शहरं
Join us  
Trending Stories
1
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
2
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
3
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
4
सीबीआयची नागपूर-चंद्रपूरमध्ये झडती
5
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
6
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
7
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
8
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
9
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

आईची सेवा न करणं ठरलं जीवघेणं; जीवन संपवलेल्या सूरजची मन हेलावून टाकणारी कहाणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 17:39 IST

चिठ्ठीमुळे उलगडली मनातील ‘सल’

दत्ता यादव

सातारा : आई-वडील जिवंत असताना त्यांची काळजी घेतली नाही, तर नंतर आयुष्यभर पश्चात्ताप करावा लागतो, याचे हृदय पिळवटून टाकणारे उदाहरण साताऱ्यात घडले आहे. आई जिवंत असताना तिची योग्य काळजी घेतली नाही, याची तीव्र खंत मनात बाळगणाऱ्या एका तरुणाने चिठ्ठी लिहून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही करुण कहाणी रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळे गावचा २९ वर्षीय सूरज सुबारे याची आहे.

सूरज सुबारे हा लहान असतानाच त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. आईच्या आधारावर त्याचे आयुष्य पुढे जात होते. मात्र, दोन वर्षांपूर्वी आईचेही निधन झाल्यानंतर तो पूर्णपणे एकटा पडला. बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या सूरजने कामाच्या शोधात साताऱ्यात येण्याचा निर्णय घेतला. साताऱ्यातील चिमणपुरा पेठेमध्ये भाड्याची खोली घेऊन तो वास्तव्य करत होता. पगारही त्याला फारसा नव्हता. पैसे वाचविण्यासाठी काटकसर करून तो रोजचा दिवस पुढे ढकलत होता; पण मनातून तो नाराज असायचा.

त्याला त्याच्या आईची फार आठवण यायची. आई हयात असताना तिची काळजी घेतली नाही, याची सल त्याच्या मनात सतत बोचत होती. नकळत आईच्या तब्येतीकडे त्याच्याकडून झालेले दुर्लक्ष त्याला स्वस्थ बसू देत नव्हतं. कामावरून घरी आल्यानंतरही तो फारसा आजूबाजूच्या लोकांशी बोलायचा नाही. फक्त आई आणि आई, हेच दोन शब्द त्याचे आपल्या कंपनीतील मित्रांसोबत बोलताना बाहेर पडायचे. असं त्याचे सहकारी मित्र सांगताहेत.

‘त्याची’ चिठ्ठी मन हेलावून टाकणारी...

सूरज शनिवारी कामावर गेला नाही. आज आपल्या आयुष्यातील शेवटचा दिवस असं समजून त्यानं आईसाठी चिठ्ठी लिहिली. माझी आई मला सोडून गेली. आई हयात असताना आईची काळजी घेतली असती तर आज माझ्यासोबत आई असती. मला आयुष्याचा आता कंटाळा आलाय. माझ्यामुळे कोणाला त्रास नको. माझ्या मृत्यूला मीच जबाबदार आहे. मी स्वत: आत्महत्या करत आहे, असा मजकूर चिठ्ठीत लिहून सूरजने गळफास घेऊन या जगाचा निरोप घेतला.

यातून समाजासाठी एकच संदेश

आज आपण समाजामध्ये पाहातो. संपत्तीसाठी काही मुले आई-वडिलांना घराबाहेर काढतात. तर काही मुले आई-वडिलांना वृद्धाश्रमात ठेवतात; पण जेव्हा आई-वडील हयात नसतात. तेव्हाच त्यांची किंमत कळते; पण तोपर्यंत वेळ गेलेला असतो. कदाचित, सूरजलाही हीच जाणीव झाली असेल. आई हयात असताना तिची काळजी घेतली असती तर आज माझ्यासोबत माझी आई असती, असं त्याला सांगावं लागलं. या घटनेतून समाजासाठी एकच संदेश जातो तो म्हणजे आई-वडील हयात आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करा.

English
हिंदी सारांश
Web Title : Regret over Mother's Care Leads to Suicide: A Heartbreaking Story

Web Summary : Haunted by neglecting his mother, 29-year-old Suraj from Satara tragically ended his life. A suicide note revealed his deep regret for not caring for her while she was alive. He felt alone after her death and overwhelmed by guilt.