शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाडात लिलावाअभावी गाळे पडून !

By admin | Updated: October 30, 2015 23:22 IST

पालिकेचा कारभार : १९६पैकी ४३ गाळ्यांचे लिलाव; उर्वरित १५३ ची प्रतीक्षा, पाच वर्षांपूर्वी बांधली इमारत

कऱ्हाड : येथील कऱ्हाड पालिकेच्या वतीने भाजी मंडईतील विक्रेत्यांची सोय व्हावी या हेतूने छत्रपती शिवाजी भाजी मंडईची इमारत बांधली. पाच वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या इमारतीमध्ये स्वतंत्र १९६ गाळे बांधण्यात आले. त्यापैकी फक्त ४३ गाळ्यांचे लिलाव होऊन ते सुरू झाले. मात्र, अजून १५३ गाळे लिलावाअभावी बंद आहेत. इतर गाळ्यांचे लिलाव हे होणे गरजेचे आहे. मात्र, पालिकेकडून मंडई सुरू करण्यात आल्यापासून आतापर्यंत गाळ्यांचे लिलाव करण्यात आले नाहीत. त्यामुळे कोट्यावधी रुपयांचे नुकसान पालिकेला सोसावे लागले आहे. केंद्र शासनाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून कऱ्हाड पालिकेने २०११ मध्ये गुरुवार पेठ येथे शिवाजी भाजी मंडईची इमारत बांधली. १९६ गाळे असलेल्या इमारतीच्या बांधकामासाठी सुमारे साडेतीन कोटी रुपये खर्च करण्यात आले. दोन मजली इमारतीतील आतील आणि बाहेरील बाजूस १९६ गाळे काढण्यात आले. मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळेल या हेतूने बांधण्यात आलेल्या १९६ गाळ्यांपैकी सुरुवातीला १३१ गाळ्यांचे लिलाव झाले. उर्वरित ६५ गाळ्यांचे लिलाव झाले नाहीत. लिलाव झालेल्या १३१ गाळे धारकांपैकी पाच वर्षात फक्त ४३ गाळेधारकांनी पैसे भरले. लिलावातील बाकी राहिलेले ८८ गाळे व उर्वरित ६५ गाळे अशा १५३ गाळ्यांचे पुर्नलिलाव करण्याचे बाकी आहे. ते लिलाव कधी केले जाणार अशी विचारणा नागरिक व व्यापाऱ्यांकडून होत आहे. लिलावा अभावी व भाजी मंडई इमारतीसमोरील अतिक्रमणामुळे पालिकेतील गाळे पडून आहेत.पालिकेने गाळेधारकांना लिलावातील रक्कम भरण्याबाबत गेल्या पाच वर्षांत अनेकवेळा नोटिसांद्वारे सूचना केल्या आहेत. २०११ ते २०१५ या पाच वर्षांत गाळेधारकांनी अनामत रक्कम अपेक्षित अशी भरली नाही. तसेच काहींकडून आजतागायत काहीच रक्कम भरली गेली नसल्याचे व्यापाऱ्यांमधून सांगितले जाते. पाच वर्षांत पालिकेतील सर्व गाळ्यांचे लिलाव का होऊ शकले नाही. लिलावाबाबत एकाही नगरसेवकाने सभागृहात प्रश्न का उपस्थित केला नाही. याचे संशोधन करणे गरजेचे आहे.गाळेधारकांना सवलत देण्याच्या दृष्टीने पालिकेच्या झालेल्या सर्वसाधारण सभेत गाळेधारकांना ३० सप्टेंबर पर्यंत मुदत वाढवून दिली होती. त्यानुसार व्याजासह थकबाकी भरण्याच्या सूचना केल्या होत्या. गाळे वाटपाअभावी पालिकेचे पाच वर्षांत कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे.याला जबाबदार कोणास धरले पाहिजे. पालिका प्रशासनाला की, लोकप्रतिनिधींना अशी शहरातील नागरिकांकडून विचारणा होत आहे. (प्रतिनिधी)नियोजित जागेवर अजूनही काम अपूर्ण नवीन भाजी मंडई इमारतीच्या बाजूला असणाऱ्या मोठ्या जागेवर पालिकेकडून इतरही इमारतींचे बांधकाम केले जाणार आहे. अशी माहिती एक वर्षापूर्वी पालिकेकडून मंडई परिसरातील व्यापारी व नागरिकांना देण्यात आली होती. मात्र, त्या जागेवर आजही फक्त मुरूम आणि दगड पडलेले आहे. याठिकाणी सध्या किरकोळ विक्रेत्यांनी आपली दुकाने उभारलेली आहेत.२०१० ला बांधकाम पूर्ण येथील नवीन भाजी मंडईच्या इमारतीचे बांधकाम २०१० मध्ये पूर्ण करण्यात आले. आता २०११ पासून ते आतापर्यंत पाच वर्षे मंडई इमारतीमधील गाळे लिलावा अभावी पडूनच राहिले.