DMK AIDMK: विरोधक एकत्र येणार, 'टीव्हीके'चा कार्यक्रम होणार! अण्णाद्रमुकला पाठिंबा देण्यास द्रमुक तयार, फक्त एक अट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 12:53 IST2026-05-08T12:49:39+5:302026-05-08T12:53:52+5:30

तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेचा पेच निर्माण झाला आहे. विजय यांच्या टीव्हीकेला अजूनही बहुमताचा आकडा जुळवता आलेला नाही. दुसरीकडे महाराष्ट्रासारखीच तामिळनाडूतही महाआघाडी निर्माण होण्याची शक्यता आहे. 

DMK AIDMK: Opposition will come together, 'TVK' program will be held! DMK ready to support AIADMK, only one condition? | DMK AIDMK: विरोधक एकत्र येणार, 'टीव्हीके'चा कार्यक्रम होणार! अण्णाद्रमुकला पाठिंबा देण्यास द्रमुक तयार, फक्त एक अट?

DMK AIDMK: विरोधक एकत्र येणार, 'टीव्हीके'चा कार्यक्रम होणार! अण्णाद्रमुकला पाठिंबा देण्यास द्रमुक तयार, फक्त एक अट?

महाराष्ट्राच्या राजकारणाप्रमाणेचतामिळनाडूच्याराजकारणात नवे राजकीय समीकरण अस्तित्वात येण्याची शक्यता आहे. विजय जोसेफ यांच्या टीव्हीके पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरी सत्ता स्थापनेसाठी त्यांना अजूनही बहुमताचा आकडा जुळवता आलेला नाही. त्यात कट्टर राजकीय विरोधक असलेले अण्णाद्रमुक आणि द्रमुक हे दोन्ही पक्ष एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एम.के. स्टॅलिन यांच्या द्रमुकने अण्णाद्रमुकला पाठिंबा देण्यास तयारी दर्शवली असून, त्यासाठी एक अट ठेवली आहे. 

१०८ जागा जिंकलेल्या विजय यांच्या टीव्हीके निकाल लागून चार दिवस उलटले तरी बहुमताची जुळवा जुळव करता आलेली नाही. राज्यपाल आर्लेकर यांनी ११८ आमदारांच्या सह्या घेऊन आल्यानंतर सत्ता स्थापनेची प्रक्रिया सुरू केली जाईल, असे सांगितल्याने पेच निर्माण झाला. त्यात आता कट्टर विरोधक असलेल्या अण्णाद्रमुक आणि द्रमुक यांची नवी आघाडी होण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. 

द्रमुकने अण्णाद्रमुक समोर ठेवली एक अट

तामिळनाडूमध्ये त्रिशंकू निकाल लागले आहेत. द्रमुकला ५९ जागा मिळाल्या आहेत, तर अण्णाद्रमुकने ४७ जागा जिंकल्या आहेत. दोन्ही पक्षाच्या मिळून १०८ जागा होतात. त्यामुळे त्यांनाही इतर छोटे पक्षांना सोबत घेतले तरच बहुमत मिळवता येणार आहे. 

अण्णाद्रमुक आणि द्रमुक हे दोन्ही पक्ष येतील अशा राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. द्रमुकने अण्णाद्रमुकसोबत आघाडी करण्यासाठी अट ठेवली आहे. अण्णाद्रमुकने एनडीए म्हणजे भाजपाची साथ सोडली तरच आघाडी केली जाईल. कोणत्याही जातीयवादी पक्षासोबत आम्ही जाणार नाही. त्यामुळे ही आघाडी व्हायची असेल, तर अण्णाद्रमुकला भाजपाची साथ सोडावी लागणार आहे. 

डाव्या पक्षाची भूमिका काय?

सीपीआय (मार्क्सवादी), सीपीआय या दोन्ही पक्षाचे प्रत्येकी २ आमदार निवडून आले आहेत. या दोन्ही पक्षांना विजय यांनी पाठिंबा देण्याची विनंती केली आहे. हे दोन्ही पक्ष त्या संदर्भात चर्चा करत असून, या पक्षातील सूत्रांनी सांगितले की, विचारधारा आणि लोकशाहीच्या आधारावरच याबद्दल निर्णय घेऊ. टीव्हीकेला जनादेश मिळालेला आहे. अण्णाद्रमुक सोबत जाण्यात अडचणी आहेत, कारण ते भाजपासोबत आहेत. 

आता तामिळनाडूमध्ये राजकीय स्थिती काय?

बहुमतासाठी ११८ जागा आवश्यक असताना विजय यांच्या टीव्हीकेला १०८ जागा मिळालेल्या आहेत. काँग्रेसने पाठिंबा दिल्यामुळे ही संख्या ११३ इतकी झाली आहे. त्यामुळे अजूनही टीव्हीकेला ५ ते ६ आमदारांची गरज आहे. त्यामुळे इतर छोट्या पक्षांची मदत घेतल्याशिवाय त्यांना सत्तेपर्यंत पोहचणं अशक्य आहे. 

द्रमुक आणि अण्णाद्रमुक या पक्षाची मदत न घेता टीव्हीकेला सत्ता स्थापन करायची असेल, तर अनेक पक्षांची मोट बांधावी लागणार आहे. यात पीएमके (4 आमदार), आययूएमएल (२ आमदार), सीपीआय (२ आमदार), व्हीसीके (२ आमदार), सीपीआय-एम (२ आमदार), डीएमडीके (१ आमदार), एएमएमके (१ आमदार) या सगळ्या पक्षांना सोबत घ्यावे लागणार आहे. सोबत घेतल्यानंतर सरकार चालवण्याचीही कसरत करावी लागणार आहे. 

Web Title : तमिलनाडु: DMK, AIADMK साथ आ सकते हैं, लेकिन एक शर्त!

Web Summary : तमिलनाडु में त्रिशंकु विधानसभा। DMK, AIADMK को समर्थन देने पर विचार कर रहा है, लेकिन शर्त है कि वे BJP से नाता तोड़ें। TVK सीटें जीतने के बावजूद सरकार बनाने के लिए संघर्ष कर रही है।

Web Title : Tamil Nadu: DMK may support AIADMK, but there's a condition!

Web Summary : Tamil Nadu faces a hung assembly. DMK considers backing AIADMK if they break ties with BJP. TVK struggles to form government despite winning seats.