व्यापार: कर्जमाफीच्या नावाखाली फसवणूक! रिझर्व्ह बँकेचा इशारा, राहा सावध!
तुमच्याकडेही असा एखादा कॉल किंवा मेसेज आला आहे का, ज्यामध्ये तुमचz कर्ज माफ करण्याबाबत सांगण्यात आलंय? अशा प्रकरणांवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) सर्वसामान्यांना एक मोठं आवाहन केलंय. कर्जमाफीचे खोटे आश्वासन देणाऱ्या जाहिरातींपासून सावध राहण्याचा सतर्कतेचा इशारा आरबीआयनं दिलाय.
राष्ट्रीय: विजय तामिळनाडूचे मुख्यमंत्री होणार; उद्या शपथविधी!
अभिनेता विजय तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. त्यांना काँग्रेस, सीपीआय, सीपीआय(एम) आणि व्हीसीकेचा पाठिंबा आहे. त्यांच्यासमोर आश्वासने पूर्ण करण्याचे आणि विकास साधण्याचे आव्हान आहे.
जालना: बूट लपवल्याने लग्नात राडा, महिलांचे दागिने ओरबाडले!
जालन्यातील नांदी येथे लग्नात बूट लपवल्याने हाणामारी झाली. यात महिलांच्या अंगावरील दागिने ओरबाडले. पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पुणे: Video : पुण्यात ‘झॉम्बी ड्रग्स’ची एन्ट्री ? तरुण तब्बल २ तास एकाच जागी उभा
पुणे - पुण्यातील नरपतगिरी चौकात घडलेल्या एका विचित्र घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर सध्या एका तरुणाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात वायरल होत असून, हा तरुण तब्बल दोन तास एकाच जागी स्तब्ध उभा असल्याचा दावा केला जात आहे.
पुणे: अत्याचारांच्या घटना वाढत असताना महिला आणि बालविकास विभाग आहे तरी कुठे?
पुणे : दिवसेंदिवस महिला-मुलींवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना त्यांच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहण्याऐवजी सरकार राजकारण करत असल्याचा आरोप शिवसेनेच्या (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. या सगळ्या प्रकरणात महिला आणि बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे आहेत कुठे? महिला आणि बालविकास विभाग आहे कुठे? महिला आयोगाचे पदही रिक्त असून, त्या पदावर कोणाची नियुक्ती का झालेली नाही?, मग, महिलांनी दाद मागायची कुठे?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
जालना: बापाच्या खुनाचा बदला! मुलीच्या वाढदिवशी मुख्य आरोपीची हत्या.
जालन्यात, मुलाने वडिलांच्या खुनाचा बदला घेत मुख्य आरोपी जितेंद्र अडसूळची मुलीच्या वाढदिवशी हत्या केली. अडसूळ जामीनावर सुटला होता. दोघांना ताब्यात घेतले.
राष्ट्रीय: घुसखोरांना हाकलणार, कार्यकर्त्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही: अमित शाह
पश्चिम बंगालमधून घुसखोरांना हाकलणार, ३२१ भाजपा कार्यकर्त्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, असे अमित शाह म्हणाले. भाजपाचा विजय राष्ट्रीय सुरक्षा व सांस्कृतिक पुनरुत्थानाचे प्रतीक आहे. विकास व 'सोनार बांगला' बनवण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
ऑटो: EV की पेट्रोल? ५०० किमीच्या प्रवासासाठी कोणती कार फायदेशीर? जाणून घ्या...
भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा (EV) बाजार झपाट्याने वाढत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे ग्राहक आता इलेक्ट्रिक कारकडे अधिक आकर्षित होत आहेत. विशेषतः इलेक्ट्रिक SUV आणि MPV सेगमेंटमध्ये मोठी वाढ दिसून येत आहे.
