योगेश पांडे
नागपूर : सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट करून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांना धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुमितकुमार राकेशकुमार चौहान (४१ नांगलोई, दिल्ली) हे व्यावसायिक असून ते अखिल भारतीय हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्षदेखील आहेत. ते वैयक्तिक कामानिमित्त २२ एप्रिल रोजी नागपुरात आले होते. यशवंत स्टेडियम परिसरात असताना त्यांनी फेसबुकवर ‘सनातनी शेर’ नावाच्या आयडीवर अपलोड करण्यात आलेला एक व्हिडिओ पाहिला. त्या व्हिडिओमध्ये संबंधित व्यक्तीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करत गंभीर धमक्या दिल्याचे दिसून आले. तसेच मंत्री व त्यांच्या कुटुंबीयांवर चुकीचे आरोप करून समाजात भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
याशिवाय, दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये धार्मिक भावना भडकवणारे आणि विविध समाजांमध्ये तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केल्याचेही निदर्शनास आले. चौहान यांनी याची धंतोली पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. तपासाअंती त्याचे नाव आयुष रमेशचंद्र अग्रवाल (४४, महालक्ष्मीनगर, मानेवाडा चौक) असल्याचे समोर आले. त्याने नागपुरातूनच ती पोस्ट केली होती. पोलिसानी प्रकरण गंभीरतेने घेत भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम १९६(१)(अ), १९६(१)(ब), ३५१(२), ३५१(३), ३५२, ३५३(२) आणि ३५६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
Web Summary : Union Minister Nitin Gadkari and his family received threats via offensive social media videos. A Nagpur resident, Ayush Agrawal, is booked for posting the content, inciting religious sentiments and social discord. Police are investigating the case.
Web Summary : केंद्रीय मंत्री नितिन गडकरी और उनके परिवार को सोशल मीडिया पर आपत्तिजनक वीडियो के माध्यम से धमकियाँ मिलीं। नागपुर निवासी आयुष अग्रवाल पर धार्मिक भावनाओं और सामाजिक वैमनस्य को भड़काने वाला कंटेंट पोस्ट करने के लिए मामला दर्ज किया गया है। पुलिस मामले की जांच कर रही है।