₹६०,००० ते ₹१,८०,००० पगार; कोल इंडियामध्ये ६००+ पदांसाठी भरती जाहीर; जाणून घ्या निवड प्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 16:41 IST2026-05-08T16:40:19+5:302026-05-08T16:41:23+5:30

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे.

Coal India Recruitment 2026: Salary ₹60,000 to ₹1,80,000; Know the selection process | ₹६०,००० ते ₹१,८०,००० पगार; कोल इंडियामध्ये ६००+ पदांसाठी भरती जाहीर; जाणून घ्या निवड प्रक्रिया

₹६०,००० ते ₹१,८०,००० पगार; कोल इंडियामध्ये ६००+ पदांसाठी भरती जाहीर; जाणून घ्या निवड प्रक्रिया

Coal India Management Trainee Recruitment 2026:सरकारीनोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. Coal India Limited (CIL) ने मॅनेजमेंट ट्रेनी पदांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. या भरतीअंतर्गत एकूण ६६० पदे भरली जाणार असून, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया १२ मे २०२६ पासून सुरू होणार आहे.

इच्छुक आणि पात्र उमेदवारांना Coal India च्या अधिकृत वेबसाइटवरून अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ११ जून २०२६ सायंकाळी ६ वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे.

कोणत्या पदांसाठी भरती?

कंपनीकडून विविध तांत्रिक आणि प्रशासकीय विभागांमध्ये भरती केली जाणार आहे. यामध्ये खालील शाखांचा समावेश आहे:

  • सिव्हिल इंजिनिअरिंग
  • इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग
  • मेकॅनिकल इंजिनिअरिंग
  • सिस्टम्स
  • इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार
  • भूविज्ञान
  • इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग
  • राजभाषा (हिंदी)
  • कंपनी सेक्रेटरी

एकूण ६६० पदांपैकी सर्वाधिक २२१ पदे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी राखीव आहेत. त्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंगची १७८ आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगची १४५ पदे भरली जाणार आहेत.

अर्ज शुल्क किती?

सामान्य, OBC आणि EWS प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क GSTसह ₹१,१८० ठेवण्यात आले आहे. तर अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), दिव्यांग उमेदवार (PwBD), Coal India आणि तिच्या उपकंपन्यांतील कर्मचाऱ्यांना शुल्कमाफी देण्यात आली आहे.

शैक्षणिक पात्रता काय?

इंजिनिअरिंग शाखांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित विषयातील फुलटाइम पदवी असणे आवश्यक आहे. उमेदवारांना किमान ६०% गुण आवश्यक असतील. मात्र SC, ST आणि PwBD उमेदवारांना ५% गुणांची सूट देण्यात आली आहे. याशिवाय, अंतिम वर्षात शिकणारे आणि ज्यांचा निकाल ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत अपेक्षित आहे, असे विद्यार्थी देखील अर्ज करू शकतात.

वयोमर्यादा किती?

सामान्य आणि इतर प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ३० एप्रिल २०२६ रोजी ३० वर्षे निश्चित करण्यात आली आहे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमानुसार वयोमर्यादेत सूट दिली जाईल.

निवड प्रक्रिया कशी असेल?

उमेदवारांची निवड पूर्णपणे Computer Based Test (CBT) च्या आधारे केली जाणार आहे.

परीक्षेत प्रत्येकी १०० गुणांचे दोन पेपर असतील:

पेपर १:
सामान्य ज्ञान
तार्किक क्षमता
संख्यात्मक क्षमता
इंग्रजी

पेपर २:
संबंधित विषयातील व्यावसायिक ज्ञान

प्रत्येक पेपरमध्ये १०० बहुपर्यायी प्रश्न असतील. विशेष म्हणजे परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. CBT परीक्षेची तारीख नंतर जाहीर करण्यात येणार आहे.

निवड झाल्यानंतर किती पगार मिळणार?

निवड झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षण कालावधीत दरमहा ₹६०,००० पगार दिला जाईल. हा पगार ₹६०,००० ते ₹१,८०,००० या E-1 वेतनश्रेणीअंतर्गत असेल. एक वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांची संबंधित विभागात अधिकाऱ्याच्या पदावर कायम नियुक्ती केली जाईल.

अर्ज कसा कराल?

  • Coal India च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
  • “Career with CIL” विभागावर क्लिक करा
  • Management Trainee Recruitment लिंक उघडा
  • मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडीद्वारे नोंदणी करा
  • वैयक्तिक, शैक्षणिक आणि प्रवर्गाची माहिती भरा
  • फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
  • अर्ज शुल्क भरून फॉर्म सबमिट करा
  • भविष्यासाठी अर्जाची प्रत सेव्ह करून ठेवा

Web Title : कोल इंडिया भर्ती 2026: 600+ मैनेजमेंट ट्रेनी पदों की घोषणा।

Web Summary : कोल इंडिया लिमिटेड ने 660+ मैनेजमेंट ट्रेनी पदों के लिए भर्ती की घोषणा की। ऑनलाइन आवेदन 12 मई, 2026 से शुरू होकर 11 जून, 2026 को बंद होंगे। चयन सीबीटी के माध्यम से। वेतन ₹60,000 - ₹1,80,000। कोल इंडिया की आधिकारिक वेबसाइट के माध्यम से आवेदन करें।

Web Title : Coal India Recruitment 2026: 600+ Management Trainee Posts Announced.

Web Summary : Coal India Limited announces recruitment for 660+ Management Trainee posts. Online applications start May 12, 2026, closing June 11, 2026. Selection via CBT. Salary ₹60,000 - ₹1,80,000. Apply via Coal India's official website.