आंतरराष्ट्रीय: ट्रम्प यांच्या टीकेने मेलोनींना इटलीत प्रसिद्धी, तरुणाईही पाठिशी
ट्रम्प यांच्या टीकेनंतर मेलोनी अधिक लोकप्रिय झाल्या. बाह्य दबावाला झुगारून देण्याच्या त्यांच्या भूमिकेमुळे विरोधकही एकत्र आले. मेलोनी यांच्यावर झालेल्या टीकेमुळे त्यांची देशांतर्गत आणि अंतरराष्ट्रीय प्रतिमा आणखी मजबूत झाली आहे. त्यांचे राजकीय विरोधकही त्यांच्या समर्थनार्थ मैदानात आले आहेत. मेलोनींची लोकप्रियता पुन्हा झपाट्यानं वाढत असून त्यांच्या कट्टर विरोधकांनाही राष्ट्रीय सार्वभौमत्वाच्या मुद्द्यावर सरकारच्या समर्थनात उभं राहावं लागलं आहे.
क्रिकेट: Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
स्विंगचा किंग भुवनेश्वर कुमार याने आयपीएलच्या आपल्या दिर्घ कारकिर्दीत अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. आयपीएल २०२६ स्पर्धेतील ५० व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा स्टार जलदगती गोलंदाजाने मैदानात उतरताच नवा इतिहास रचला आहे. लखनौ सुपर जाएंट्स विरुद्ध आयपीएल कारकिर्दीतील २०० वा सामना खेळणारा तो पहिला जलदगती गोलंदाज ठरला आहे.
महाराष्ट्र: २०२९ ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार: जय पवार
सुनेत्रा पवार २०२९ मध्ये मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार असतील, असा दावा जय पवार यांनी केला. बारामतीत नागरिकांच्या समस्यांसाठी जनता दरबार सुरू केला. अजितदादांचे काम पुढे नेऊन पाणी, आरोग्य, शिक्षण प्रश्न सोडवण्यावर भर देणार.
राष्ट्रीय: पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच; हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच आहे. हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक, पाच जखमी. भाजपने तृणमूल काँग्रेसवर आरोप केला, तृणमूलने आरोप फेटाळला. याशिवाय उत्तर २४ परगण्यात भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार आणि कोलकात्यात चाकूहल्ला, झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत.
पुणे: मुलगी परत द्या..! म्हणत रस्त्यातच उचललं; वडिलांसह नातेवाईकांनीच केलं अपहरण
निरगुडसर (पुणे जि.) : आंबेगाव तालुक्यातील पारगाव परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, विवाहित मुलीचे तिच्याच वडिलांनी साथीदारांच्या मदतीने अपहरण केल्याची घटना घडली आहे.
व्यापार: पगारातून दरमहा PF कापला जातो? निवृत्तीनंतर किती रुपये मिळतील? जाणून घ्या EPF-EPS चे गणित...
नोकरी करणाऱ्या बहुतांश कर्मचाऱ्यांच्या पगारातून दर महिन्याला PF (Provident Fund) कापला जातो. मात्र, अनेकांना हा पैसा नेमका कुठे जातो, त्यावर किती व्याज मिळते आणि निवृत्तीनंतर किती मोठा फंड तयार होऊ शकतो, याची पुरेशी माहितीच नसते. प्रत्यक्षात PF ही फक्त बचत योजना नसून, भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेचा महत्त्वाचा आधार मानली जाते. EPF आणि EPS या दोन योजनांच्या माध्यमातून कर्मचारी निवृत्तीनंतर मोठा फंड आणि मासिक पेन्शन दोन्ही मिळवू शकतात.
छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा तहानला: टँकरने गावाला पाणीपुरवठा, उन्हाचा तडाखा
मराठवाड्यात वाढत्या तापमानामुळे पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. ९२ गावे आणि ३६ वाड्यांना १५६ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे, ज्यामुळे ३ लाख नागरिक बाधित आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक ११५ टँकर सुरू आहेत. जून-जुलैमध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे.
