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सिंधुदुर्ग.