बापाच्या खुनाचा बदला! मुख्य आरोपीची मुलीच्या वाढदिवशीच भररस्त्यात हत्या, दोन मुले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 18:18 IST2026-05-08T18:16:52+5:302026-05-08T18:18:31+5:30

जालन्यात खळबळ! या खून प्रकरणी दोन अल्पवयीन मुले पोलिसांच्या ताब्यात; चंदनझिरा परिसरात टोकाच्या वैमनस्यातून हत्याकांड

Jalna Murder Case: Revenge for Father's Death; Man Killed on Daughter's Birthday in Chandanzira | बापाच्या खुनाचा बदला! मुख्य आरोपीची मुलीच्या वाढदिवशीच भररस्त्यात हत्या, दोन मुले ताब्यात

बापाच्या खुनाचा बदला! मुख्य आरोपीची मुलीच्या वाढदिवशीच भररस्त्यात हत्या, दोन मुले ताब्यात

जालना: चंदनझिरा परिसरातील आझाद चौक परिसरात गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास रक्ताच्या नात्यातील सूडाचा एक भयानक अंक पाहायला मिळाला. पाच वर्षांपूर्वी झालेल्या लक्ष्मण उमरे यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी त्यांच्या अल्पवयीन मुलाने, आपल्या मित्रांच्या मदतीने जितेंद्र रवी आडसूळ (वय ३५) यांची चाकूने सपासप वार करून निर्घृण हत्या केली.

नुकतेच आले होते जामिनावर बाहेर
मृत जितेंद्र आडसूळ हे ५ वर्षांपूर्वी झालेल्या लक्ष्मण उमरे खून प्रकरणातील मुख्य आरोपी होते. या गुन्ह्यात ते कारागृहात होते आणि काही दिवसांपूर्वीच जामिनावर बाहेर आले होते. गुरुवारी आपल्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त ते आपल्या पत्नी आणि मुलांना भेटण्यासाठी चंदनझिरा येथे आले होते. सायंकाळी ते घराबाहेर पडले असता, दबा धरून बसलेल्या तीन हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला चढवला.

पत्नीच्या डोळ्यांदेखत थरार
जितेंद्र यांची पत्नी आशा आडसूळ या कामावरून घरी परतल्या होत्या. पती कोणाशी वाद घालतील या भीतीने त्या त्यांच्या मागेच चालत होत्या. मटण गल्लीकडे जात असतानाच दुचाकीवरून आलेल्या मुलांनी जितेंद्र यांना गाठले आणि त्यांच्यावर खंजीरने वार केले. आपल्या पतीचा डोळ्यांदेखत जीव जात असताना पत्नी हतबल होऊन पाहत राहिली.

Web Title : पिता की हत्या का बदला! बेटी के जन्मदिन पर मुख्य आरोपी की हत्या।

Web Summary : जालना में, एक बेटे ने अपने पिता की हत्या का बदला लेते हुए मुख्य आरोपी जितेंद्र अडसूल को उसकी बेटी के जन्मदिन पर मार डाला। अडसूल, हाल ही में जमानत पर रिहा हुआ था, पर चाकू से हमला किया गया। दो संदिग्ध हिरासत में हैं।

Web Title : Father's murder avenged! Main accused killed on daughter's birthday.

Web Summary : In Jalna, a son avenged his father's murder by killing the main accused, Jitendra Adsul, on his daughter's birthday. Adsul, recently released on bail, was attacked with knives. Two suspects are in custody.