Join us
Daily Top 2Weekly Top 5

MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)

मैदानात नेमकं काय घडलं? या भांडणाला कोण कारणीभूत होते? जाणून घेऊयात सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 01:08 IST

Open in App

Tilak Varma engaged in a heated argument with Jamie Overton : इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेतील मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील सामना अगदी एकतर्फी झाला. चेन्नईच्या गोलंदाजांनी धावांचा पाठलाग करताना मुंबईकर फलंदाजांना अक्षरश: गुडघे टेकायला लावले. या सामन्यादरम्यान  मागच्या सामन्यातील शतकवीर तिलक वर्मा आणि  जेमी ओवर्टन यांच्यात शाब्दिक वाद रंगल्याचेही पाहायला मिळाले. दोघांच्या वाद मिटवण्यासाठी पंचांना मध्यस्थी करावी लागली. दोघांनाही मैदानातील कृतीमुळे शिक्षा होणार का? हा मुद्दा चर्चेचा विषय ठरत आहे. मैदानात नेमकं काय घडलं? या भांडणाला कोण कारणीभूत होते? जाणून घेऊयात सविस्तर

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

तिलक वर्मा आणि जेमी ओवर्टन यांच्यात वाजलं

वानखेडेच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने दिलेल्या २०८ धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची सुरुवात खराब झाली.  MI च्या डावातील १० व्या षटकात तिलक वर्मा आणि जेमी ओवर्टन यांच्यात शाब्दिक वाद झाला. दोघांच्यातील तणाव इतका वाढला की, दोघांना शांत करण्यासाठी मुंबई इंडियन्सचा बॅटर सूर्यकुमार यादवसह मैदानातील पंचांना मध्यस्थी करावी लागली. 

Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्...

नेमकं काय घडलं?

जेमी ओवर्टन घेऊन आलेल्या १० व्या षटकात तिलक वर्मानं पहिल्या दोन चेंडूत दोन चौकार आणि दुहेरी धावेसह १० धावा घेतल्या. या षटकातील अखेरचा चेंडू मिडविकेटला टोलवल्यावर तिलक वर्मानं पहिली धाव वेगाने घेत दुसऱ्या धावेसाठी मैदान सोडले. सूर्यानं नकार दिल्यावर तो नॉन स्ट्राईक एन्डला सुरक्षित पोहचला. पण षटक संपल्यावर दोघांच्यात शाब्दिक चमक झाली. या षटकात जेमी रनअप घेऊन आल्यावर तिलक वर्मानं तयार नसल्याचे सांगत त्याला थांबवले होते. यावरुनच दोघांनी एकमेकांवर राग काढल्याची शक्यताही आहे. 

फक्त तिलक आणि सूर्यानंच गाठला दुहेरी आकडा

जेमीच्या गोलंदाजीवर आक्रमक फटकेबाजी करणारा तिलक वर्मा या  सामन्यात फक्त २९ चेंडूत ३७ धावांवर अकिल होसीनचा शिकार झाला.  त्याच्य़ाशिवाय सूर्यानं ३० चेंडूत केलेल्या ३६ धावा वगळता मुंबई इंडियन्सच्या एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. परिणामी मुंबई इंडियन्सवर IPL मधील सर्वोत मोठ्या पराभवाची नामुष्की ओढावली. 

English
हिंदी सारांश
Web Title : MI vs CSK: Tensions flare as Tilak Varma, Overton clash!

Web Summary : During the MI vs CSK match, Tilak Varma and Jamie Overton had a heated argument, requiring intervention. The incident occurred after a mix-up during a run, leading to verbal exchanges. Only Tilak and Surya reached double figures as Mumbai faced a heavy defeat.
टॅग्स :आयपीएल २०२६मुंबई इंडियन्सचेन्नई सुपर किंग्सतिलक वर्मासूर्यकुमार यादव