शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

संतोष पोळने माझ्यासमोर तीन खून केले, ज्योती मांढरे हिची न्यायालयात साक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 10:36 IST

वाई हत्याकांडातील माफीची साक्षीदार ज्योती मांढरे हिने गुरुवारी सातारा जिल्हा न्यायालयात सुनावणीवेळी संतोष पोळ याने माझ्यासमोर तीन खून केले असून त्यापूर्वी त्याने एकट्याने तीन खून केले असल्याचे सांगितले आहे, अशी साक्ष माफीची साक्षीदार ज्योती मांढरे हिने न्यायालया दिली. दरम्यान, पोळ याच्याशी मंदिरात लग्न केले असल्याचेही तिने यावेळी सांगितले.

ठळक मुद्देमाफीची साक्षीदार ज्योती मांढरे हिची न्यायालयात साक्षआज पुन्हा सुनावणी होणार

सातारा : वाई हत्याकांडातील माफीची साक्षीदार ज्योती मांढरे हिने गुरुवारी सातारा जिल्हा न्यायालयात सुनावणीवेळी संतोष पोळ याने माझ्यासमोर तीन खून केले असून त्यापूर्वी त्याने एकट्याने तीन खून केले असल्याचे सांगितले आहे, अशी साक्ष माफीची साक्षीदार ज्योती मांढरे हिने न्यायालया दिली. दरम्यान, पोळ याच्याशी मंदिरात लग्न केले असल्याचेही तिने यावेळी सांगितले.संपूर्ण जिल्ह्याला, महाराष्ट्राला व देशाला हादरवणाऱ्या वाई-धोम हत्यांकाड खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायाधीश एन.एल. मोरे यांच्यासमोर सुरू आहे. विशेष सरकारी वकील उज्वल निकम सरकार पक्षातर्फे काम पाहत असून गुरुवारी ते न्यायालयात उपस्थित होते.वाई हत्याकांड प्रकरणात अनेक घडामोडीनंतर गुरुवारी या खटल्यातील महत्वाची माफीची साक्षीदार ज्योती मांढरे हिच्या साक्षीला सुरवात झाली. साक्ष देताना ज्योती म्हणाली, वाई येथील डॉ. घोटवडेकर यांच्या दवाखान्यात मी काम करत असताना २०१३ मध्ये तिची संतोष पोळ याच्याशी ओळख झाली.

१३ आक्टोबर २०१३ रोजी दोघांनी वाईतील गायत्री मंदीरात लग्न केले. त्यानंतर सहा महिन्यात काम सोडून नर्सिंग कोर्ससाठी प्रवेश घेतला. तीन वर्षांनी प्रशिक्षण पूर्ण झाले. लेखी परीक्षाही दिली. दरम्यान, तीन सिमकार्ड वापरून डॉॅ.संतोष पोळ याच्या संपर्कात असल्याची माहिती तिने दिली.ज्योती मांढरे पुढे म्हणाली, मार्च २०१५ मध्ये मला हॉस्पिटलमधून कामावरून काढून टाकल्याने पैशाची चणचण भासू लागली. संतोष पोळ याला भाड्याने अ‍ॅम्बुलन्स चालवायला दिली होती. परंतु, हप्ते न भरल्याने ती रुग्णवाहिका परत घेतली.

यामुळे नोव्हेंबर २०१५ मध्ये तुम्ही प्रॅक्टीस सुरू करा, असे तिने संतोष पोळ याला सांगताच त्याने माझी डीग्री खोटी आहे, रजिस्ट्रेशन झाले नाही, असे त्याने उत्तर दिले. ते ऐकूण ज्योती मांढरेला धक्का बसला. याचवेळी डॉ.पोळ याने ज्योती मांढरे हिला एक प्लॅन आहे, असे सांगितले.

लोक मला डॉक्टर समजतात. मी तपासणीच्या बहाण्याने त्यांना बोलवतो आपण त्यांना मारून दागिणे लूटू, असे तो म्हणाला. यावेळी मांढरे हिने आपण पकडले जाणार असे सांगितले. यावर संतोष पोळ म्हणाला, यापूर्वी मी सुरेखा चिकणे, वनिता गायकवाड व जगाबाई पोळ यांचा खून केला आहे.

ज्योतीने त्यांना  कसे मारतो, मृतदेहाचे काय करतो याबाबत विचारणा केली. त्यावेळी इंजेक्शन द्यायचे, त्यातून तो नैसर्गीक मृत्यू आल्यासारखे वाटते, कोणाला संशय येत नाही, असे त्याने सांगितले.

याच माध्यमातून पुढे डॉ.संतोष पोळ याने नथमल, सलमा व मंगल जेधे यांचे खून केल्याची साक्षही ज्योती मांढरे हीने न्यायालयासमोर दिली. अद्याप ज्योतीची साक्ष पूर्ण होऊ शकली नाही. यामुळे शुक्रवारी पुन्हा याप्रकणी सुनावणी होणार आहे.

 

टॅग्स :Courtन्यायालयSatara areaसातारा परिसर