महाराष्ट्र: संजय राऊतांचे थेट डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
पश्चिम बंगाल विजयाबद्दल मोदींना ट्रम्प यांनी दिलेल्या शुभेच्छांवर संजय राऊतांचा सवाल. राऊतांनी निवडणुकीतील अनियमितता, पक्षपाती निवडणूक आयोग आणि भीतीचे वातावरण यावर बोट ठेवले. त्यांनी बॅनर्जींच्या भूमिकेचे समर्थन केले.
पुणे: नसरापूर प्रकरणात नवा सस्पेन्स..!पळून जात असताना सीसीटीव्हीत आरोपीच्या खांद्यावर दिसले बोचके
पुणे : नसरापूर येथे चिमुरडीवर अत्याचार केल्यानंतर आरोपी पळून जात असताना सीसीटीव्हीत त्याच्या खांद्यावर बोचके असल्याचे दिसून येत आहे. तसेच शवविच्छेदन अहवालात मुलीच्या शरीरावर जखमा आढळल्या असून, त्या एखाद्या टणक धारदार हत्याराने केल्या असल्याची शक्यता आहे, अशी माहिती सरकारी वकिलांनी न्यायालयात दिली.
करिअर: ₹६०,००० ते ₹१,८०,००० पगार; कोल इंडियामध्ये ६००+ पदांसाठी भरती जाहीर; जाणून घ्या निवड प्रक्रिया
सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. Coal India Limited (CIL) ने मॅनेजमेंट ट्रेनी पदांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. या भरतीअंतर्गत एकूण ६६० पदे भरली जाणार असून, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया १२ मे २०२६ पासून सुरू होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना Coal India च्या अधिकृत वेबसाइटवरून अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ११ जून २०२६ सायंकाळी ६ वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे.
नांदेड: ओबडधोबड रस्त्यावर दुचाकींच्या धडकेत दोघांचा मृत्यू
तामसा-अर्धापूर मार्गावर लोणीजवळ दुचाकींच्या समोरासमोर धडकेत दोन तरुणांचा मृत्यू झाला. गुरुवारी रात्री झालेल्या अपघातात अजिंक्य चाटसे आणि अभिषेक नागठाणे (वय २५) यांचा जीव गेला. रस्त्याची दुर्दशा कारणीभूत असून दुरुस्तीची मागणी जोर धरत आहे.
व्यापार: सोनं-चांदी महागले; पटापट तपासा आजचे ताजे दर
लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी दिसून येत आहे. इंडियन बुलियन्स मार्केटमध्ये सोन्याचा दर पुन्हा एकदा १,५१,००० रुपयांच्या पार पोहोचला आहे. एप्रिल महिन्यात आतापर्यंत सोन्याच्या किमतीत प्रति १० ग्रॅम २,७८३ रुपयांची वाढ झाली. गुरुवारच्या तुलनेत चांदीच्या दरातही मोठी वाढ नोंदवण्यात आली.
राष्ट्रीय: तामिळनाडूत राजीनामा सत्र! १०० हून अधिक अधिकाऱ्यांचा राजीनामा, कारण..
पश्चिम बंगालनंतर तामिळनाडूत सत्ता बदलाच्या अनिश्चिततेमुळे १०० हून अधिक विधी अधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. नवीन सरकार स्थापन होईपर्यंत हे अधिकारी कार्यरत राहणार आहेत. सरकारी वकील आणि विधी अधिकाऱ्यांची नियुक्ती बहुतांश राजकीय असते. जेव्हाही एखाद्या राज्यात सत्ता परिवर्तन होते तेव्हा नवीन सरकार येताच मागील सरकारद्वारे केलेले नियुक्त अधिकारी त्यांचे पद सोडतात. त्यामुळे DMK राजवटीतील अधिकारी पदावरून दूर जात आहेत.
व्यापार: उन्हाळी सुट्ट्यांना महागाईचा फटका; देशांतर्गत अन् आंतरराष्ट्रीय विमानभाडे गगनाला भिडले...
