नवी दिल्ली - दक्षिण दिल्लीच्या कैलास हिल्समध्ये IRS अधिकाऱ्याच्या २२ वर्षीय मुलीच्या हत्येने देशात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपी राहुल मीणा याच्या तपासात त्याहून अधिक भयंकर गोष्टी समोर आल्यात. आरोपीला त्याने केलेल्या कृत्याचा पश्चाताप नाही. जर दीदीने पैसे दिले असते तर हे झालं नसतं असं तो सहजपणे पोलीस अधिकाऱ्यांना चौकशीत सांगत आहे.
माहितीनुसार, राहुलने पोलीस चौकशीत त्याचा गुन्हा कबूल केला. तो फक्त पैसे घेण्याच्या हेतूने घरी गेला होता. जर दीदीने पैसे दिले असते तर तिची हत्या झाली नसती, ना तिचा छळ झाला असता. बस्स हे झालं असं त्याने पोलिसांना सांगितले. राहुल मीणाने घरात प्रवेश करण्यासाठी खोटं बोलला. पीडितेच्या आईला राहुल आंटी म्हणत होता. आंटीने पैसे घ्यायला बोलावलय असं त्याने पीडितेला सांगितले. IRS अधिकाऱ्याचे कुटुंब त्याच्याशी चांगले वागत होते. त्याला २० हजार मासिक पगार होता, त्याशिवाय बोनसही दिला जायचा असं चौकशीत समोर आले.
साकेत कोर्टाने आरोपी राहुल मीणाला ४ दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवले आहे. हा संपूर्ण घटनाक्रम पुन्हा जोडला जात आहे. फॉरेन्सिक, डिजिटल साक्षी पुरावे जमा करणे आणि हत्येमागचा हेतू काय हे समजून घेण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत. राहुल मीणा ८ महिने आयआरएस अधिकाऱ्याच्या घरी काम करत होता. दीड महिन्यापूर्वी आर्थिक गडबडीमुळे त्याला नोकरीवरून काढण्यात आले. तो कर्जात बुडालेला होता आणि ऑनलाइन गेमिंग आणि जुगाराचा त्याला छंद होता असं तपासात कळलं आहे. या प्रकरणात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे आरोपीला घरच्या सुरक्षेची पूर्णपणे माहिती होती. प्रत्येक मजला आणि लिफ्ट इथं लॉक होते. कमीत कमी ४ टाळे त्याला उघडावे लागले. ज्यात ३ टाळ्यांचा पासवर्ड होता. आरोपीला हे कोडही माहिती होते. नोकरांसाठी अतिरिक्त चावी कुठे ठेवली जायची हेदेखील त्याला ठाऊक होते.
घटनेच्या दिवशी काय घडलं?
२२ एप्रिलला सकाळी तो घराबाहेर वाट पाहत होता. जसे अधिकारी जोडपे रोजप्रमाणे व्यायाम करायला बाहेर पडले तसा आरोपी घरात शिरला. या घटनेतील २२ वर्षीय मुलगी इंजिनिअर पदवीधर होती आणि UPSC परीक्षेची तयारी करत होती. ती वरच्या मजल्यावर स्टडी रूममध्ये अभ्यास करत होती. राहुल मीणा जवळपास १ तास घरात होता. त्याने आधी पैशांची मागणी केली. तिने नकार दिल्यानंतर जड वस्तूने तिच्यावर हल्ला केला. त्यात युवती जखमी होऊन बेशुद्ध पडली. त्यानंतर आरोपीने गळा दाबून तिची हत्या केली. त्याआधी बेशुद्धीच्या अवस्थेत तिच्यावर अतिप्रसंग केला.
आरोपी इतक्यावरच थांबला नाही तर त्याने पीडितेला खेचत खालच्या मजल्यावरील रूममध्ये आणले. रक्ताने माखलेल्या हाताने त्याने बायोमेट्रिक लॉकर उघडण्याचा प्रयत्न केला. परंतु ते उघडले नाही. रक्तामुळे पीडितेचे फिंगरप्रिंट डिटेक्ट झाले नाही असा पोलिसांना अंदाज आहे. त्यानंतर राहुलने स्क्रूड्रायव्हरने लॉकर उघडण्याचा प्रयत्न केला. दागिने, रोकड बाहेर काढत बॅगेत भरले. आरोपीच्या कपड्यांवर रक्ताचे डाग होते त्यामुळे त्याने पीडितेच्या भावाचे कपडे घातले आणि तिथून फरार झाला. पोस्टमोर्टम रिपोर्टमध्ये पीडितेच्या दोन्ही हाताला, पायाला आणि शरीरावर अनेक ठिकाणी जखमा असल्याचे उघड झाले. तिचे कपडे फाटलेले होते. कमरेखालील भागावर कपडे नव्हते.
दिल्लीला येण्यापूर्वी अलवरमध्येही लैंगिक अत्याचार
दरम्यान, आरोपी राहुल मीणाच्या तपासात आणखी एक धक्कादायक खुलासा झाला आहे. दिल्लीला येण्यापूर्वी राहुल मीणाने अलवर येथे त्याच्या शेजारील महिलेवर १२ तास लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणात FIR दाखल झाल्यानंतर तो फरार होऊन दिल्लीत पोहचला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने आयआरएस अधिकाऱ्याच्या घरी जाऊन हा कांड केला. दिल्ली पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी १२ पथके तयार केली होती. त्यानंतर द्वारका येथील एका हॉटेलवर त्याला अटक करण्यात आली, जिथे तो लपून बसला होता.
Web Summary : Rahul Meena confessed to murdering an IRS officer's daughter in Delhi. He claims he only wanted money and wouldn't have killed her if she had paid. He also sexually assaulted her. He was familiar with the house and security.
Web Summary : राहुल मीणा ने दिल्ली में एक आईआरएस अधिकारी की बेटी की हत्या करना कबूल किया। उसका दावा है कि वह केवल पैसे चाहता था और अगर उसने भुगतान किया होता तो उसे नहीं मारता। उसने उस पर यौन हमला भी किया। वह घर और सुरक्षा से परिचित था।