EV की पेट्रोल? ५०० किमीच्या प्रवासासाठी कोणती कार फायदेशीर? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 17:31 IST2026-05-08T17:29:32+5:302026-05-08T17:31:13+5:30

Electric Car Running Cost: EV, पेट्रोल आणि डिझेल गाड्यांच्या खर्चातील फरक नेमका किती?

EV or petrol? Which car is more beneficial for a 500 km journey? Find out | EV की पेट्रोल? ५०० किमीच्या प्रवासासाठी कोणती कार फायदेशीर? जाणून घ्या...

EV की पेट्रोल? ५०० किमीच्या प्रवासासाठी कोणती कार फायदेशीर? जाणून घ्या...

Electric Car Running Cost: भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा (EV) बाजार झपाट्याने वाढत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे ग्राहक आता इलेक्ट्रिक कारकडे अधिक आकर्षित होत आहेत. विशेषतः इलेक्ट्रिक SUV आणि MPV सेगमेंटमध्ये मोठी वाढ दिसून येत आहे.

एप्रिल २०२६ मध्ये देशात इलेक्ट्रिक कार, SUV आणि MPV च्या २३ हजारांहून अधिक युनिट्सची विक्री झाली. ही विक्री मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे ७३ टक्क्यांनी अधिक आहे. यावरून भारतीय ग्राहक आता EV ला गंभीरपणे स्वीकारत असल्याचे स्पष्ट होते.

मात्र, आजही अनेकांच्या मनात एक मोठा प्रश्न कायम आहे की, इलेक्ट्रिक कार चालवण्याचा प्रत्यक्ष खर्च किती येतो? विशेषतः ५०० किलोमीटरसारख्या लांब अंतराच्या प्रवासात EV खरोखरच फायदेशीर ठरते का? याचाच आढावा घेऊ...

५०० किमी चालवण्यासाठी किती वीज लागते?

हे समजून घेण्यासाठी Tata Harrier EV चे उदाहरण घेऊ. या इलेक्ट्रिक SUV मध्ये सुमारे ७५kWh क्षमतेची बॅटरी दिली जाते. कंपनीच्या दाव्यानुसार ही कार ६०० किमीपेक्षा जास्त रेंज देते. मात्र, प्रत्यक्ष वापरात ती सहज ५०० किमीपर्यंत धावू शकते.

७५kWh म्हणजे साधारणपणे ७५ युनिट वीज. मात्र चार्जिंगदरम्यान थोडी वीज वाया जात असल्याने बॅटरी पूर्ण चार्ज करण्यासाठी साधारण ८० ते ८५ युनिट वीज खर्च होते. जर वीज दर प्रति युनिट ₹८ धरला, तर ५०० किमी प्रवासासाठी एकूण खर्च साधारण ₹६०० ते ₹७०० दरम्यान येतो.

पेट्रोल SUV चा खर्च किती?

जर हेच ५०० किमी अंतर पेट्रोल SUV ने पार केले आणि त्या वाहनाचे मायलेज सरासरी १५ किमी प्रति लिटर असेल, तर प्रवासासाठी सुमारे ३३ लिटर पेट्रोल लागेल. प्रति लिटर पेट्रोल ₹१०० धरल्यास एकूण खर्च जवळपास ₹३,३०० पर्यंत पोहोचतो.

डिझेल कारमध्ये किती खर्च येतो?

डिझेल कार जर सरासरी १८ किमी प्रति लिटर मायलेज देत असेल, तर ५०० किमी अंतरासाठी सुमारे २८ लिटर डिझेल लागेल. प्रति लिटर डिझेल ₹९० दराने विचार केला, तर प्रवासाचा खर्च ₹२,५०० पेक्षा अधिक येतो.

EV इतकी स्वस्त का ठरते?

तज्ज्ञांच्या मते, इलेक्ट्रिक कारची रनिंग कॉस्ट पेट्रोल वाहनांच्या तुलनेत जवळपास ५ पट कमी असते. याशिवाय EV मध्ये इंजिन ऑइल लागत नाही, क्लच आणि गिअरबॉक्स नसतो. सर्व्हिसिंग खर्च कमी असतो, त्यामुळे मेंटेनन्स तुलनेने स्वस्त पडते. म्हणून दररोज जास्त अंतराचा प्रवास करणाऱ्या ग्राहकांसाठी इलेक्ट्रिक कार दीर्घकालीन बचतीचा उत्तम पर्याय ठरू शकते.

EV बाजाराचा वेग वाढतोय

भारतात सरकारकडूनही इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन दिले जात आहे. चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर वाढवणे, सबसिडी आणि नवीन EV मॉडेल्समुळे पुढील काही वर्षांत इलेक्ट्रिक वाहनांचा बाजार आणखी मोठा होण्याची शक्यता आहे. विशेषतः शहरांमधील वाढती इंधन महागाई आणि पर्यावरणपूरक वाहतुकीची गरज लक्षात घेता, EV आता केवळ पर्याय राहिलेला नाही, तर भविष्यातील मुख्य वाहतूक माध्यम बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

Web Title : EV बनाम पेट्रोल: 500 किमी के लिए कौन सी कार सस्ती है?

Web Summary : बढ़ती ईंधन लागत के कारण इलेक्ट्रिक कारों की लोकप्रियता बढ़ रही है। ईवी लंबी ड्राइव के लिए सस्ती हैं, पेट्रोल एसयूवी के लिए ₹3,300 की तुलना में 500 किमी के लिए ₹600-₹700 का खर्च आता है। कम रखरखाव और सरकारी समर्थन भारत में ईवी को अपनाने को और बढ़ावा देते हैं।

Web Title : EV vs. Petrol: Which Car is Cheaper for 500km?

Web Summary : Electric cars gain popularity due to rising fuel costs. EVs are cheaper for long drives, costing ₹600-₹700 for 500km compared to ₹3,300 for petrol SUVs. Lower maintenance and government support further boost EV adoption in India.