शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
2
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
3
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
4
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
5
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
6
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
7
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
8
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
9
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
10
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
11
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
12
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
13
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
14
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
15
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
16
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
17
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
19
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
20
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
Daily Top 2Weekly Top 5

शशिकांत शिंदेच बनलेत संपर्कहीन !

By admin | Updated: April 17, 2015 00:03 IST

शिवसेनेचा प्रतिटोला : पालकमंत्र्यांवरील टीकेला दिले जोरदार प्रत्युत्तर

सातारा : ‘पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या अभ्यासाची मापे काढण्याऐवजी माजी पालकमंत्र्यांनी १५ वर्षांत काय दिवे लावले याचे आधी आत्मपरीक्षण करावे. आधी आपल्याजवळील अंधार बघा, नंतर फोनवरून थातूरमातूर वक्तव्ये करा. दुसऱ्याची मापे काढण्यापेक्षा मतदारसंघात वेळ दिला तर तुम्ही संपर्कहीन झाला आहात, असे म्हणण्याची वेळ येणार नाही,’ असा टोला शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांनी माजी पालकमंत्री शशिकांत शिंदे यांना लगावला. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, जलसंपदा खाते गेली १५ वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. या कालावधीत शिंदेंच्या नेत्यांनी व बगलबच्च्यांनी दुष्काळी भागातील प्रकल्पांमध्ये कसा मलिदा लाटला, हे जनतेला ज्ञात आहे. आता सत्ता गेल्याने व दुष्काळी जनतेने पुरते नाकारल्याने आमदार शशिकांत शिंदे यांचा तोल गेला आहे. त्यामुळे जिल्ह्यात येऊन बोलण्याऐवजी त्यांच्यावर फोनवरून उत्तरे देण्याची वेळ आली आहे. त्यांच्याच मतदारसंघातील तीनशे कोटींचा जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना त्यांच्याच नेत्यांनी फक्त साठ कोटींना घेतला, तेव्हा शिंदे मूग गिळून गप्प का होते? हेही जनतेला माहीत आहे. या कारखान्याची रखवालदारी करण्यासाठीच शिंदेंना त्यांच्या तथाकथित दादांनी मंत्रिपद बहाल केले. तेव्हा आता शिंदेंने आपल्याकडे सत्ता नाही, याचे भान ठेवून वागावे.’जाधव पुढे म्हणाले, ‘विजय शिवतारे हे आता मंत्री झाले आहेत. तरीही त्यांचा आवाका मोठा आहे. सातारा जिल्ह्यातील प्रश्नांबाबतीत विशेषत: दुष्काळी तालुक्यांबाबत त्यांनी विधानसभेतही योग्य भूमिका घेतली आहे. जिहे-कठापूर योजनेबाबत शिवसेनेने उपोषण केले होते. तेव्हा शशिकांत शिंदे यांनी आम्हाला सहा महिन्यांत जिहे-कठापूर योजना पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले होते, हे आश्वासन त्यांनी पाळले का? शिवतारे यांचा अभ्यास कच्चा आहे, असे आपण म्हणता. कदाचित त्यांना मलिदा लाटण्याचे, जवळच्या बगलबच्च्यांना कंत्राटे देण्याचे माहीत नसेल. त्याबाबतीत ते नक्कीच कच्चे असतील; मात्र तुमच्या कालावधीत झालेला भ्रष्टाचार बाहेर काढण्यात ते पक्के आहेत. भविष्यात तेही तुम्हाला दिसेल,’ असा टोलाही जाधव यांनी लगावला. (प्रतिनिधी)