उन्हाळी सुट्ट्यांमध्ये फिरायला जाण्याचा विचार करत असाल, तर तुमच्या खिशाला कात्री लागणार आहे. कारण, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही मार्गांवरील विमान प्रवासाचे भाडे तब्बल ४० ते ५० टक्क्यांनी वाढले आहेत. जेट इंधनाच्या वाढत्या किंमती, पश्चिम आशियातील तणावामुळे निर्माण झालेल्या एअरस्पेस अडचणी आणि विमान कंपन्यांकडून उड्डाण क्षमता कमी करण्यात आल्याने तिकिटांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. परिणामी, आता अनेक भारतीय पर्यटक युरोप-अमेरिकेऐवजी दक्षिण-पूर्व आशियातील स्वस्त देश आणि देशांतर्गत हिल स्टेशनकडे वळताना दिसत आहेत.
व्यापार: HDFC बँकेच्या कर्जाच्या व्याजदरात बदल; नवीन दर काय?
एचडीएफसी बँकेनं (HDFC Bank) कर्जाच्या व्याजदरात मोठा बदल केला आहे. काही विशिष्ट कालावधीसाठी बँकेनं 'मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स-बेस्ड लेंडिंग रेट्स' (MCLR) मध्ये ५ बेसिस पॉइंट्स (bps) म्हणजेच ०.०५ टक्क्यांची कपात केली आहे. ज्यांचे कर्ज या व्यवस्थेशी जोडलेलं आहे, अशा कर्जदारांसाठी ही आनंदाची बातमी आहे. दुसरीकडे, बँकेनं एका विशिष्ट कालावधीसाठी एमसीएलआरमध्ये ५ bps ची वाढ देखील केली आहे.
राष्ट्रीय: 'टीव्हीके'चा खेळ होणार! अण्णाद्रमुकला पाठिंबा देण्यास द्रमुक तयार, पण फक्त एक अट?
महाराष्ट्राच्या राजकारणाप्रमाणेच तामिळनाडूच्या राजकारणात नवे राजकीय समीकरण अस्तित्वात येण्याची शक्यता आहे. विजय जोसेफ यांच्या टीव्हीके पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरी सत्ता स्थापनेसाठी त्यांना अजूनही बहुमताचा आकडा जुळवता आलेला नाही. त्यात कट्टर राजकीय विरोधक असलेले अण्णाद्रमुक आणि द्रमुक हे दोन्ही पक्ष एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एम.के. स्टॅलिन यांच्या द्रमुकने अण्णाद्रमुकला पाठिंबा देण्यास तयारी दर्शवली असून, त्यासाठी एक अट ठेवली आहे.
व्यापार: 'या' सरकारी बँकेत जमा करा ₹२,००,०००; 'इतक्या' कालावधीत मिळेल ₹१,०३,२८९ चे फिक्स व्याज...
देशातील प्रमुख सरकारी बँकांपैकी एक असलेल्या Bank of Baroda आपल्या ग्राहकांना विविध मुदत ठेवी (FD) योजनांवर आकर्षक परतावा देत आहे. बँकेकडून विविध कालावधीच्या FD योजनांवर ३.५० टक्क्यांपासून ते ७.०५ टक्क्यांपर्यंत व्याजदर दिले जात आहेत. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना अधिक फायदेशीर ठरत आहे.
छत्रपती संभाजीनगर: निदा खानला MIM ने लपवले! संजय शिरसाटांचा इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप
मंत्री शिरसाट यांचा आरोप, एमआयएमने निदा खानला लपवले. जबरदस्तीने धर्मांतर प्रकरणी अटक. जलील यांच्या भूमिकेची चौकशीची मागणी. बेरोजगार तरुणांकडे महागडी उपकरणे कुठून? कॉर्पोरेट जिहादचा संशय.
जालना: पोलिसांना डिवचले, जाफ्राबादच्या भावांना 'खाकी'चा हिसका!
सोशल मीडियावर आव्हान दिल्याने जाफ्राबाद पोलिसांनी दोन भावांना चांगला धडा शिकवला. जप्त केलेली वाहने सुटल्यानंतर त्यांनी चिथावणीखोर पोस्ट टाकली. पोलिसांनी त्यांना अटक करून चोप दिला. त्यांच्या माफीचा व्हिडिओ व्हायरल झाला. एका भावावर गुन्हा दाखल.
