शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

जर्मन तरुणांनी विवस्त्र होऊन जेलमध्ये घेतला धिंगाणा; कर्मचाऱ्यांना केली मारहाण  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2021 15:22 IST

satara Crime news- वाई येथे कुंड्यामध्ये गांजाची लागवड केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या सर्गीस व्हिक्‍टर मानका (वय 31), सेबेस्टीन स्टेन मुलर (वय 25 दोन्ही रा. जर्मनी, सध्या रा. नंदनवन कॉलनी, वाई) या संशयितांनी सातारा जिल्हा कारागृहात विवस्त्र होऊन धिंगाणा घातल्याची घटना घडली. एवढेच नव्हे तर संशयितांनी कारागृहातील खोली क्रं 5 मध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तसेच शौचालयाच्या दरवाजाची तोडफोड करत कारागृह कर्मचारी संदीप फाळके व रमेश ओव्हाळ यांना लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाणही केली.

ठळक मुद्देजर्मन तरुणांकडून कारागृहातील कर्मचाऱ्यांना मारहाण स्वतः झाले विवस्त्र; सीसीटीव्हीचीही तोडफोड

सातारा: वाई येथे कुंड्यामध्ये गांजाची लागवड केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या सर्गीस व्हिक्‍टर मानका (वय 31), सेबेस्टीन स्टेन मुलर (वय 25 दोन्ही रा. जर्मनी, सध्या रा. नंदनवन कॉलनी, वाई) या संशयितांनी सातारा जिल्हा कारागृहात विवस्त्र होऊन धिंगाणा घातल्याची घटना घडली. एवढेच नव्हे तर संशयितांनी कारागृहातील खोली क्रं 5 मध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तसेच शौचालयाच्या दरवाजाची तोडफोड करत कारागृह कर्मचारी संदीप फाळके व रमेश ओव्हाळ यांना लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाणही केली.याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, वाई शहरातील नंदनवन कॉलनीतील "विष्णू श्री स्मृती' या बंगल्यात हायड्रोपोनिक ग्रो सिस्टीमचा वापर करून बंगल्याच्या तीन बेडरूममध्ये, गॅलरीत, टेरेसवर कुंड्यामध्ये गांजाची लागवड केल्याने पोलिसांनी 29 किलो गांजा इतर साहित्य असा आठ लाख 21 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून सर्गीस मानका, सेबेस्टीन मुलर या दोन जर्मन नागरिकांना अटक केली होती. त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाल्याने त्यांची रवानगी जिल्हा कारागृहात करण्यात आली होती.दरम्यान दि.22 रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास संशयितांनी कारागृह कर्मचारी फाळके व ओव्हाळ या दोघांशी उद्धट वर्तन करण्यास सुरूवात केली. संशयितांनी या दोन्ही कर्मचाऱ्यांना लाथा बुक्‍क्‍यांनी मारहाण करून कारागृहातच विवस्त्र होऊन धिंगाणा घातला.

हा प्रकार शांत झाल्यानंतर फाळके व ओव्हाळ हे सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास पंधरा खोली विभागात गस्त घालत असताना त्यांना पाहून संशयितांनी चिडून जावून पंधरा खोली विभागातील ते बंधिस्त असलेल्या खोली क्रं 5 मधील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तसेच शौचालयाच्या दरवाजाची तोडफोड करून शासकीय मालमत्तेचे नुकसान केले. पोलीस उपनिरीक्षक मुजावर हे पुढील तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसjailतुरुंगSatara areaसातारा परिसर