नांदेड: नांदेडमध्ये शस्त्रांचा मोठा साठा उद्ध्वस्त; ४,७९६ शस्त्रे जप्त!
नांदेड पोलिसांनी 'ऑपरेशन फ्लश आऊट' अंतर्गत मोठी कारवाई करत ४,७९६ शस्त्रे जप्त केली, ज्याची किंमत ४३.५ लाख रुपये आहे. एका आरोपीच्या चौकशीतून गुरु रामदासनगरमध्ये शस्त्र निर्मितीचा कारखाना उघडकीस आला. दोघांवर शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल.
व्यापार: टाटा समूहात वादाची ठिणगी; प्रकरण थेट उच्च न्यायालयात, नेमका वाद काय? जाणून घ्या...
देशातील सर्वात मोठ्या औद्योगिक समूहांपैकी एक असलेल्या टाटा समूहासंदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. टाटा ट्रस्ट्सशी संबंधित वाद आता मुंबई उच्च न्यायालयात पोहोचला असून, ‘सर रतन टाटा ट्रस्ट’ वर महाराष्ट्रातील सार्वजनिक ट्रस्ट कायद्याच्या उल्लंघनाचा आरोप करण्यात आला आहे. हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत टाटा ट्रस्ट्सची ८ मे रोजी होणारी महत्त्वाची बैठक रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. यामुळे टाटा समूहाच्या व्यवस्थापन आणि ट्रस्ट संरचनेबाबत विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.
पुणे: Pune crime: पत्नी घर सोडून गेली अन् बाप बनला हैवान? मुलीचा केला खून, मुलगा थोडक्यात बचावला
आळेफाटा ( पुणे जि.) : कौटुंबिक वाद आणि पत्नी घर सोडून गेल्याच्या नैराश्यातून एका पित्याने स्वतःच्या चिमुकल्या मुलीची हत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पुणे-नाशिक महामार्गालगत संतवाडी परिसरात ही धक्कादायक घटना उघडकीस आली असून संपूर्ण परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
व्यापार: शेअर असावा तर असा...₹१ लाखाचे केले ₹१४ कोटी; गुंतवणूकदारांना मिळाला १,४०० पट परतावा
शेअर बाजारात असे काही मोजकेच स्टॉक्स आहेत, ज्यांनी दीर्घकालीन गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला आहे. अशाच एका मल्टीबॅगर शेअरची सध्या बाजारात जोरदार चर्चा आहे. उद्योगपती अनिल अग्रवाल यांच्या हिंदुस्तान झिंक लिमिटेड (Hindustan Zinc Ltd) या कंपनीने गेल्या २४ वर्षांत गुंतवणूकदारांना तब्बल १४०० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. या शेअरमध्ये २००२ साली गुंतवलेले ₹१ लाख आज कोट्यवधी रुपये झाले आहेत.
परभणी: ओव्हरटेकच्या प्रयत्नात ट्रॅव्हल्स उलटली, सहा प्रवासी जखमी
गंगाखेडजवळ ओव्हरटेक करताना ट्रॅव्हल्स बस उलटली, सहा प्रवासी जखमी. एका खाजगी बसने दुसऱ्या बसला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना नियंत्रण गमावले. जखमींना रुग्णालयात दाखल केले, दोघांची प्रकृती चिंताजनक.
व्यापार: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर 'हे' डिफेन्स स्टॉक चमकले; गुंतवणूकदारांना दिला ९६ टक्क्यांपर्यंत परतावा
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ला आज एक वर्ष पूर्ण झाले असून, या कालावधीत देशाच्या संरक्षण क्षेत्रात मोठे बदल पाहायला मिळाले. ७ मे २०२५ रोजी भारतीय सैन्याने दहशतवाद्यांविरोधात सुरू केलेल्या या कारवाईनंतर देशात संरक्षण तंत्रज्ञान, डिफेन्स उत्पादन आणि निर्यात यांना मोठी चालना मिळाली. याचाच सकारात्मक परिणाम शेअर बाजारातील डिफेन्स कंपन्यांच्या शेअर्सवर दिसून आला आहे.