व्यापार: डोनाल्ड ट्रम्प यांना कोर्टाचा दणका; १०% टॅरिफच्या निर्णयाला ठरवले बेकायदेशीर
डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा एकदा मोठा न्यायालयीन धक्का बसला आहे. अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय व्यापार न्यायालयाने ट्रम्प प्रशासनाने लागू केलेल्या १० टक्के ग्लोबल टॅरिफला बेकायदेशीर ठरवत त्यावर कठोर टिप्पणी केली. न्यायालयाने या टॅरिफला “अवैध” आणि “अनधिकृत” असे संबोधले आहे. हा निर्णय अमेरिकेतील छोट्या उद्योगांनी दाखल केलेल्या याचिकेवर देण्यात आला असून, ट्रम्प प्रशासनाने काँग्रेसकडून राष्ट्राध्यक्षांना दिलेल्या अधिकारांचा गैरवापर केल्याचे न्यायालयाने म्हटले.
व्यापार: महागाईचा दणका; डाबरची उत्पादनं महागली, कारण काय?
एफएमसीजी (FMCG) कंपन्या लवकरच आपल्या उत्पादनांच्या किमती वाढवणार असल्याची बातमी दोन दिवसांपूर्वीच आली होती. त्यावर अंमलबजावणी करत दिग्गज एफएमसीजी कंपनी डाबरनं (Dabur) आपल्या बहुतांश उत्पादनांच्या किमती वाढवल्या आहेत. किमती वाढवण्यासोबतच कंपनीने छोट्या पॅकचा आकार आणखी लहान केलाय.
व्यापार: 'या' FMCG कंपनीला झाला ₹६७९ कोटींचा नफा; आता गुंतवणूकदारांना मिळणार भरघोस लाभांश
FMCG क्षेत्रातील दिग्गज कंपनी Britannia इंडस्ट्रीजने आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या चौथ्या तिमाहीत (Q4 FY26) उत्कृष्ट आर्थिक कामगिरी नोंदवत गुंतवणूकदारांना मोठी भेट दिली आहे. मजबूत विक्री, प्रीमियम उत्पादनांना वाढती मागणी आणि ई-कॉमर्स व्यवसायातील वाढीमुळे कंपनीच्या नफ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. या वाढीमुळेच आता कंपनीने प्रति शेअर ₹९०.५० लाभांश जाहीर केला आहे.
नांदेड: पावसात मांडव उडाला, तरी शुभमंगल सावधान! अनोख्या विवाहाची चर्चा
नांदेड जिल्ह्यातील लखमापूर येथे पावसामुळे मांडव उडाला, तरी नवरी-नवरदेवाने हार मानली नाही. छत्रीखाली विवाह पार पडला. वऱ्हाडींच्या समजूतदारपणामुळे आणि जोडप्याच्या जिद्दीमुळे विवाह सोहळा यशस्वी झाला.
व्यापार: सोनं-चांदी महागले; प्रमुख शहरांतील आजचे दर काय?
मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया (MCX) वर ८ मे २०२६ (शुक्रवार) रोजी सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ पाहायला मिळत आहे. या आठवड्याच्या शेवटच्या व्यापारी दिवशी सोन्याचा भाव १,५२,८६४ रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदीचा भाव २,६०,६५० रुपये प्रति किलो वर पोहोचला आहे.
राष्ट्रीय: केरळ CM पदासाठी गांधी कुटुंबाचा 'खास' व्यक्ती? ४७ आमदारांची पसंती
केरळ निवडणुकीनंतर काँग्रेसच्या ६३ आमदारांपैकी ४७ आमदारांनी वेणुगोपाल यांना मुख्यमंत्रीपदासाठी पसंती दर्शवली आहे. ज्यात प्रदेशाध्यक्ष सन्नी जोसेफ यांचाही समावेश आहे. याबाबत हायकमांड लवकरच निर्णय घेणार आहे. काँग्रेसच्या केंद्रीय समितीने पाठवलेल्या निरिक्षकांनी केरळमधील आमदारांसोबत वन टू वन भेट घेतली. या आमदारांव्यतिरिक्त माकन आणि वासनिक यांनी काँग्रेस खासदार आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या पसंती जाणून घेण्यासाठी त्यांच्यासोबत स्वतंत्र बैठका घेतल्या आहेत.
