नवरदेवाचा बूट लपवल्यावरून 'राडा'! लग्नात हाणामारी, महिल्यांच्या अंगावरील दागिने ओरबाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 18:57 IST2026-05-08T18:56:14+5:302026-05-08T18:57:04+5:30

वधुपक्षाकडील मंडळींनी नवरदेवाचे बूट लपवले. याचा राग धरून नवरदेवाच्या भावाने नवरीची चप्पल लपवली, यातून सुरू झाला वाद

Wedding Brawl in Jalna: Fight Over Groom's Shoes Ends in Gold Jewelry Loot; 7 Booked | नवरदेवाचा बूट लपवल्यावरून 'राडा'! लग्नात हाणामारी, महिल्यांच्या अंगावरील दागिने ओरबाडले

नवरदेवाचा बूट लपवल्यावरून 'राडा'! लग्नात हाणामारी, महिल्यांच्या अंगावरील दागिने ओरबाडले

जालना : लग्नातील साध्या मस्करीचे रूपांतर मोठ्या वादात होऊन त्याचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत झाल्याची धक्कादायक घटना अंबड तालुक्यातील नांदी येथे घडली. नवरदेवाचे बूट लपवल्याच्या कारणावरून झालेल्या या वादात लाथाबुक्क्यांनी आणि काठ्यांनी एकमेकांना मारहाण करण्यात आली. विशेष म्हणजे, या गोंधळाचा फायदा घेत लाखो रुपयांचे दागिने जबरीने हिसकावून नेल्याचा प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली.

फिर्यादी अश्विनी विष्णू वानी (वय २९, रा. खडकेश्वर) या आपल्या मावस भावाच्या लग्नासाठी नांदी येथे आल्या होत्या. लग्नामध्ये वधुपक्षाकडील मंडळींनी नवरदेवाचे बूट लपवले होते. याचा राग धरून नवरदेवाचा भाऊ सोमनाथ गायकवाड याने नवरीची चप्पल लपवली. या शुल्लक कारणावरून आरोपी लहू गिऱ्हे याने सोमनाथच्या तोंडावर बुक्का मारला आणि पाहता पाहता वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. 

महिलांच्या अंगावरील दागिने ओरबाडले
भांडण सुरू असतानाच आरोपींनी संगनमत करून फिर्यादी आणि त्यांच्या नातेवाईकांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी व लाकडी काठीने मारहाण केली. याच गोंधळात आरोपींनी महिलांच्या अंगावरील दागिने ओरबाडण्यास सुरुवात केली. यात फिर्यादी अश्विनी वाणी यांचे ७ ग्रॅमचे मंगळसूत्र आणि १५ ग्रॅमचे नेकलेस ओढून नेले. त्यांची आई संगीता वानी यांचे दोन तोळ्याचे नेकलेस व सोन्याचा सर हिसकावला. मावशी अलका गायकवाड आणि बहिणींचे कानसाखळी, झुमके आणि सोन्याची पोत देखील जबरीने काढून घेण्यात आली. 

सात महिलांवर गुन्हा दाखल
या प्रकरणी अश्विनी वानी यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात संशयित राधा गायकवाड, यशोदा गिऱ्हे, शोभा गिऱ्हे, दिनेश गिऱ्हे, लहू गिऱ्हे, शोभा गायकवाड, नवरीची चुलती यांच्यासह इतर ६ ते ७ महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेकॉ. नरवडे करत आहेत.

Web Title : जूता चुराई पर शादी में बवाल, गहने लूटे!

Web Summary : जालना के नांदी में जूते चुराने की रस्म पर शादी में झगड़ा हो गया। मारपीट में महिलाओं से गहने छीन लिए गए। पुलिस ने कई संदिग्धों के खिलाफ मामला दर्ज किया है।

Web Title : Groom's shoe prank sparks wedding brawl; jewelry stolen!

Web Summary : A wedding in Nandi, Jalna turned violent over a groom's shoe prank. The fight escalated, with attendees assaulted and women robbed of jewelry. Police have registered a case against multiple suspects.