बीड: बीड महामार्ग जमीन घोटाळा: माजी जिल्हाधिकारी पाठक पोलिसांच्या ताब्यात
बीड महामार्ग जमीन संपादनात घोटाळा प्रकरणी माजी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना अटक. शेतकर्यांना मावेजा वाटपात फेरफार केल्याचा आरोप. एसआयटीच्या तपासात सहभाग उघडकीस, लातूरमधील घरातून अटक.
राष्ट्रीय: १३ राज्यांत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा; IMD ने दिला इशारा
IMD चा १३ राज्यांत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे. याठिकाणी वाऱ्याचा वेग ताशी ६० किमी पर्यंत असण्याचा अंदाज आहे. उत्तर-पश्चिम भारतात १०-१२ मे दरम्यान हवामान बदलण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसात उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, हरियाणा, राजस्थान, हिमाचल प्रदेशातील काही भागात पावसाची शक्यता आहे. केरळ, तामिळनाडू, पुदुचेरी या भागात ६-७ दिवसांपर्यंत मेघगर्जना आणि वेगवान वाऱ्यासह पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे.
व्यापार: तिकीटाची कटकट संपणार! रेल्वे आणतेय हायस्पीड बुकिंग सिस्टीम; एका मिनिटात १.५ लाख तिकीटे बुक होणार
भारतीय रेल्वे लवकरच तिकीट बुकिंग प्रणालीत मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. ऑनलाईन तिकीट बुकिंगदरम्यान वेबसाइट स्लो होणे, सर्व्हर डाऊन होणे आणि पेमेंट फेल होण्याच्या समस्यांपासून आता प्रवाशांना लवकरच दिलासा मिळणार आहे. रेल्वे या नव्या हाय-स्पीड बुकिंग सिस्टमवर काम करत असून, या प्रणालीमुळे तिकीट बुकिंग प्रक्रिया अधिक वेगवान, सुरक्षित आणि सुलभ होणार आहे.
पुणे: महिलांची सुरक्षा कुठे ? पुण्यात भररस्त्यात तरुणीची छेडछाड; नागरिकांनी दिला बेदम चोप
पुणे - शहरातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणणारी धक्कादायक घटना राजाराम पूल परिसरात घडली आहे. बुधवारी दुपारच्या सुमारास एका मद्यधुंद तरुणाने भररस्त्यात तरुणीची छेडछाड केल्याने परिसरात मोठा गोंधळ उडाला.
व्यापार: थलापती विजयने आपल्या आमदारांना ज्या हॉटेलमध्ये ठेवले, त्याचे एका दिवसाचे भाडे किती?
नुकत्याच पार पडलेल्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत अभिनेते थलापती विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघम (TVK) पक्षाने अभुतपूर्व यश मिळवले. अनेक दशकांपासून द्रविडियन राजकारण करणाऱ्या DMK आणि AIDMK ला धूळ चारत, TVK चे १०८ आमदार निवडून आले. या ऐतिहासिक विजयानंतर पक्षाने ‘रिसॉर्ट पॉलिटिक्स’चा मार्ग स्वीकारल्याची चर्चा सुरू झाली आहे. पक्षाकडे स्पष्ट बहुमत नसल्याने नव्याने निवडून आलेल्या आमदारांना एकत्र ठेवण्यासाठी त्यांना महाबलीपुरममधील खासगी लक्झरी रिसॉर्ट आणि हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे.
राष्ट्रीय: '११८ आमदारांच्या सह्या घेऊन या, ११३ संख्येवर सरकार कसं स्थापन करणार?', विजय यांना राज्यपालांचे अनेक सवाल
सरकार स्थापन करण्यासाठी लागणारे बहुमत कुठून आणणार, तुम्हाला कोण-कोणत्या पक्षांनी सरकार स्थापनेसाठी पाठिंबा दिला आहे?, असे प्रश्न तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांनी टीव्हीके पक्षाचे प्रमुख विजय यांना विचारले. विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकल्यानंतर विजय यांनी राज्यपालांची दुसऱ्यांदा भेट घेतली. मात्र, राज्यपालांकडून काही प्रश्न उपस्थित करण्यात आल्याने सत्ता स्थापनेला विलंब होण्याचीच चिन्हे दिसत आहेत.
