लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर/बुलढाणा : शिंदेसेनेचे बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या शीर्षकावरून संताप व्यक्त करत प्रकाशकाला थेट फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने प्रकरण चर्चेत आले असून यामुळे नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख एकेरी का केला अशी विचारणा करत प्रकाशक प्रशांत श्रीकांत आंबी (रा. राजेंद्रनगर, कोल्हापूर) यांना आमदार गायकवाड यांनी ९ मिनिटे ३१ सेकंदांच्या मोबाइलवरील कॉलमध्ये दोन वेळा घरात घुसून मारण्याची, जीभ कापण्याची धमकी दिली आहे. बातमीत लिहिता येणार नाहीत अशा भाषेत आईवरून १३ वेळा शिव्या दिल्या आहेत.
शिवरायांबद्दलही अपशब्द
- प्रकाशक आंबी यांनी तक्रारीत म्हटले की, आमदार गायकवाड यांनी २२ एप्रिल २०२६ रोजी मध्यरात्री १२:५१ वाजता त्यांच्या नंबरवरून फोन केला. तेव्हा मी घरीच होतो. मी म्हणालो की, उद्या बोलू, कारण रात्री उशिरा कॉल आला होता. परंतु त्यांनी अश्लील भाषेत शिवीगाळ केली.
- आमदार गायकवाड यांच्या प्रत्येक वाक्यात शिवी, स्त्री देहाचा अपमान करणारे घाणेरडे उच्चार, असंस्कृतपणा, इतकेच नाही तर खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारी विधाने आहेत असे प्रकाशक आंबी यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
कुणालाही मारण्याचा परवाना दिलाय का?
संजय गायकवाड यांनी अत्यंत गर्वाने सांगितले की, मी कोण आहे ते गुगल, यू ट्युब इत्यादी समाज माध्यमांवर बघावे. पोलिससुद्धा आमदार गायकवाड बाबत बघू शकतात. आमदार असणे म्हणजे काहीही बोलून कुणालाही धमक्या देऊ शकतो, कुणालाही मारू शकतो असे त्यांना वाटते का, असा सवाल आंबी यांनी केला आहे.
वेगळे संदर्भ देऊन ऑडिओ व्हायरल केला : गायकवाड
आमदार संजय गायकवाड यांनी व्हायरल ऑडिओ क्लिपबाबत स्पष्टीकरण देताना, मी जे बोललो त्यापेक्षा वेगळे संदर्भ देऊन व्हायरल करण्यात आला असल्याचा दावा केला आहे. तसेच, ‘शिवरायांचा अपमान सहन केला जाणार नाही’ या भूमिकेवर आपण ठाम असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
Web Summary : MLA Sanjay Gaikwad threatened a publisher over the book 'Shivaji Kon Hota?' title. He allegedly used abusive language and threats, sparking political controversy. Gaikwad claims the audio clip is being shared with a different context and defends his stance, saying that he won't tolerate disrespect towards Shivaji Maharaj.
Web Summary : विधायक संजय गायकवाड़ ने 'शिवाजी कौन था?' पुस्तक के शीर्षक पर एक प्रकाशक को धमकी दी। कथित तौर पर उन्होंने अपमानजनक भाषा और धमकियों का इस्तेमाल किया, जिससे राजनीतिक विवाद छिड़ गया। गायकवाड़ का दावा है कि ऑडियो क्लिप को अलग संदर्भ में साझा किया जा रहा है और उन्होंने अपना रुख बरकरार रखा, उन्होंने कहा कि वे शिवाजी महाराज के प्रति अनादर बर्दाश्त नहीं करेंगे।