व्यापार: HDFC बँकेच्या FD योजनेत ₹५५,००० गुंतवल्यास परतावा किती? जाणून घ्या
जर तुम्हाला सुरक्षित गुंतवणुकीसोबत चांगला परतावा हवा असेल, तर फिक्स्ड डिपॉझिट हा एक विश्वासार्ह पर्याय ठरू शकतो. देशातील मोठ्या खाजगी बँकांपैकी एक असलेली एचडीएफसी बँक (HDFC Bank) आपल्या ग्राहकांना विविध कालावधीच्या एफडी योजनांवर आकर्षक व्याजदर देत आहे.
क्राइम: TCS प्रकरणी निदा खानला अटक; अटकेनंतरचा पहिला फोटो समोर, कसं पकडलं?
टीसीएस धर्मांतरण प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खानला छत्रपती संभाजीनगर येथे अटक करण्यात आली. निदा तिच्या ४ नातेवाईकांसोबत फ्लॅटवर राहत होती. मागील काही दिवसांपासून पोलीस निदा खानचा मागोवा घेत होती. परंतु सातत्याने लोकेशन बदलणाऱ्या निदा खानला पकडण्यात पोलिसांना अपयश येत होते. गुरुवारी रात्री मिळालेल्या माहितीनंतर नाशिक पोलिसांनी संभाजीनगर पोलिसांसोबत मिळून फरार असलेल्या निदा खानला अटक केली.
आंतरराष्ट्रीय: हंता व्हायरसचा धोका! WHO चा १२ देशांना सतर्कतेचा इशारा, अलर्ट जारी
जागतिक आरोग्य संघटना WHO ने हंता व्हायरसबाबत १२ देशांना रेड अलर्ट जारी केला आहे. हंता व्हायरसची प्रकरणे गंभीर होण्यापूर्वीच काही प्रवासी जहाजातून उतरून आपापल्या देशात परतले, ज्यामुळे तेथे विषाणू पसरण्याचा धोका वाढला असल्याचं WHO ने सांगितले आहे. अनेक देश प्रवासी आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी करत असल्याने आणखी प्रकरणे समोर येऊ शकतात असंही त्यांनी म्हटलं
आंतरराष्ट्रीय: होर्मुझजवळ चिनी टँकरवर हल्ला; अमेरिका-इराण यांच्यात तणाव आणखी वाढला
अमेरिका-इराण तणावाच्या दरम्यान होर्मुझ सामुद्रधुनीजवळ चीनच्या तेल टँकरवर हल्ला झाला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या प्रोजेक्ट फ्रीडम मोहीमेला स्थगिती दिली आहे. मात्र चीनच्या जहाजावर अशाप्रकारे हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ आहे. ज्यामुळे तणाव वाढला. जहाजावरून आलेल्या फोटोंमध्ये डेक जळताना दिसत आहे. या हल्ल्यात जहाजावरील कोणी कर्मचारी जखमी झाले आहेत की नाही हे अद्याप स्पष्ट झालं नाही.
मुंबई: मुंबई: कलिंगड, बिर्याणी निर्दोष; उंदीर मारण्याच्या औषधाने चौघांचा मृत्यू?
मुंबईतील कुटुंबाचा मृत्यू अन्नातून विषबाधेमुळे झाल्याचा संशय होता, पण आता उंदीर मारण्याच्या औषधामुळे झाल्याचे समोर आले आहे. त्यांच्या शरीरात आणि कलिंगडमध्ये झिंक फॉस्फाइड आढळले. बिर्याणी संशयाच्या भोवऱ्यात असली तरी, तपासणीत ती निर्दोष ठरली.