बीड: शेतात शेडमधील करंटमुळे महिलेचा मृत्यू; तिघे गंभीर जखमी.
शिरूर कासार, बीड येथे शेतात सावलीसाठी उभारलेल्या मंडपात वीज उतरल्याने एका महिलेचा मृत्यू झाला, तर तिघे जखमी झाले. कांद्याची कापणी करत असताना, डोक्यावरील विद्युत वाहिनीमुळे मंडपातील लोखंडी अँगलमध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने ही दुर्घटना घडली.
व्यापार: Paytm पहिल्यांदाच नफ्यात; शेअर्समध्ये ६% वाढ, किंमत कुठपर्यंत जाणार? तज्ज्ञ काय सांगतात?
Paytm Share: डिजिटल पेमेंट कंपनी Paytm साठी मोठा टर्निंग पॉइंट ठरलेला आर्थिक निकाल समोर आला आहे. पेटीएमची पॅरेंट कंपनी ‘वन ९७ कम्युनिकेशन्स’ने लिस्टिंगनंतर पहिल्यांदाच आर्थिक वर्षात नफा नोंदवला आहे. या सकारात्मक निकालानंतर कंपनीच्या शेअरमध्ये बुधवारी जवळपास ६ टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली.
व्यापार: बाजार उघडताच सोने सुस्साट...चांदीही वधारली; जाणून घ्या १८ ते २४ कॅरेट सोन्याचे ताजे दर
Gold-Silver Rate: देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात गुरुवारी सोने आणि चांदीच्या दरात जोरदार तेजी पाहायला मिळाली. एमसीएक्स (MCX) वर सकाळच्या सत्रात सोन्याच्या किमतीत ₹७५० हून अधिक वाढ झाली, तर चांदीच्या दरात जवळपास ₹३,८०० ची मोठी झेप दिसून आली.
राष्ट्रीय: ममता बॅनर्जी यांच्या बैठकीतून १० आमदार गायब; राजकीय चर्चांना उधाण
पश्चिम बंगाल निवडणुकीतील पराभवानंतर ममता बॅनर्जी यांनी बोलावलेल्या बैठकीला टीएमसी पक्षाचे १० आमदार गैरहजर राहिल्याने राजकीय चर्चांना उधाण आले. गैरहजेरीची विविध कारणे पक्षाने दिली असली तरी निवडणुकीनंतर भाजपसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर या घटनेने लक्ष वेधले आहे. बंगालमध्ये मागील १५ वर्षापासून ममता बॅनर्जी यांची सत्ता होती. परंतु यंदाच्या निवडणुकीत ममता यांना सत्तेतून हद्दपार करण्यात भाजपाला यश आले.
राष्ट्रीय: अण्णा द्रमुकसोबत जाणार की, विरोधात बसणार? स्टॅलिन यांची मोठी घोषणा
आम्ही राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरलेला टीव्हीके सरकार स्थापन करतो का याची वाट पाहू. तसेच सहा महिन्यांपर्यंत राज्यातील राजकारणात कुठलाही हस्तक्षेप करणार नाही. केवळ परिस्थितीवर लक्ष ठेवू, असे स्टॅलिन म्हणाले.
