Join us
Daily Top 2Weekly Top 5

MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)

मुकेश चौधरी समोर क्विंटन डी कॉक सपशेल अपयशी ठरला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 22:48 IST

Open in App

मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानात संजू सॅमसनच्या शतकाच्या जोरावर २०० पारची लढाई केल्यावर चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने गोलंदाजीतही दमदार सुरुवात केली. अकिल हुसेन याने पहिल्याच षटकात दानिश मालेवारच्या रुपात संघाला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर मुकेश चौधरी पिक्चरमध्ये आला. आईच्या निधनानंतर मैदानात उतरलेल्या पठ्ठ्यानं आपल्या पहिल्याच षटकात क्विंटन डी कॉकला चार निर्धाव चेंडू टाकत पाचव्या चेंडूवर त्याला क्लीन बोल्ड केले. या विकेटनंतर युवा गोलंदाज आईच्या आठवणीत भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

शतकवीर क्विंटन डी कॉक सलग दुसऱ्या सामन्यात अपयशी

क्विंटन डी कॉकनं यंदाच्या हंगामातील पहिल्याच सामन्यात शतक झळकावले होते. पण पंजाब किंग्स विरुद्धची त्याची नाबाद शतकी खेळी व्यर्थ ठरली होती. गुजरात टायटन्सविरुद्ध तो फक्त १३ धावांची भर घालून माघारी फिरला. चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात २०८ धावांचा पाठलाग करताना त्याच्याकडून मोठ्या खेळीची आस होती. पण मुकेश चौधरी समोर तो सपशेल अपयशी ठरला. 

MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात

पहिल्या षटकात पहिली विकेट अन् मुकेश चौधरी झाला भावूक

मुकेश चौधरीने १३८.९ किमी प्रति तास वेगाने टाकलेला चेंडूवर क्विंटन डी कॉक फसला. चेंडू बॅटची कड घेऊन यष्टीवर आदळला अन् चेन्नईच्या संघाला दुसरे यश मिळाले. या विकेटनंतर मुकेशनं गळ्यातील लॉकेट पकडत आकाशाच्या दिशेनं पाहत भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. मंगळवारी आईचे निधन झाल्यावर अंत्यविधी उरकून तो पुन्हा CSK संघाकडून मैदानात उतरला आहे. त्याच्या या समर्पणाचे कौतुक होत असताना आता विकेटनंतर तो भावूक झाल्याचा क्षण चर्चेचा विषय ठरत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Mukesh Choudhary's emotional wicket of De Kock, remembers his mother.

Web Summary : Mukesh Choudhary, playing after his mother's death, bowled out Quinton de Kock. The emotional bowler dedicated the wicket to his mother, looking towards the sky.
टॅग्स :आयपीएल २०२६मुंबई इंडियन्सचेन्नई सुपर किंग्स