विद्यार्थ्यांसाठी स्वत: विकत घेतला लॅपटॉप--बालाजी जाधव : हजारो तंत्रस्नेही शिक्षक घडविण्याबरोबरच गुगल सन्मानित शिक्षकाचा मिळाला मान-शिक्षक दिनविशेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 09:10 PM2018-09-04T21:10:04+5:302018-09-04T21:21:59+5:30

शेळ्या-मेंढ्याच्या मागं भाकरीचा चंद्र शोधणाऱ्या आई-बापांशिवाय उजाड माळरानावर भटकणाºया मुलांची परिस्थिती संवेदनशील शिक्षकाची घालमेल करणारी ठरली. या मुलांसाठी काहीतरी करण्याचं ‘लातूर पॅटर्न’च्या बालाजी जाधव

 Self-purchased laptop for students - Balaji Jadhav: With the help of thousands of teachers creating teachers, Google honored teachers got teachers - special teachers special | विद्यार्थ्यांसाठी स्वत: विकत घेतला लॅपटॉप--बालाजी जाधव : हजारो तंत्रस्नेही शिक्षक घडविण्याबरोबरच गुगल सन्मानित शिक्षकाचा मिळाला मान-शिक्षक दिनविशेष

विद्यार्थ्यांसाठी स्वत: विकत घेतला लॅपटॉप--बालाजी जाधव : हजारो तंत्रस्नेही शिक्षक घडविण्याबरोबरच गुगल सन्मानित शिक्षकाचा मिळाला मान-शिक्षक दिनविशेष

Next

-प्रगती जाधव-पाटील
सातारा : शेळ्या-मेंढ्याच्या मागं भाकरीचा चंद्र शोधणाऱ्या आई-बापांशिवाय उजाड माळरानावर भटकणाºया मुलांची परिस्थिती संवेदनशील शिक्षकाची घालमेल करणारी ठरली. या मुलांसाठी काहीतरी करण्याचं ‘लातूर पॅटर्न’च्या बालाजी जाधव या गुणी शिक्षकानं ठरवलं आणि ज्या वर्गांमध्ये केवळ उभा एक असंच शिकवलं जायचं तिथं चक्क चित्र बोलती झाली. पदरमोड करून विद्यार्थ्यांना स्वत:चा लॅपटॉप हाताळायला देणाºया जाधव यांच्या कामाची धडपड लक्षात घेऊन त्यांना जगप्रसिद्ध गुगलनेही सन्मानित केले.

लातूर येथील आणि नोकरीच्या निमित्ताने सातारा जिल्'ात आलेले बालाजी जाधव आता पक्के सातारकर झाले आहेत. माण तालुक्यातील शिंदेवाडी या शाळेतून त्यांनी ज्ञानदानाचे काम सुरू केले. भर उन्हात उद्देशहीन फिरणाºया मुलांना शाळेत आणलं तर त्यांची करमणूकही झाली पाहिजे, त्यामुळे विद्यार्थ्यांना आवडतील अशी चित्रं आणि गाणी दाखवणं गरजेचं असल्याचं त्यांना वाटलं. ज्या शाळेत वीज नाही तिथं संगणक तर फारच लांबची गोष्ट! मग लॅपटॉपचा मार्ग खुला झाला आणि १२ विद्यार्थ्यांनी सुरू झालेला वर्ग चक्क दुप्पट झाला!

गरिबांच्या मुलांना शिक्षणाच्या वाटेवर नेताना त्यांची गुणवत्ता सुधरविण्यासाठी त्यांनी मुलांना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी बसवलं. पहिल्या वर्षी अपेक्षित निकाल लागला नाही. शिक्षण देताना नेमकी काय गडबड होतेय, हे लक्षात आल्यानंतर चित्र आणि गाण्यांच्या रुपाने त्यांनी हजारो प्रश्नोत्तरांची बँकच तयार केली. त्यातून २००८ मध्ये काही विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले. शिक्षणाचं नेमकं तंत्र समजल्यानंतर जिल्'ात सर्वत्रच या प्रश्नोत्तरांच्या बँकचा वापर झाला. त्यातून शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण होणाºयांची संख्या वाढत गेली.

शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना राहता यावं म्हणून व्हिडीओ, आॅनलाईन टेस्ट, आॅफलाईन अ‍ॅप्स, अ‍ॅनिमेटेड फ्लिपबुक आदी शैक्षणिक साधनांची निर्मिती करून त्यांनी शिकणं सोपं करून ठेवलं.
राज्यभरातील १०० पेक्षा जास्त कार्यशाळा घेऊन राज्यातील हजारो शिक्षकांना टेक्नासॅव्ही बनविण्यातही त्यांचा मोठा वाटा आहे. ५०० हून अधिक मोफत आॅनलाईन स्पर्धा परीक्षांचा अभ्यासक्रमही त्यांनी डिझाईन केला आहे. एका क्लिकवर १५ देशाच्या सफरी त्यांनी विद्यार्थ्यांना घडवल्या आहेत. सुमारे २५ अँड्रॉईड अ‍ॅप करण्याचं श्रेयही त्यांना जातं. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून त्यांनी सुरू ठेवलेलं काम सर्वांसाठी मार्गदर्शक असंच आहे.

सबकुछ विद्यार्थ्यांच्या दृष्टीनेच
४ विद्यार्थ्यांची आवड लक्षात घेऊन बालाजी जाधव यांनी वर्गातील भिंतीवर क्यूआर कोड फ्लॅश केला आहे. टॅबच्या सा'ाने मुलं यामुळे खूप सोप्या पद्धतीने अवघड विषयांची सफर करून येतात.
४ जगभरातील ७० पेक्षा अधिक देशांशी शैक्षणिक संपर्क असल्यामुळे अ‍ॅनिमेशन, कराटे, चित्रकला आदी बाबी व्हर्च्युअल कॉन्फरन्सद्वारे विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध
४ शिक्षणासाठी उपक्रमशील काम करणाºयांकडून लोकसहभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उपयुक्त वस्तू पुरविण्याची धडपड अद्यापही सुरू आहे.

 

ग्रामीण भागात सुविधांचा अभाव असताना जागतिक दर्जाचे शिक्षण तंत्रज्ञानातील व्हर्च्युअल कॉन्फरन्सने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो. आॅफलाईन अ‍ॅनिमेटेड फ्लिपबुक हा प्रयोग राष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त ठरला. मराठी माध्यमातून शिकून मराठी माध्यमातील जिल्हा परिषद शाळेसाठी काम करतोय, याचा सार्थ अभिमान वाटतो.
- बालाजी जाधव, शिक्षक, पुळकोटी, ता. माण, जि. सातारा
 

 

Web Title:  Self-purchased laptop for students - Balaji Jadhav: With the help of thousands of teachers creating teachers, Google honored teachers got teachers - special teachers special

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.