राष्ट्रीय: राजीनामा न दिल्यास ममता बॅनर्जी अडचणीत?; घटनात्मत तरतूद जाणून घ्या
पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीने सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचा दारूण पराभव केला. या पराभवानंतरही मुख्यमंत्रिपदावरून राजीनामा देण्यास ममता बॅनर्जी यांनी नकार दिला आहे. ममता बॅनर्जी यांच्या भूमिकेमुळे राजकीय वादंग आणि घटनात्मक पेच निर्माण झाला आहे. ममता यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला नाही तर त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो असा अनेकांना प्रश्न पडला आहे. या प्रकरणात राज्यपालांकडेही अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
राष्ट्रीय: तामिळनाडूत रिसॉर्ट पॉलिटिक्स! AIADMK चे २८ आमदार पुदुचेरीला रवाना
तामिळनाडूत रिसॉर्ट पॉलिटिक्सला जोर आला आहे. AIADMK चे २८ आमदार पुदुचेरीला पोहचले असून हे आमदार अभिनेता विजय यांच्या TVK ला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. TVK ला बहुमताचा आकडा पार करण्यासाठी १० आमदारांची गरज आहे. त्यात सत्तास्थापनेसाठी हालचालींना वेग आला आहे. त्यात AIADMK च्या आमदारांचा एक गट विजय यांच्या 'तमिळगा वेट्री कझगम' (TVK) पक्षाला पाठिंबा देण्यास इच्छुक असल्याचे बोलले जात आहे
मुंबई: परदेशी कोट्यात गैरव्यवहार: रेल्वेकडून १२१ प्रवाशांना दंड.
मध्य रेल्वेने परदेशी पर्यटक कोट्याचा गैरवापर करणाऱ्या १२१ प्रवाशांना ₹3.56 लाखांचा दंड ठोठावला. एप्रिल ते जून दरम्यान ३९ अनधिकृत बुकिंग प्रकरणे उघडकीस. तिकिटे रद्द, एजंट सहभागाची चौकशी सुरू.
राष्ट्रीय: सुवेंदू अधिकारींच्या पीएची हत्या; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरारक घटनाक्रम
पश्चिम बंगालमध्ये सुवेंदू अधिकारी यांचे पीए चंद्रनाथ रथ यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. एका प्रत्यक्षदर्शीने हल्लेखोराने मोटारसायकलवरून येऊन गोळीबार केल्याचे सांगितले. अधिकाऱ्यांनी याला पूर्वनियोजित राजकीय हत्या असल्याचा आरोप केला आहे. पोलीस तपास करत असून राजकीय वातावरण तापले आहे.
क्रिकेट: SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
सनरायझर्स हैदराबादने घरच्या मैदानात पंजाब किंग्सचा ३३ धावांनी पराभव करत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यर याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र पंजाबच्या खराब क्षेत्ररक्षणाचा फायदा घेत सनरायझर्स हैदराबादने निर्धारित २० षटकांत ४ विकेट्स गमावत २३५ धावा केल्या. या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना कूपर कॉलॉनी याने नाबाद शतकी खेळी केली, पण त्याची ही खेळी संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही. अखेरीस पंजाब किंग्सला पराभव पत्करावा लागला.
क्रिकेट: Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
सनरायझर्स हैदराबादचा सलामीवीर अभिषेक शर्मानं बुधवारी आयपीएल स्पर्धेतील पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात आणखी एका स्फोटक खेळीसह मैफील लुटली. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर संघाच्या डावाची सुरुवात करताना त्याने फक्त १३ चेंडूत ३५ धावा केल्या. या खेळीत त्याने २ चौकार आणि ३ षटकार ठोकले. त्याचे अर्धशतक हुकले, पण २६९.२३ च्या स्ट्राइक रेटच्या जोरावर त्याने ख्रिस गेलला मागे टाकत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
राष्ट्रीय: एका मताने विजय: माजी मंत्री पराभूत; आनंद महिंद्रांची प्रतिक्रिया!
तिरुपत्तूरमध्ये एका मताने विजय, माजी मंत्री पराभूत. आनंद महिंद्रा यांनी एका मताचे महत्त्व सांगितले. येथे अभिनेता विजयच्या 'तमिळगा वेत्री कळघम' (TVK) पक्षाचे उमेदवार सीनिवसा सेतुपती आर. यांनी चक्क 'एका' मताच्या फरकाने विजय मिळवत इतिहास रचला. त्यांनी डीएमकेचे दिग्गज नेते तथा माजी मंत्री के. आर. पेरियाकरुप्पन यांचा पराभव केला. या निवडणुकीत सेतुपती यांना ८३,३७५ मते, तर पेरियाकरुप्पन यांना ८३,३७४ मते मिळाली आहेत.