शहरं
Join us  
Trending Stories
1
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
2
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
5
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
6
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
7
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
8
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
9
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
10
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
11
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
12
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
13
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
14
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
15
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
16
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
17
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
18
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
19
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
20
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

ऐकावे ते नवल : गोदामातून कांद्याच्या पिशव्याच चोरीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 15:33 IST

crimenews, onion, farmar, sataranews विडणी, ता. फलटण येथील शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेल्या कांद्याच्या गोदामातून ४५ हजार रुपये किमतीच्या कांद्याच्या पिशव्यांची चोरी झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

ठळक मुद्देऐकावे ते नवल : गोदामातून कांद्याच्या पिशव्याच चोरीस विडणी परिसरातील शेतकऱ्यांत घबराट

फलटण : विडणी, ता. फलटण येथील शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेल्या कांद्याच्या गोदामातून ४५ हजार रुपये किमतीच्या कांद्याच्या पिशव्यांची चोरी झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.विजेचा लपंडाव, रात्री-अपरात्री विंचू काट्याचा धोका पत्करून, रक्ताचे पाणी करून शेतकरी पिके जोपासत असतो. त्यात नुकतीच अवकाळी पावसाने अनेक शेतकऱ्यांची उभी पिके शेतात नासून गेली. यातून काही शेतकऱ्यांना शेतातील कांदा वाचवण्यात यश आले होते. कधी नव्हे एवढा कांद्याला सोन्याचा भाव मिळू लागला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खिशात चार पैसे खेळू लागले. यावर चोरट्यांनी डोळा ठेवला आहे.

विडणी येथील २५ फाटा नाळे वस्ती येथून भरत नाथबुवा नाळे, सुरेश विठ्ठल नाळे, सुनील विठ्ठल नाळे या शेतकऱ्यांनी घराशेजारी असणाऱ्या कांदा साठवून ठेवलेल्या पत्र्याच्या शेड गोदामात तिघांचे चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये किमतीचा साठ ते पासष्ठ किलो वजनाच्या जवळपास एक टन वजनाच्या पंधरा कांद्याच्या पिशव्या ठेवल्या होत्या. त्या रात्री बारा ते एकच्या दरम्यान चोरट्यांनी गोडावूनमधून लंपास केल्या.दरम्यान, कुत्री भुकंण्याच्या आवाजाने संबंधित मालकाला जाग आल्यावर घराशेजारील कांद्याच्या पिशव्या चोरट्यांनी चोरून नेल्याचे मालकाच्या लक्षात आले. सकाळी पोलीस पाटील धनाजी नेरकर यांना या घटनेची माहिती दिल्यावर त्यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाणेत कळविली. फलटण ग्रामीण पोलीस ठाणेतील कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट दिली. याबाबत फलटण ग्रामीण पोलिस ठाणेत भरत नाथबुवा नाळे, सुरेश विठ्ठल नाळे, सुनील विठ्ठल नाळे यांनी तक्रार दाखल केली आली आहे.

टॅग्स :onionकांदाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसSatara areaसातारा परिसरFarmerशेतकरी