Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >शेअर बाजार > Paytm पहिल्यांदाच नफ्यात; शेअर्समध्ये ६% वाढ, किंमत कुठपर्यंत जाणार? तज्ज्ञ काय सांगतात?

Paytm पहिल्यांदाच नफ्यात; शेअर्समध्ये ६% वाढ, किंमत कुठपर्यंत जाणार? तज्ज्ञ काय सांगतात?

Paytm Share: पेटीएमने लिस्टिंगनंतर पहिल्यांदाच आर्थिक वर्षात नफा नोंदवला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 11:59 IST2026-05-07T11:58:00+5:302026-05-07T11:59:02+5:30

Paytm Share: पेटीएमने लिस्टिंगनंतर पहिल्यांदाच आर्थिक वर्षात नफा नोंदवला आहे.

Paytm in profit for the first time; Shares rise 6%, how far will the price go? What do experts say? | Paytm पहिल्यांदाच नफ्यात; शेअर्समध्ये ६% वाढ, किंमत कुठपर्यंत जाणार? तज्ज्ञ काय सांगतात?

Paytm पहिल्यांदाच नफ्यात; शेअर्समध्ये ६% वाढ, किंमत कुठपर्यंत जाणार? तज्ज्ञ काय सांगतात?

Paytm Share: डिजिटल पेमेंट कंपनी Paytm साठी मोठा टर्निंग पॉइंट ठरलेला आर्थिक निकाल समोर आला आहे. पेटीएमची पॅरेंट कंपनी ‘वन ९७ कम्युनिकेशन्स’ने लिस्टिंगनंतर पहिल्यांदाच आर्थिक वर्षात नफा नोंदवला आहे. या सकारात्मक निकालानंतर कंपनीच्या शेअरमध्ये बुधवारी जवळपास ६ टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली.

कंपनीला ₹५५२ कोटींचा निव्वळ नफा

मागील आर्थिक वर्षात पेटीएमला ₹५५२ कोटींचा निव्वळ नफा झाला. मात्र, त्यापूर्वीच्या आर्थिक वर्षात कंपनीला ₹६६३ कोटींचा तोटा झाला होता. त्यामुळे तोट्यातून नफ्याकडे झालेली ही मोठी झेप गुंतवणूकदारांसाठी दिलासादायक मानली जात आहे. तसेच चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत कंपनीने ₹१८४ कोटींचा नफा कमावला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला ₹५४० कोटींचा तोटा झाला होता.

शेअर बाजारात पेटीएमच्या शेअरला जोरदार प्रतिसाद

मजबूत आर्थिक निकालानंतर शेअर बाजारातही पेटीएमच्या शेअरला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. मागील सत्रात कंपनीचा शेअर ₹१,११०.२५ वर बंद झाला होता. तर, गुरुवारी तो ₹१,१६०.२० वर उघडला. तसेच, सकाळी १०:२० वाजता शेअर ४.९८ टक्क्यांच्या वाढीसह ₹१,१६५.५० वर व्यवहार करत होता. या वाढीसोबत कंपनीचे मार्केट कॅप ₹७५,०८८.०७ कोटींवर पोहोचले आहे.

IPO नंतर पहिल्यांदाच सकारात्मक संकेत

पेटीएमचा आयपीओ नोव्हेंबर २०२१ मध्ये आला होता. कंपनीने ₹२,१५० या इश्यू प्राइसवर शेअर्स बाजारात आणले होते. मात्र, लिस्टिंगनंतर शेअरला मोठी घसरण सहन करावी लागली आणि तो अद्याप इश्यू प्राइसच्या जवळही पोहोचू शकलेला नाही. मात्र, आता कंपनीने पहिल्यांदाच वार्षिक नफा नोंदवल्याने गुंतवणूकदारांचा विश्वास पुन्हा वाढताना दिसत आहे.

महसुलातही मजबूत वाढ

कंपनीच्या महसुलातही लक्षणीय वाढ झाली आहे. मागील आर्थिक वर्षात पेटीएमचा महसूल २१.८ टक्क्यांनी वाढून ₹९,२९१ कोटींवर पोहोचला. याआधीच्या वर्षात कंपनीचा महसूल ₹७,६२५ कोटी होता.

ब्रोकरेज कंपन्यांचा सकारात्मक अंदाज

आर्थिक निकालानंतर अनेक ब्रोकरेज कंपन्यांनी पेटीएमच्या शेअरबाबत सकारात्मक भूमिका कायम ठेवली आहे. जेफरीजने ‘बाय’ रेटिंग कायम ठेवत ₹१,३५० चे टार्गेट प्राइस दिले आहे. हे सध्याच्या किंमतीपेक्षा सुमारे २२ टक्के अधिक आहे. बर्नस्टीननेही ‘आउटपरफॉर्म’ रेटिंग कायम ठेवत ₹१,५०० चे टार्गेट प्राइस जाहीर केले आहे.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title : Paytm पहली बार मुनाफे में; शेयर 6% बढ़े, विशेषज्ञ क्या कहते हैं?

Web Summary : Paytm की मूल कंपनी ने लिस्टिंग के बाद पहली बार मुनाफा दर्ज किया, जिससे शेयर 6% बढ़ गए। कंपनी ने ₹552 करोड़ का शुद्ध लाभ दर्ज किया, जो पिछले वर्ष के नुकसान से एक महत्वपूर्ण बदलाव है। ब्रोकरेज फर्मों ने सकारात्मक दृष्टिकोण बनाए रखा है, मूल्य लक्ष्यों से आगे विकास की संभावना का पता चलता है।

Web Title : Paytm Turns Profitable First Time; Shares Surge 6%, Experts Predict More?

Web Summary : Paytm's parent company reported its first profit after listing, boosting shares by 6%. The company recorded a net profit of ₹552 crore, a significant turnaround from the previous year's loss. Brokerage firms maintain a positive outlook, with price targets suggesting further growth potential.